मराठी मुलुख महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग Five Jyotirlinga In Maharashtra

 मराठी मुलुख महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग 'Five Jyotirlinga In Maharashtra'

'Five Jyotirlinga In Maharashtra'
'Five Jyotirlinga In Maharashtra'


 



'Five Jyotirlinga In Maharashtra' ज्योतिर्लिंग म्हणजेच भगवान शंकराची पवित्र मंदिर होय. भारत देशात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत. त्यातील 5 ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहेत; ही महाराष्ट्राची पुण्याईच म्हणावी लागेल.

भगवान शंकराचे म्हणजेच महादेवाचे अगदी साधेभोळे रूप गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, फणा काढलेला नागराज, हातात त्रिशूल-डमरू, डोक्यावरील जटांमध्ये वसलेली गंगा माता, विष प्राशन केलेला निळा कंठ या अखंड विश्वाला तेजस्वी बनवणाऱ्या रूपात भगवान शंकर प्रत्येकाला आपलेसे वाटतात. 

महादेवाच्या पिंडीवर बेलपाणाचा अभिषेक करण्यासाठी श्रावणात कोसळणाऱ्या रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत, अनवाणी पायाने चालत, रानावनात हिंडत डौलदार हिरवळलेला पांदण रस्ता तुडवत आणलेला बेल श्रावण सोमवारी, भल्या पहाटे उठून प्रसन्नतेने गजबजलेल्या रावळात जाऊन महादेवाच्या पिंडीवर डोकं टेकवत बेलपानं वाहताना मनाला होणारा निरागस आनंद हा माणसाला नवीन उभारी घेण्यास बळ देतो. 'Five Jyotirlinga In Maharashtra'


जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले

गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌। 

डमड्डमड्डमड्डमनिनादवड्डमर्वयं

चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम ॥

हे रावण रचित तांडव स्तोत्र तर माणसाच्या नेभळट मनाची जळमटे झटकून, मानवी देह नवचैत्यण्याने ओसांडून वाहायला लागतो. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी भाविक भक्त गर्दी करून उत्सव साजरा करत असतात.


हे आहेत महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग


• घृष्णेश्वर - छत्रपती संभाजीनगर

'Five Jyotirlinga In Maharashtra'
'Five Jyotirlinga In Maharashtra'

भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर हे बारावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. छत्रपती संभाजी नगर पासून 30 किलोमीटर तर दौलताबाद पासून अगदी ११ किलोमीटरवर वेरूळच्या लेण्याजवळ घृष्णेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडात आढळून येते. मंदिराचे शिखर हे पाच स्तरात विभागलेले असून मंदिरातील खांबांवर सुंदर कोरीव नक्षीकाम बघायला मिळते. मंदिराच्या गाभ्यात शिवलिंग असून तिथेच नंदीची मूर्ती देखील आहे. भारतीय वास्तुकलेचे उत्तम उदाहरण या मंदिरात आढळून येते.

मंदिरापासून साधारण 50 मीटर अंतरावर शिवालय नावाचे एक जलकुंड देखील आहे. या जलकुंडाचे बांधकाम दगडाचे असून त्यात आठ महादेवाची मंदिरं देखील आहेत. 

मंदिराचे बांधकाम साधारण 13 व्या शतकापूर्वीचे असावे असे मानले जाते. तर 16 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पुढे 18 व्या शतकात होळकर घराण्याने या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला. 'Five Jyotirlinga In Maharashtra'

घृष्णेश्वराच्या मंदिरासंदर्भात घृष्णा स्त्रीच्या पुत्र प्राप्तीची एक पौराणिक आख्यायिका देखील सांगितले जाते.


• औंढा नागनाथ - हिंगोली

'Five Jyotirlinga In Maharashtra'
'Five Jyotirlinga In Maharashtra'

मराठवाड्यातील तीन आणि महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगा पैकी एक म्हणजे औंढा नागनाथ हे होय. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे भारतातील आठवे जोतिर्लिंग आहे. 

