डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | Ambedkar Jayanti

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | Ambedkar Jayanti

'Ambedkar Jayanti'
'Ambedkar Jayanti'




डॉ. बाबासाहेब म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर आणि आईचे नाव भीमाबाई आंबेडकर होते. 14 एप्रिलला म्हणजेच भीम जयंतीच्या दिवशी अनेक राज्यात शासकीय सुट्टी असते. 'Ambedkar Jayanti'


बाबासाहेबांची पहिली सार्वजनिक जयंती ही 14 एप्रिल 1928 ला पुण्यातील त्यांचे अनुयायी असलेले सदाशिव रणपिसे यांनी साजरी करून बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीतून मिरवली. आज 100 पेक्षा जास्त देशांमध्ये डॉ. बाबासाहेब यांची जयंती साजरी केली जाते.


'Ambedkar Jayanti' 14 एप्रिल रोजी दिल्ली येथील भारतीय संसदेत देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते, केंद्रीय मंत्री आणि इतर सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन करतात. बाबासाहेबांचे अनुयायी भीम जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांची जन्मभूमी, चैत्यभूमी, दीक्षाभूमी, बुद्ध विहार, गाव, शहरे, शाळा, महाविद्यालय अशा अनेक ठिकाणी अभिवादन करण्यासाठी एकत्र येत असतात. संबंध देशांमध्ये या दिवशी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून बाबासाहेबांच्या विचारांचे प्रबोधन केले जाते. ढोल ताशांच्या गजरात बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते. शाळा महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून मुलांना प्रोत्साहन दिले जाते.


भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांची प्रतिमा असलेले 1 रुपयाचे नाणे तर 2015 मध्ये 125 व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांची प्रतिमा असलेले 125 रुपयांची नाणी काढली होती.'Ambedkar Jayanti'


भारतीय टपालाने 1966, 1973, 1991, 2001, 2013 या सालांमध्ये बाबासाहेबांच्या जयंती निमित्त विशेष टपाल तिकीट काढले होते. 


2017 पासून 14 एप्रिल हा बाबासाहेबांचा जन्म दिवस ज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच हा दिवस समता दिवस म्हणून देखील साजरा करण्यात येतो. 

संयुक्त राष्ट्राने बाबासाहेबांचा विश्व प्रणेता म्हणून गौरव केला.

'Ambedkar Jayanti'

भारत देशाला जगातील सर्वात मोठे संविधान देऊन भारताची लोकशाही मजबूत करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा जन्मदिन हा भारतातील प्रत्येक माणसासाठी एका सणासारखा आहे. संपूर्ण देशात हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. 

ज्ञानाचा महासागर असणाऱ्या बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज बांधवांच्या उद्धारासाठी खर्ची घातले. बाबासाहेब हे सदैव न्याय, समानता आणि हक्कासाठी लढत राहिले. दलित समाजासाठी बाबासाहेबांनी खूप मोठी चळवळ उभी करून त्यांच्या न्याय हक्कासाठी बाबासाहेबांनी शेवटपर्यंत लढा दिला. म्हणूनच बौद्ध समाजातील प्रत्येक घरात 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते.


 भारत देशासाठी बाबासाहेबांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना 1990 ला मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. 


वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा मुलगा भारतीय संविधानाचा शिल्पकार होतो आणि आज त्यांच्या विचारांवर भारतीय लोकशाही टिकून आहे.'Ambedkar Jayanti'


जगभर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव होत असताना भारत देश अभिमानाने बाबासाहेब हे आमच्या देशात जन्माला आल्याचे सांगतो.


 'Ambedkar Jayanti' भीम जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments