पृथ्वीवरील स्वर्ग रायगड किल्ला माहिती Raigad fort information maharashtra

 पृथ्वीवरील स्वर्ग रायगड किल्ला माहिती Raigad fort information maharashtra

'Raigad fort information maharashtra'
'Raigad fort information maharashtra'




पृथ्वीवरील स्वर्ग रायगड किल्ला माहिती  'Raigad fort information maharashtra' रायगड किल्ला महाराष्ट्रातील कुलाबा म्हणजेच आत्ताच्या रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये येतो. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेला हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला पूर्वी रायरी या नावाने ओळखला जायचा. रायगड किल्ल्याला तशी बरीच नावे आहेत; त्यातीलच रायगड, रायरी, नंदादीप, तनस, बदेनूर, तर इंग्रज लोक जिब्राल्टर म्हणून ओळखत असत. 

ज्या चंद्रराव मोऱ्यांवर महाराजांनी मेहरबानी दाखवली तो चंद्रराव महाराजांशी बेईमानी करू लागला, त्यावेळेस महाराजांनी जावळी जिंकून, 6 एप्रिल 1656 ला रायरीला वेढा दिला; आणि 1656 च्या मे महिन्यात तो किल्ला महाराजांच्या ताब्यात आला. चढणीला अवघड आणि उंच असलेला हा भव्य गड महाराजांनी स्वराज्याच्या राजधानीसाठी हेरून ठेवला. कल्याणच्या सुभेदाराजवळील खजिना लुटून महाराजांनी तो सर्व खजिना गडाच्या बांधकामासाठी उपयोगात आणला.

पुढे हा किल्ला भव्यदिव्य आणि डौलदार अशी स्वराज्यची राजधानी म्हणून घडविण्याची जबाबदारी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवली. हिरोजींनी 12 ते 14 वर्षे जीवाचं रान करून परिणामी बांधकामास पैसा कमी पडला म्हणून आपली जमीन जाइजात विकून स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला उभा केला. आणि महाराजांना दिलेलं वचन पूर्ण केलं.

2700 फूट उंच, 2000 पायऱ्या आणि 1200 एकरात पसरलेला हा आकाशाचा गवसणी घालणाऱ्या राजधानी रायगडावर लहान मोठ्या 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्याचं बांधकाम होतं. 6 जून 1674 ला संपूर्ण पृथ्वीतलाला हेवा वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या रायगडाने डोळे भरून पाहिला. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि  पुढे राजाराम महाराजांचा राज्याभिषेक देखील रायगडावरच झाला. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पुढे नऊ वर्षे संभाजी महाराजांनी रायगडावरूनच राज्यकारभार केला. संभाजी महाराजांचे निधन झाले आणि फितुरीतून 6 नोव्हेंबर 1689 ला गड मुघलांच्या ताब्यात गेला. मुघल शासक औरंगजेबाने रायगड किल्ल्याचे नाव बदलून इस्लामगड असे ठेवले होते. 1733 च्या सुमारास शाहू महाराजांनी रायगड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला. आणि पुढे पेशव्यांच्या काळात 1818 ला रायगड किल्ला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला.'Raigad fort information maharashtra'


रायगड किल्ल्याची चार टोकं

• हिरकणी कडा

• टकमक टोक

• भवानी कडा

• श्रीगोंदे कडा


रायगड किल्ल्यावरील मुख्य दरवाजे


• महादरवाजा

महादरवाजा हा किल्ल्यावर जाण्यासाठीचा मुख्य दरवाजा आहे. 1400 पायऱ्या चढून वर आल्यानंतर महादरवाजातून किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. दरवाजाच्या बाहेरील बाजूस कमळाच्या फुलाचे सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते. दोन भक्कम बुरुजांचा हा दरवाजा सूर्योदया नंतर उघडायचा आणि सूर्यास्ता नंतर बंद व्हायचा.


• पालखी दरवाजा

शिवकाळात गडावरील बालेकिल्ल्यात जाण्यासाठी पालखी दरवाजाचा वापर होत असे. याच दरवाजातून छत्रपतींची पालखी आत जायची.


• मेणा दरवाजा

अस म्हटलं जातं की मेणा दरवाजाचा उपयोग हा राण्यांचा मेणा नेण्यासाठी होत असे. राणीवस्यात जाण्यासाठी हा मुख दरवाजा होता.


• वाघ दरवाजा

अवघड आणि शत्रूस सहज दृष्टीस न पडणारा दरवाजा म्हणजे वाघ दरवाजा होय. हा दरवाजा आपत्कालीन दरवाजा म्हणून वापरला जाई.


• नाना दरवाजा

हा गडावरील सर्वात लहान दरवाजा. शिवराज्याभिषेकाच्या वेळी इंग्रज वकील याच नाणे दरवाजातून गडावर आला होता.


गडावरील महत्वाचे तीन तलाव


• गंगासागर तलाव

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आणलेले सप्त नद्यांचे पाणी गंगाभट्टानी याच तलावात टाकले होते, म्हणून याचे नाव गंगासागर पडले. शिवकाळात याच तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येई. या गंगासागरात बाराही महिने पाण्याचा साठा असतो.'Raigad fort information maharashtra'


• हत्ती तलाव

मुख्यतः गडावरील हत्तींच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि स्नानासाठी वापरला जाणार तलाव म्हणून हत्ती तलाव ओळखला जातो.


• कुशावर्ता तलाव

होळीच्या माळाकडे जाताना डाव्या बाजूला कुशावर्ता तलाव दिसतो. या तलावाजवळ एक छोटेसे महादेवाचे मंदिर देखील आहे.


