MPSC मराठी माहिती | MPSC Information in marathi
![]() |
'MPSC Information in marathi' |
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही महाराष्ट्र शासनाद्वारे घेण्यात येणार एक प्रतिष्ठित परीक्षा आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पदासाठी उमेदवारांची निवड करणारी एमपीएससी ही एक शासनाची घटनात्मक संस्था आहे. केंद्र शासनाच्या नागरी सेवा परीक्षेची साम्य दाखवणाऱ्या एमपीएससी या संस्थेमार्फत वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 ची पदे भरली जातात. MPSC एमपीएससी द्वारे अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. अवघड समजल्या जाणाऱ्या या परीक्षेची तयारी करून घेणारे अनेक नामवंत क्लासेस देखील शहरांमध्ये मार्गदर्शन करत आहेत. 'MPSC Information in marathi'
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही एक घटनात्मक संस्था आहे. जी महाराष्ट्र राज्यातील विविध प्रशासकीय आणि नागरी सेवा पदांसाठी उमेदवारांची निवड करत असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अंतर्गत स्थापित, MPSC राज्यामध्ये सक्षम आणि कार्यक्षम प्रशासन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
MPSC म्हणजे काय?
MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग होय. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर 'राज्यसेवा' असे नाव आहे. महाराष्ट्र राज्याचा कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी विविध पदाची भरती काढून उमेदवारांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत केली जाते.
गट अ, ब , क असे एकूण 26 ते 27 प्रकारच्या पदासाठी या संस्थेकडून परीक्षा घेतली जाते. मुंबई येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय असून, इथूनच दरवर्षी परीक्षेचे रणनीती आखली जाते. MPSC या संस्थेमध्ये फक्त राज्य शासनाचा हस्तक्षेप असतो. 'MPSC Information in marathi'
MPSC Full Form in English
Maharashtra Public Service Commission
MPSC ची भूमिका आणि कार्ये
MPSC कडे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
a) राज्य सरकारच्या सेवांमध्ये नियुक्तीसाठी परीक्षा आयोजित करणे. 'MPSC Information in marathi'
b) भरती, पदोन्नती आणि बदल्यांशी संबंधित बाबींवर सरकारला सल्ला देणे.
c) विविध पदांसाठी मुलाखती आणि निवड प्रक्रिया आयोजित करणे.
d) भरतीचे नियम, अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती तयार करणे आणि त्यात सुधारणा करणे.
e) गैरव्यवहाराबाबत विभागीय चौकशी आणि तपास करणे.
MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा
एमपीएससी विविध पदांसाठी उमेदवार निवडण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा घेते.
महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा: ही परीक्षा महाराष्ट्र राज्य सेवांमध्ये गट अ आणि ब पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी घेतली जाते, जसे की उपजिल्हाधिकारी, सहायक पोलिस आयुक्त, तहसीलदार इ.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा: ही सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, इलेक्ट्रिकल इत्यादी विविध विभागांसाठी अभियंत्यांची भरती करण्यासाठी घेतली जाते.
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: ही परीक्षा वन परिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक इत्यादी वन-संबंधित पदांसाठी उमेदवारांची निवड करते. 'MPSC Information in marathi'
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा: कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक इत्यादी कृषी संबंधित पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.
MPSC द्वारे भरली जाणारी पदे
• उपजिल्हाधिकारी
• पोलीस उपअधीक्षक
• तहसीलदार
• गटविकास अधिकारी
• विक्रीकर आयुक्त
• उपमुख्य कार्यकारी अधिकारी
• सहाय्यक संचालक
• राज्य उत्पादन शुल्क अधिकारी
• महानगरपालिका आयुक्त
• लेखाधिकारी
• नायब तहसीलदार
• भूमिअधिक्षक
• सहाय्यक पोलीस आयुक्त
• लिपिक
MPSC पात्रता निकष
MPSC परीक्षांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी काही पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. वेगवेगळ्या परीक्षा आणि पदांसाठी विशिष्ट आवश्यकता भिन्न असू शकतात.
