The Kerala story movie | द केरळ स्टोरी चित्रपट मराठी
![]() |
'The Kerala story movie' |
'The Kerala story movie' हा चित्रपट सुदीनो सेन यांनी दिग्दर्शित केलेला थ्रीलर चित्रपट आहे. केरळ मधील तीन हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मांतर या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट 5 मे 2023 रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. द केरळ स्टोरी या चित्रपटाची कथा ही इस्लाम धर्म स्वीकारून सिरिया मध्ये सामील झालेल्या तीन मुलींच्या गटाभोवतीच वलय घालणारी आहे.
अदा शर्मा, सोनिया बलानी, योगिता बिहानी आणि सिद्धी इदनानी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सुरुवातीलाच वादात सापडला. हा चित्रपट लव्ह जिहाद सारख्या काल्पनिक गोष्टींवर प्रकाश टाकतो असे सांगत काँग्रेसने या चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध केला होता. तर काही पत्रकारांनी हा जातीय सलोखा नष्ट करणारा चित्रपट असल्याची तक्रार देखील दिली होती. पण केरळ उच्च न्यायालयाने या चित्रपटावरील स्थगितीच्या मागणीला नकार दिला. तर आपण पुराव्यासहित सत्य परिस्थिती मांडली असल्याचा दावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी केला आहे.
चित्रपटाचे नाव - द केरळ स्टोरी 'The Kerala story movie'
दिग्दर्शक - सुदीनो सेन
निर्माते - सनशाइन पिक्चर्स
लेखक - सूर्यपाल सिंग, विपुल शहा, सुदीनो सेन
कलाकार -
आहा शर्मा - शालिनी/फातिमा
सिद्धी इदनानी - गीतांजली
योगिता बिहानी - निमा
सोनिया बलानी - आसिफा
देवदर्शनी - शालिनीची आई
प्रणव मिश्रा, विजय कृष्ण, प्रणय पचौरी
द केरळ स्टोरी चित्रपटाची कथा
टीझर- द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या टीझर मध्ये शालिनी म्हणजेच आहा शर्मा आपली ओळख करून देते. त्यात ती म्हणते की, मला नर्स होऊन लोकसेवा करण्याची खूप इच्छा होती. म्हणून मी तसे मनापासून प्रयत्न चालू केले होते. पण मी आता शालिनी पासून फातिमा बा बनले आहे. मी आता अफगाणिस्तान मध्ये असून, माझ्यासोबत 3200 मुली असून आमचे धर्मांतर झाले आहे. हा मुलींना वाळवंटात नेऊन संपवण्याचा भयानक डाव कोणी रोखेल का? ही माझी कहाणी आणि केरळ ची कहाणी आहे.
तीन मैत्रिणींच्या भोवती फिरणाऱ्या 'The Kerala story movie' या चित्रपटाची अगदी सुरुवातच शालिनी नावाच्या मुलीला अफगाणिस्ताना जवळ पकडून होते आणि तिथेच मुख्य कथेला हात घातला जातो. शालिनी, निमा आणि गीतांजली नावाच्या तीन मुली नर्स होण्यासाठी केरळमध्ये एका शाळेत नर्सिंग शिकण्यासाठी येतात. त्या तिघीही सोबतच वस्तीगृहामध्ये राहायला लागतात. तेव्हा तिथेच त्यांच्यासोबत आसिमा ही मुलगी देखील राहायला लागते. या चौघीही घट्ट मैत्रिणी होऊन राहत असतात. पण आसिमाच्या मनात एक वेगळाच खेळ चालू असतो. हीच आसिमा तिच्या कटाचा भाग म्हणून मैत्रीचा गैरफायदा घेत त्या तिघींना त्यांच्या मूळ धर्मापासून दूर ढकलत त्यांच्या मनात दुसऱ्या धर्माविषयी आकर्षण निर्माण करत असते. त्यातील गीतांजली आणि शालिनी या दोघी तिच्या जाळ्यात पक्क्याच अडकू लागतात. निमा मात्र या सगळ्यापासून दूर राहते. अशाप्रकारे नियोजनबद्ध त्यांचा ब्रेन वाॅश चालू असतो. याचा परिणाम म्हणजे गीतांजली व शालिनी ISIS मध्ये रुजू होतात आणि आपल्या धर्माला विसरून सिरियामध्ये जाण्यास होकार दर्शवतात. पण नंतर गीतांजलीला याचा सुगावा लागतो. तेव्हा ती जीव देण्यास प्रवृत्त होते. शालिनीला सीरियात नेत असताना अतोनात त्रास दिला जातो. तर निमावर वारंवार बलात्कार केले जातात. 'The Kerala story movie'
इस्लामिक देशात गेल्यावर शालिनी गरोदर राहते. असे असतानाच तिला इस्लाम धर्माची माहिती दिली जाते आणि इतर मुलींना देखील यात फसवाण्याचे काम तिच्याकडून पार पाडले जाते.
अशा प्रकारे समाजसेवा करू इच्छिणारी हुशार शालिनी ही इस्लामिक देशात फातिमा बा म्हणून ओळखली जाते. असाच काही काळ लोटल्यावर शालिनीला वास्तवाची जाणीव होऊन ती पुन्हा आपल्या गावी येऊन वडिलांना कवटाळत स्वच्छ विचारांना आपलंस करते.
या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने अगदी उत्कृष्टपणे आपापल्या पात्राला न्याय देण्याचे काम केले आहे.
'The Kerala story movie' ला मिळणारा प्रतिसाद
द केरळ स्टोरी या चित्रपटाचे टीझर आल्यापासूनच या चित्रपटाची चांगली चर्चा होती. तर आता चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक या चित्रपटातील कथा ही आपल्या समाजाचे काळे सत्य आहे; असे म्हणत, हा चित्रपट बघण्याचे भाग्य आम्हाला मिळत आहे. अशी प्रतिक्रिया देत आहेत.
बऱ्याच ठिकाणी या चित्रपटाचे शो हे अनेकांकडून प्रेक्षकांसाठी मोफत दाखवले जात आहेत. जेणेकरून सत्य परिस्थिती लोकांना समजावी हा हेतू यामागे सांगितला जात आहे. 'The Kerala story movie'
अनेक राजकीय नेते देखील या चित्रपटाचे कौतुक करून लोकांना हा चित्रपट आवर्जून बघण्यास सांगत आहेत.
'The Kerala story movie' या चित्रपटाला होणारा विरोध
चित्रपटाच्या टीझर पासूनच वादात सापडलेल्या या चित्रपटाला देशात बऱ्याच जणांकडून विरोध देखील होत आहे. तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 'The Kerala story movie' या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. लव्ह जिहाद सारख्या प्रकरणाला समोर करून समाजात चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत असल्याचे सांगून काँग्रेसने चित्रपटावर आक्षेप घेतला. पुढे हा चित्रपट केरळ विरोधात चुकीची माहिती देत असल्याचे ते म्हणाले.
9 मे रोजी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्याची घोषणा केली. राज्यात शांतता नांदावी म्हणून या चित्रपटाला बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.
महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक पणे फाशी देण्यात यावी असे धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले आहे.
बॉक्स ऑफिस
द केरळ स्टोरी 'The Kerala story movie' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात 8.03 कोटींची भरगोस कमाई करून, हा भारतातील 2023 या वर्षाचा क्रमांक 5 चा ओपनर चित्रपट ठरला आहे. तर अजूनही हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करून चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढवत आहेत.
0 Comments