रायगड किल्ल्यावरील ठिकाणं

'Raigad fort information maharashtra'


• पाचाडचा वाडा

शिवरायांच्या मातोश्री जिजामाता यांना रायगडावरील हवामान मानवत नसल्याने महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाड गावात एक वाडा बांधून घेतला होता तो हाच पाचाडचा वाडा होता. जिजामाता उतारवयात याच वाड्यात राहिल्या.


• जगदीश्वर मंदिर

हे एक महादेवाचे मंदिर आहे.पण मंदिराची वरील बाजू ही मशिदी सारखी दिसते. शिवाजी महाराज गडावर असताना दररोज जगदीश्वराचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असत. मंदिराच्या एक पायरीवर "सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर" असा मजकूर पाहायला मिळतो. इतिहासकार असं सांगतात की रायगडाला राजधानीचं स्वरूप दिल्यानंतर महाराजांनी हिरोजींना हवं ते मागण्यास सांगितले आणि हिरोजींनी धन दौलत न मागता; जगदीश्वराच्या पायरीवर आपल्या नावाचा दगुड लावण्याची इजाजत मागितली होती.


• शिरकाई देवी मंदिर


शिरकाई देवी ही गडावरील मुख्य देवता आहे. देवळातील देवीची मूर्ती ही प्राचीन असून, मंदिर मात्र नंतरच्या काळात बांधण्यात आलेला आहे.


• नगारखाना

महाराजांच्या सिंहासना समोरून दिसणारे भव्य आणि बेलाद असे प्रवेशद्वार म्हणजे नगारखाना होय. नगारखान्यातून वर चढून जाण्यासाठी पायऱ्या देखील आहे.

'Raigad fort information maharashtra'
'Raigad fort information maharashtra'



• राणी वसा

छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ राण्या होत्या. त्यातील एक रायगडावर येण्याआधीच मरण पावल्या होत्या. तर एक राणी पाचाडला जिजामाते सोबत राहत असत. आणि उरलेल्या सहा रण्यासाठी रायगडावर भव्य दिव्य असे सहा महाल बांधण्यात आले होते. बाजूलाच स्नानगृह देखील होते. या महालाचे अवशेष आजही आपल्या गडावर पाहायला मिळतात.


• राजभवन

राणी महालाच्या समोर छत्रपतींचा मुख्य वाडा म्हणजेच राजभवन होते. लाकडाचे बांधकाम असलेला दोन मजली वाडा हा सुंदर नक्षीकाम आणि मखमलीच्या पडद्याने सजलेला होता. आता त्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. याच वाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला.


• दरबार

जुलमी पातशाह्यांना जमीनदोस्त करून याच पवित्र ठिकाणी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. याच ठिकाणी 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यातील न्याय निवाडा करत असत. महाराजांचा सुवर्ण राज्याभिषेक आणि प्रत्यक्ष छत्रपती अनुभवणारा हा दरबार 220 फुट लांब आणि 124 फूट रुंद आहे. 'Raigad fort information maharashtra' या राजदरबारात कितीही दबक्या आवाजात बोललेले शब्द सिंहासनापर्यंत ऐकायला येतात.


• बाजारपेठ

होळीच्या माळावरील महाराजांच्या पुतळ्यासमोरील विस्तीर्ण अशा दोन रांगेत बाजारपेठ वसलेली आहे. दोन्ही रांगेत प्रत्येकी 22 दुकाने होती. दोन रांगेच्या मध्यभागी 40 फुटाचा रस्ता देखील पाहायला मिळतो.


• धान्य कोठार

गडाला वेढा पडल्यावर गडावरील रसद संपू नये या दूरदृष्टीतून शिवाजी महाराजांनी गडावर दोन धान्य कोठार तयार करून घेतली होती. त्यात नेहमी मुबलक धान्य साठा असे. पेशवे काळात याच धान्य कोठारांचा उपयोग कैद्यांना डांबून ठेवण्यासाठी केला गेला.


• टकमक टोक

शिवकाळात स्वराज्यातील गुन्हेगारांना टकमक टोकावरून कडेलोटाची शिक्षा दिली जात असे. टकमक टोक जवळपास 2600 फूट खोल आहे. टकमक टोकावर जसजसे आपण समोर जाऊ तस तसा वाऱ्याचा वेग वाढतो आणि रस्ता अरुंद होत जातो.


• हिरकणी कडा

असे सांगितले जाते की सूर्यास्तानंतर गडाचा दरवाजा बंद झाल्या आणि गडावर दूध घालण्यासाठी आलेली हिरकणी नावाची स्त्री आपल्या बाळाच्या ओढीने हाच कडा उतरून खाली गेली होती. तेव्हा शिवरायांनी तिला गडावर बोलवून तीचा सन्मान करून त्या कड्याला हिरकणी असे नाव दिले. त्यानंतर या कड्यावरून पुन्हा कोणालाही खाली जाता येऊ नये म्हणून कड्यावरील खडक तासून कडा अजून भिकट करण्यात आला होता.



रायगड किल्ल्यावरील सर्वात पवित्र स्थळ


•छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी

जगदीश्वराच्या मंदिराच्या उजव्या बाजूला अष्टकोनी चौथऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. ही समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या देखरेखित बांधून घेतलेली आहे. रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर संपूर्ण देह धन्य होऊन जातो.'Raigad fort information maharashtra'

'Raigad fort information maharashtra'
'Raigad fort information maharashtra'






• छत्रपती शिवाजी महाराज की जय •

Post a Comment

0 Comments