तोरणा किल्ला मराठी माहिती | Torna fort information in marathi
![]() |
'Torna fort information in marathi' |
तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.
पुणे शहरापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये तोरणा किल्ला आहे. पुण्यातील अतिदुर्गम आणि अतिविशाल किल्ला म्हणून तोरणा किल्ला ओळखला जातो.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे जवळ सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून दोन पदर फुटून समोर गेले आबेत. त्यातील एका पदरावर तोरणा किल्ला वसलेला आहे. 'Torna fort information in marathi'
दुसऱ्या पदरावर राजगड किल्ला आहे. राजगड असलेल्या या दुसऱ्या पदाला भुलेश्वराची रांग देखील म्हटले जाते.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर उंच डोंगरावर 18.276 उत्तर अक्षांश व 73.613 पूर्व रेखांश वर तोरणा किल्ला आहे.
वेळवंडी नदी आणि कानद नदीच्या खोऱ्यांनी तोरणा किल्ल्याला नैसर्गिक सौंदर्य भरभरून बहाल केले आहे. या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला तोरणा किल्ला अजूनच सुंदर दिसू लागतो.
शौर्य, पराक्रम, शिवविचार बरोबरच साक्षात छत्रपतींच्या स्वराज्य विचारांचा पहिला साक्षीदार झालेला तोरणा म्हणजेच प्रचंड गड किल्ला हा आज देखील शिवविचार छातीवर घेऊन उभा आहे.
पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर, राजगडाच्या शेजाराला असलेल्या तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेला कानद खिंड आणि पूर्व दिशेला बामन व खरीव खिंडी आहेत.
वेल्हे गावाजवळ सह्याद्रीच्या डोंगरात उभा असलेला तोरणा किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून, तोरणा किल्ल्याची उंची ही साधारण 1400 मीटर इतकी आहे.
स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647 मध्ये सामील करून घेतलेला तोरणा म्हणजेच प्रचंडगड किल्ल्यावरून राजगड किल्ला, सिंहगड किल्ला, रायगड किल्ला, पुरंदर किल्ला, लिंगाणा किल्ला हे किल्ले देखील दिसतात. 'Torna fort information in marathi'
तोरणा किल्ल्याचे स्थान
पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला अंदाजे 60 किलोमीटर अंतरावर, सह्याद्रीच्या डोंगर रांगेत तोरणा किल्ला वसलेला आहे.
महाराष्ट्रातील पुणे शहरापासून रस्त्याने वेल्हे मार्गे तोरणा किल्ला चांगला जोडलेला आहे.
तोरणा किल्ल्याचा प्रवास हा घाटवळणाच्या गावांमधून जात असल्यामुळे तोरणा किल्ला निसर्ग रम्य वातावरणात रमून जाण्याबरोबर आपल्याला पराकोटीचा आनंद देतो.
तोरणा किल्ल्याचा इतिहास
पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरात उभा असलेला, आभाळाला गवसणी घालणारा तोरणा किल्ला हा नेमका कुणी बांधला याचा स्पष्ट पुरावा इतिहासामध्ये उपलब्ध नाही. 'Torna fort information in marathi'
तोरणा किल्ल्यावर असलेल्या लेण्या आणि मंदिरांच्या अवशेषावरून हा किल्ला पूर्वी शैवपंथाचा एक आश्रम असावा असा अंदाज इतिहासकारांकडून लावला जातो.
इतिहासातील अस्पष्ट पुराव्यानुसार इसवी सन 1470 ते इसवी सन 1486 या दरम्यान मलिक अंबर याने हा तोरणा किल्ला जिंकून घेऊन बहमनी राजवटीच्या सत्तेखाली आणला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकण्यापूर्वी हा किल्ला निजामशाहीत होता.
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली.
स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांचया मदतीने तोरणा किल्ला जिंकून घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले.
स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा किल्ला हा पहिला किल्ला होय.
वयाच्या 16 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता.
छत्रपती शिवाजी महाराज हे तोरणा किल्ल्याची पाहणी करत असताना तोरणा किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले.
तोरणा किल्ला जिंकल्यानंतर गडावर सापडलेल्या गुप्तधनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधण्यासाठी केला असे सांगितले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यावर काही इमारती बांधून घेतल्या. 'Torna fort information in marathi'
मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये तोरणा किल्ल्याचा समावेश नव्हता.