• शैक्षणिक पात्रता
• वयोमर्यादा
• राष्ट्रीयत्व
MPSC साठी शैक्षणिक पात्रता
एमपीएससीच्या परीक्षेला बसण्यासाठी उमेदवाराला मराठी भाषा उत्तमरीत्या बोलता, वाचता, लिहीता यायला हवी.
उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा. 'MPSC Information in marathi'
पदवीच्या अखेरच्या वर्षात असणारे उमेदवार देखील MPSC ची पूर्व परीक्षा देऊ शकतात.
तसेच काही श्रेणीतील पदांसाठी विशेष कौशल्य विकास अभ्यासक्रम व शारीरिक पात्रता असू शकते.
MPSC परीक्षेसाठी लागणारी वयोमर्यादा
एम पी एस सी च्या माध्यमातून अधिकारी होण्यासाठी आयोगाने उमेदवारास काही वयाची मर्यादा निश्चित केलेली आहे.
MPSC च्या परीक्षेसाठी उमेदवार हा किमान 19 वर्षाचा असावा लागतो.
खुल्या गटातील उमेदवार हा जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत या परीक्षेस बसू शकतो.
OBC साठी ही वयाची मर्यादा 43 वर्ष इतकी आहे.
SC-ST/अनुसूचित जाती जमातीसाठी 43 वर्षे, खेळाडूसाठी 43 वर्षे, दिव्यांग उमेदवार 45 वर्षे तर माजी सैनिक वयाच्या 48 वर्षांपर्यंत एमपीएससीची परीक्षा देऊ शकतात.
एमपीएससी अभ्यासक्रम MPSC Exam Syllabus
• भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
• भूगोल (जगाचा,भारताचा,महाराष्ट्राचा)
• राज्यघटना, नागरिकशास्त्र
• सामान्य ज्ञान
• अंकगणित, बुद्धिमत्ता
• मराठी
• इंग्रजी
MPSC परीक्षेचे स्वरूप
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे परीक्षेचे स्वरूप होय. उमेदवारांना परीक्षा स्वरूप माहीत असेल तर त्याला अभ्यासाचे नियोजन करून परीक्षेस सामोरे जाण्यास नक्कीच मदत होत असते.
MPSC द्वारे घेण्यात येणारी प्रत्येक परीक्षा विशिष्ट पॅटर्न आणि अभ्यासक्रमानुसार घेतली जाते. 'MPSC Information in marathi' यात सहसा दोन किंवा तीन टप्पे असतात. ज्यात प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असतो.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया ही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा एकूण तीन टप्प्यात पार पडते.
पूर्व परीक्षा
MPSC एमपीएससीची मुख्य परीक्षा देण्यासाठी अगोदर आयोगाच्या पूर्व परीक्षेत पात्र व्हावे लागते. पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात असणारे उमेदवार MPSC ची पूर्व परीक्षा देऊ शकतात.
वर आधारित दोन पेपर घेतले जातात. हे २०० मार्कांचे पेपर सोडविण्यासाठी प्रत्येकी दोन तासांचा वेळ दिला जातो. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग पध्दत देखील अवलंबली जाते.
पेपर 1
प्रश्न गुण वेळ
100 200 2 तास
पेपर 2
प्रश्न गुण वेळ
80 200 2 तास
मुख्य परीक्षा
पूर्व परीक्षा पास झालेले उमेदवार हे एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरत असतात. ही मुख्य परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे म्हणजे त्याच्याकडे पदवीचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
मुख्य परीक्षेसाठी आयोगाकडून 800 गुणांचे एकूण सहा पेपर घेतले जातात. 'MPSC Information in marathi'
पेपर 1 - या पेपर मध्ये मराठी व इंग्रजी निबंध संबंधी 100 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. हा पेपर सोडवण्यासाठी एकूण 3 तासांचा वेळ दिला जातो.