काळ्या पाषाणातील नक्षीदार, कोरीव बांधकाम हे प्राचीन कला कौशल्याचे उत्तम उदाहरण असलेले हेमाडपंथी मंदिर आहे. 5000 वर्षांपूर्वीच्या या मंदिराला मुख्य तीन दरवाजे आहेत आणि मंदिरात शिवलिंग असलेला भाग हा जमिनीच्या खाली आहे. मध्ययुगातील आक्रमणामुळे या मंदिरावरील नक्षीकाम असणारे हत्ती घोडे आणि असे सुंदर बांधकाम असणारा बराच भाग उध्वस्त झालेला दिसतो.

 प्राचीन काळात येथील दारूक आणि दारूका या राक्षसांचा इतिहास सांगितला जातो; म्हणून हे पूर्वी दारूकावन म्हणून प्रसिद्ध होते. तसेच या मंदिराला पांडवकालीन आणि यादवकालीन इतिहास देखील सांगितला जातो. 

मंदिराच्या आवारात संत नामदेव महाराजांचे मंदिर देखील आहे. त्याची एक आख्यायिका देखील येथील जेष्ठांकडून सांगितली जाते. असे म्हणतात की संत नामदेव महाराजांना मंदिरातील पुजारांनी खालच्या जातीचा आहे असे सांगून भजन करण्यास विरोध केला आणि अपमानित केले. तेव्हा नामदेव महाराज मंदिराच्या मागे बसून भजन आणि गायन करत असता साक्षात शिवशंकराने मंदिराचे मुख फिरविले आणि नामदेव महाराजांचे भजन ऐकले. तिथेच आता संत नामदेव महाराजांचे मंदिर उभे केले आहे.

 दरवर्षी जगभरातून हजारो भाविक औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी येत गर्दी करत असतात.


• परळी वैद्यनाथ - बीड

'Five Jyotirlinga In Maharashtra'
'Five Jyotirlinga In Maharashtra'

परळी वैद्यनाथ हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग आहे. 

परभणी पासून 60 किलोमीटर आणि अंबाजोगाई पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेले बीड जिल्ह्यातील हे प्राचीन मंदिर देवगिरीच्या यादवांनी बांधलेले आहे. लांबलचक पायऱ्या आणि भलेमोठे प्रवेशद्वार हे भाविकांना आकर्षित करण्याचे मुख्य कारण होय. मंदिर आणि सभा मंडप हा समान पातळीवर असल्याकारणाने आपण मंदिरातील वैद्यनाथाचे दर्शन बाहेरून देखील सहज घेऊ शकतो. भव्य दिव्य असणारे हे मंदिर बांधण्यासाठी अठरा वर्षे लागले असल्याचे सांगितले जाते. 

वैद्यनाथ मंदिराच्या बाबतीत पौराणिक कथा सांगायची झाली तर - राजा रावण हा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हिमालयात जाऊन तापचर्या करत असतो; तेव्हा शंकर महादेव त्याला प्रसन्न होतात आणि वर मागण्यास सांगतात. तेव्हा रावण महादेवाला लिंगाच्या रूपात लंकेत राहण्यास सांगतो. प्रसन्न झालेले महादेव दैवी शक्ती देऊन शिवलिंग कुठेही न टेकता रावणाला घेऊन जायला सांगतात. रावण कावडीतून शिवलिंग घेऊन जात असताना वाटेत रावणाला लघुशंका येते आणि तो शिवलिंग खाली ठेवतो. तेव्हा ते लिंग तेथेच स्थापन झाल्याचे सांगतात.

 'Five Jyotirlinga In Maharashtra' तर एकदा राक्षसांच्या अमृत मंथनातून धन्वंतरी आणि अमृत यांच्यासह चौदा रत्न बाहेर आली होती. आमृत घेण्यासाठी राक्षस जवळ जातात शिवलिंगातून ज्वाला उसळू लागल्या. पण त्या शिवलिंगाला जेव्हा शिवभक्तांनी स्पर्श केला तेव्हा त्यातून अमृत प्रवाहित झाले. असं म्हणतात ते हेच वैद्यनाथाचे शिवलिंग होय.