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर त्यांनी स्वराज्यातील बऱ्याच किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला. त्यात तोरणा किल्ल्यावर 5 हजार होन इतका खर्च करून तोरणा किल्ला नव्याने बांधून घेतला.
बराच काळ स्वराज्यामध्ये असलेला तोरणा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघलांकडे गेला.
मोगलांच्या ताब्यात गेलेला हा तोरणा किल्ला शंकराजी नारायण या सचिवाने परत स्वराज्यामध्ये सामील करून घेतला.
इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने तोरणा किल्ल्याला वेढा देऊन लढाई करून तोरणा किल्ला जिंकून घेतला.
औरंगजेबाने तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्याचे नाव बदलून फुतूउल्गैब असे ठेवले. याचा अर्थ दैवी विजय असा होतो.
चार वर्षे औरंगजेबाच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला 1708 मध्ये पुन्हा सरसेनापती नागोजी कोकाटे यांनी शिताफीने तोरणा किल्ल्यावर आपली माणसे पाठवून तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. याच्यानंतर तोरणा किल्ला हा शेवटपर्यंत मराठ्यांच्या ताब्यात म्हणजे स्वराज्यामध्ये राहिला.
असे सांगितले जाते की औरंगजेबाने मराठ्यांशी लढाई करून जिंकलेला तोरणा हा एकमेव किल्ला असावा.
तोरणा किल्ला फोटो
![]() |
तोरणा किल्ला फोटो |
तोरणा किल्ल्यावररील पाहण्यासारखी ठिकाणे
• तोरंजाई देवी मंदिर
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत तोरणा किल्ला जिंकून घेतला.
जिंकलेल्या तोरणा किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही कामगारांची नेमणूक केली.
तोरणा किल्ल्याची डागडुजी करत असताना कामगारांना गडावरती 22 सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे सापडले. त्या ठिकाणीच छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरंजाई देवीचे मंदिर बांधून घेतले.
तोरणा किल्ल्यावर गेल्यानंतर कोठी दरवाजाच्या समोर एक छोटेसे मंदिर पाहायला मिळते. हेच ते तोरणजाई देवीचे मंदिर होय. 'Torna fort information in marathi'
• मेंगाई देवी मंदिर
तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचे एक प्राचीन मंदिर आहे.
या मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या वेल्हा गावचे लोक नवरात्र मध्ये मेंगाई देवी च्या मंदिरासमोर उत्सव साजरा करतात.
तोरणा किल्ला पाहण्यासाठी गेलेले पर्यटक, किल्लाप्रेमी हे मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये आराम करू शकतात.
• झुंजार माची
तोरणा किल्ल्यावरील दिंडी दरवाजाच्या खालच्या भागाला झुंजार माची पाहायला मिळते.
झुंजार माची पाहण्यासाठी तोरणा किल्ल्यावरील हनुमान बुरुजापासून, मेंगाई देवीच्या मंदिराच्या बाजूने, दिंडी दरवाज्यातून झुंजारमाची पाहण्यासाठी जाता येते.
पावसाळ्यामध्ये झुंजारमाची वर सर्वत्र दाट धुके पसरलेले असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जाणे धोक्याचे ठरू शकते.
• बुधला माची
तोरणा किल्ल्यावर किल्ल्याच्या पश्चिम भागाला बुधला माची आहे. 'Torna fort information in marathi'
बुधला माची वरील पायरे दरवाजातून तोरणा किल्ला पाण्यासाठी सहजपणे जाता येते.
तोरणा किल्ल्यावरून राजगडावर जाण्यासाठी मुधलामाची वरील भगत दरवाजातून रस्ता आहे. या रस्त्याने आपण तोरणा किल्ला पार करून राजगड किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो.
• तोरनेश्वर मंदिर
तोरणा किल्ल्यावर पूर्वी महादेवाला समर्पित तोरणेश्वराचे मंदिर होते.
तोरणा किल्ल्यावरील मेंगाई देवीच्या मंदिराच्या बाजूला हे तोरणेश्वराचे मंदिर असल्याचे सांगितले जाते.
आज त्या ठिकाणी त्या मंदिराचे भग्न अवशेष आहेत.
तोरणा किल्ला ट्रेकिंग
सह्याद्रीच्या डोंगर रांगेत निसर्गाच्या सुंदर भागात असलेल्या तोरणा किल्ल्याचा ट्रेक हा ट्रेकर लोकांसाठी एक आनंददायी अनुभव देणारा ट्रेक आहे.
घनदाट जंगले, खडकाळ प्रदेश, अडवळणाच्या पायवाटा मधून जाणारा आणि शांततेने परिपूर्ण असलेला रस्ता हा तोरणा किल्ल्याच्या ट्रेकिंग साठी अल्लाददायक आहे.
आपण तोरणा किल्ल्यावर 'Torna fort information in marathi' जसजसे वर जाऊ तसतसे तोरणा किल्ल्याच्या आजूबाजूला असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतांचे, टेकड्यांचे विविधांगी रंग आणि सुंदर दृश्य बघायला मिळते.
तोरणा किल्ल्याची वास्तू कला
उंच डोंगरावर स्थित असलेला तोरणा किल्ल्याच्या शिखरावर त्याच्या स्थापत्य कलेच्या अवशेषांमधून स्वराज्य कालीन इतिहास जिवंत पाहायला मिळतो.
तोरणा किल्ल्याचे प्रवेशद्वार, दरवाजे, बुरुज, तटबंदी, मंदिरे, बालेकिल्ल्याची अवशेष तोरणा किल्ल्याच्या वैभवशाली आणि गौरवशाली ऐतिहासिक भुतकाळाच्या कथा सांगू लागतात.
तोरणा किल्ल्यावरील अवशेष पाहून शतकानू शतके असलेला, निसर्गाचा चमत्कार असलेला पूर्ण तोरणा किल्ला आपण अनुभवू शकतो.
तोरणा किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य
तोरणा किल्ला ऐतिहासिक घटनांशिवाय नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आणि नैसर्गिक सौंदर्य छातीवर घेऊन अभिमान बाळगणारा किल्ला आहे.
डोंगर, दऱ्या, हिरवीगार झाडी असलेला जंगली परिसर, धुक्याने अच्छादलेले छोटे-मोठे डोंगर-टेकड्या आणि डोंगरावरून दरीमध्ये कोसळणाऱ्या धबधब्यांचे विहंगम दृश्य हे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय आठवण देऊन जाते.
निसर्ग प्रेमी, पक्षीप्रेमी, फोटोग्राफर्स आणि एकूणच पर्यटकांना तोरणा किल्ल्याच्या सभोवतालचा रमणीय परिसर फिरून शांततेचा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद मनसोक्त भेटू शकतो. 'Torna fort information in marathi'
तोरणा किल्ल्याला भेट देण्याची योग्य वेळ
तोरणा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे पावसाळ्याच्या नंतर सप्टेंबर महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत आणि हिवाळ्यामध्ये डिसेंबर महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा काळ हा उत्तम मानला जातो.
पावसाळ्याच्या नंतरचे आणि हिवाळ्यामध्ये हवामान हे तोरणा किल्ल्याला भेट देण्यासाठी आरामदायी आणि आनंददायी असते.
पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये किल्ला चढण्यासाठी विविध अडचणी येऊ शकतात.
तोरणा किल्ल्यावर कसे जावे
तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे, पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे.
पुणे स्वारगेट येथून बसणे वेल्हे येथे उतरून बिनी दरवाजातून तोरणा किल्ल्यावर जाता येते.
पुणे येथून नरसापुर मार्गे व पानशेत मार्गे वेल्हे येथे जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत. 'Torna fort information in marathi'
तोरणा किल्ल्याला मुंबईहून कसे जावे
मुंबईवरून तोरणा किल्ल्याला जाण्यासाठी प्रथम ट्रेनने किंवा बस पकडून पुण्याला यावे.
पुणे येथून स्वारगेट वरून बस पकडून वेल्हे येथे जावे, व नंतर वेल्हे येथून तोरणा किल्ला चढावा.
मुंबई-पुणे-वेल्हे हा मार्ग मुंबईहून तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे.
FAQ
तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
- पुणे
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
- तोरणा किल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले?
- प्रचंडगड
पुण्यापासून तोरणा किल्ल्याचे अंतर किती आहे?
- 60 किलोमीटर
0 Comments