पेपर 2 - पेपर क्रमांक दोन मध्ये मराठी व इंग्रजी विषयावरील व्याकरणावर आधारित एकूण 100 गुणांकरीता बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. त्याकरिता 2 तासांच्या वेळ असतो.
पेपर 3 - या पेपरमध्ये सामान्य अध्ययन इतिहास व भूगोल या विषयावरील 150 मार्कांसाठी प्रश्न विचारलेले असतात; त्यासाठी 2 तासांचा वेळ दिला जातो.
पेपर 4 - पेपर चार मध्ये भारतीय संविधान व राजकारणावर आधारीत 150 गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी 2 तासांचा वेळ दिला जातो.
पेपर 5 - हा पेपर मध्ये 2 तासांचा वेळ देऊन 150 गुणांसाठी मानवाधिकार व मानव संसाधन या विषयावरील बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात.
पेपर 6 - या पेपर मध्ये सामान्य अध्ययन अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर आधारित 150 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी 2 तासांचा वेळ दिला जातो.
मुलाखत
एमपीएससी उत्तीर्ण होण्यासाठीचा शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत होय. पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणारा उमेदवार हा मुलाखतीसाठी पात्र असतो.
मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखत ही अंतिम निवडीसाठी महत्त्वपूर्ण असते.
मुलाखतीसाठी एकूण 100 गुण असतात. शंभर गुणांच्या मुलाखतीमध्ये उमेदवाराचे व्यक्तिमत्व, विचार क्षमता, निर्णय क्षमता, संवाद कौशल्य, ज्ञान तपासले जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा शेवटचा आणि अवघड समजला जाणारा मुलाखत हा टप्पा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून नोकरीमध्ये रुजू केले जाते.
MPSC ची परीक्षा किती वेळा देता येते
एमपीएससी परीक्षा देण्यासंदर्भात आयोगाने आता काही बंधनं घातली आहेत.
खुल्या गटातील उमेदवार ही परीक्षा 6 वेळा देऊ शकतो.
मागासवर्गीय उमेदवार 9 वेळा या परीक्षेत बसू शकतो.
SC-ST च्या उमेदवारांसाठी कोणतेही बंधनं नसून, ते उमेदवार कितीही वेळा mpsc ची परीक्षा देऊ शकतात.
MPSC अर्ज प्रक्रिया
एमपीएससी mpsc ची अर्ज प्रक्रिया ही प्रामुख्याने ऑनलाइन केली जाते. उमेदवारांनी अधिकृत MPSC वेबसाइटवर नोंदणी करणे, अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्ज फी भरणे आवश्यक आहे. 'MPSC Information in marathi'
MPSC परीक्षेच्या तयारीची रणनीती
MPSC परीक्षांच्या तयारीसाठी परिश्रमपूर्वक नियोजन आणि पद्धतशीर अभ्यास आवश्यक आहे.
![]() |
'MPSC Information in marathi' |
उमेदवारांनी संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करण्यावर, संबंधित पुस्तके, मागील प्रश्नपत्रिका आणि मुलाखतीचा सराव करण्यावर भर द्यावा. मार्गदर्शन आणि सरावासाठी कोचिंग संस्था किंवा ऑनलाइन टेस्ट मध्ये सामील होणे देखील उमेदवारास उपयुक्त ठरू शकते. |
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ
www.mpsc.gov.in
निष्कर्ष
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही एक प्रतिष्ठित संस्था आहे. जी महाराष्ट्र राज्यातील विविध प्रशासकीय आणि नागरी सेवा पदांवर करिअरच्या संधी देते. MPSC ची भूमिका, परीक्षा प्रक्रिया आणि तयारीची रणनीती समजून घेऊन, इच्छुक उमेदवार त्यांच्या यशाची पूर्तता करू शकतात. तुम्हाला या प्रतिष्ठित पदांवरून महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याची आवड असल्यास, MPSC परीक्षा ही सार्वजनिक सेवेतील परिपूर्ण भविष्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. 'MPSC Information in marathi'
0 Comments