• भीमाशंकर - पुणे

'Five Jyotirlinga In Maharashtra'
'Five Jyotirlinga In Maharashtra'

सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत घनदाट जंगलात वसलेले पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे भारतातील सहावे ज्योतिर्लिंग आहे. निसर्गसौंदर्याने सजलेलं आणि सह्याद्रीच्या उंच डोंगरात वसलेलं हे हेमाडपंथी शंकराचे मंदिर फार जुन्या काळातील आहे. मंदिरातील आतील भाग आणि उभी असलेली खांब ही सुंदर नक्षीकामाने नटलेली आहेत. तसेच मंदिरावर दशावतार कोरलेले पाहायला मिळतात.

भीमाशंकराच्या सभामंडपात एक भली मोठी लोखंडी घंटा आहे. या घंटेवर 1729 अशी नोंद आहे. मंदिरातील शिवलिंगात भीमा नदीचा गुप्त उगम झालेला आहे. पुढे ती गुप्त भीमा नदी मंदिराच्या बाहेर साधारण एक ते दीड किलोमीटर लांब जाऊन पुन्हा प्रत्यक्षात उगम पावते. याच भीमाशंकर आरण्यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू खार आढळते. 'Five Jyotirlinga In Maharashtra'

 पूर्वी छत्रपती घराण्यातील मंडळी नेहमी या भीमाशंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असत.

शिवपुराणातील कथेनुसार कुंभाकर्णाची पत्नी कर्कटीला एक भीम नावाचा राक्षस मुलगा होता. आपले वडील कुंभकर्ण हे रामाकडून मारले गेले असल्याचे सत्य त्याला कालांतराने समजले. बदला घेण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि दैवी शक्तींनी अंगीकृत झाला. वरदान भेटल्यानंतर तो अहंकारी होऊन सगळीकडे उन्माद माजू लागला. तेव्हा भगवान शंकराने त्याच्याशी युद्ध करून त्याला भस्म केले. आणि विश्व रक्षणासाठी महादेव तेथेच स्थापित झाले. भगवान शंकराने भीमाची युद्ध केल्याने ते भीमाशंकर म्हणून प्रचलित आहे असं सांगितलं जातं.


• त्र्यंबकेश्वर - नाशिक

'Five Jyotirlinga In Maharashtra'
'Five Jyotirlinga In Maharashtra'

नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. 

पुरातन काळात काळ्या शिळेपासून बनलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराला चार दिशांना चार दरवाजे आहेत. तसेच पूर्वेला सभामंडप आहे. उत्तम स्थापत्य कलेने नटलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात अंगठ्याच्या आकाराची तीन शिवलिंग आहेत. गाभाऱ्यात असणाऱ्या तीन शिवलिंगामुळे मंदिराला एक वेगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. जवळच असणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वतातून दख्खनची गंगा म्हणून प्रसिद्ध असलेली गोदावरी नदी उगम पावते. तसेच येथील कुशावर्ता स्नान करण्यासाठी भाविक नेहमीच गर्दी करत असतात.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू निवृत्तीनाथांची समाधी देखील आहे.'Five Jyotirlinga In Maharashtra'

 ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर, प्राचीन काळातील त्र्यंबक हे महर्षी गौतम ऋषींची तपोभूमी होय. एके दिवशी गौतम ऋषींच्या हातून एका कमजोर गाईची हत्या झाली; तेव्हा दुःखी झालेल्या ऋषींनी या पापातून मुक्त होण्यासाठी कठोर तपश्चर्या करत सर्व अग्निपरीक्षा पूर्ण केल्या आणि गंगा मातेला प्रगट करून भगवान शिवशंकराला तेथे स्थापित व्हायला भाग पाडले.




आशा करतो की महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाची माहिती देणारा 'Five Jyotirlinga In Maharashtra' हा लेख नक्कीच तुम्हाला आवडला असेल.



Post a Comment

0 Comments