हरीहर किल्ला मराठी माहिती | Harihar fort information in marathi

हरीहर किल्ला मराठी माहिती | Harihar fort information in marathi

'Harihar fort information in marathi'
'Harihar fort information in marathi'


हरिहर किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक जवळ हर्षवाडी गावाजवळ सह्याद्रीच्या मध्यभागी वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे. 'Harihar fort information in marathi'

गिरिदुर्ग प्रकारात मोडणाऱ्या हरीहर किल्ल्याची उंची ही साधारण 3676 फूट इतकी आहे.

वैतरणा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या हरीहर किल्ल्याला चौफेर बेलाग असा कातळकडा आहे. 

हरिहर किल्ला चढण्यासाठी चित्तथरारक अनुभव देणारा असून, किल्ला चढणीच्या खडक कोरून केलेल्या पायऱ्या ह्या 80 अंशात आहेत.

हरीहर किल्ल्याला कातळ कोरलेल्या अंदाजे 125 च्या आसपास दगडी पायऱ्या आहेत. या कातळ पायऱ्या चढून हरीहर किल्ल्यावर जावे लागते.

हिरीहर किल्ला हा गिर्यारोहकांसाठी एक महत्त्वाचा किल्ला आहे. अनेक गिर्यारोहक वर्षभर हरीहर किल्ल्यावर चढाई करत असतात. किल्ल्यावरून आसपासच्या परिसरातील विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पडत्या पावसात पर्यटक गर्दी करत असतात. 'Harihar fort information in marathi'

हरिहर किल्यावर हनुमान मंदिर, वेताळ मंदिर, महादेवाची पिंड, नंदी असे किल्ल्याला धार्मिक वलय प्राप्त करून देणाऱ्या वस्तू देखील आहेत.

हरीहर किल्ल्याच्या कातळ पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक छोटा तलाव लागतो, याच तलावाच्या काठावर हनुमानाचे मंदिर आहे. तसेच किल्ल्यावर अजूनही चार ते पाच पाण्याच्या काळ्या खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत; ज्या किल्ल्यावर पाण्याची सोय करतात.

हरिहर किल्ल्याच्या दक्षिण दिशेला वैतरणा नदीचे खोरे असून पूर्वेला ब्रम्हगिरी पर्वताच्या डोंगररांगा दिसतात.

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या अगदी मधोमध स्थित असलेला ऐतिहासिक हरिहर किल्ला हा नाशिक जिल्ह्यात आहे.

हरिहर किल्ला इतिहास, शौर्य आणि निसर्ग सौंदर्याचा भरभरून खजिन आहे. त्यामुळे हरीहर किल्ल्याला एकदा भेट दिलीच पाहिजे.

स्थापत्य कलेचे आश्चर्यकारक उदाहरण असलेले ऐतिहासिक रत्न म्हणून हरीहर किल्ला अभिमानाने उभा आहे. हरीहर किल्ला हा पर्यटक, ट्रेकर आणि अभ्यासकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देतो.

हरिहर किल्ला हा प्राचीन काळातील स्थापत्यशास्त्र, पराक्रम यांचा पुरावा म्हणून आकाशाला गवसणी घालत उभा आहे.


हरीहर किल्ला कुठे आहे?


हरिहर किल्ला हा नाशिक पासून 60 किलोमीटर आणि इगतपुरी पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगेत मध्यभागी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर हरीहर किल्ला असून, निरपूडपाडा आणि हर्षवाडी हे हरीहर किल्ल्याच्या पायथ्याचे गावे आहेत.

हरीहर किल्ल्यापासून ब्रम्हगिरी पर्वत व संत निवृत्तीनाथ यांची समाधी ठिकाण काही अंतरावर आहे.



हरीहर किल्ल्याचा इतिहास


नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला, ज्याला आपण हर्षगड म्हणून देखील ओळखतो, हा किल्ला साधारण 11 व्या शतकाच्या आसपास यादव राजवटीने या किल्ल्यावर राज्य केले.  'Harihar fort information in marathi'

बहमनी सल्तनत, मुघल राज्यकर्ते यांच्यासह विविध राज्यकर्त्यांनी हरिहर किल्ला ताब्यात घेऊन आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य केले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हरिहर हा किल्ला मराठा साम्राज्याचा ताब्यात देखील होता.

हरीहर किल्ल्याने आपले मोक्याचे स्थान मजबूत केल्याने या किल्ल्याने अनेक ऐतिहासिक लढायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

नाशिक प्रदेशात लक्ष ठेवण्यासाठी हरीहर किल्ला हा अनेक राजवटीमध्ये महत्त्वाचा केंद्रबिंदू होता.

हरिहर किल्ला हा यादवांनी मुख्यतः गोंडा घाटातील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी उभारला असल्याचे सांगितले जाते.

हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांसह अनेक राजवटींनी हरीहर किल्ल्यावर आक्रमणे करण्याचा प्रयत्न केला.

पुढे निजामशाही मध्ये असणारा हरिहर हा किल्ला इसवी सन 1636 मध्ये शहाजी राजांनी जिंकून घेऊन तो आपल्या ताब्यात आणला. 'Harihar fort information in marathi'

शहाजी राज्यांकडून हरीहर किल्ला मुघलांनी आपल्या ताब्यात घेऊन, त्यावर वर्चस्व गाजवले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हरीहर किल्ला हा जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला.

पुढे इसवी सन 1671 साली मुघल सरदार मातब्बर खान याने हरीहर किल्ला मुघलांच्या गोटात सामील केला.

शेवटी इसवी सन 1818 साली हरीहर किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला. भारत स्वतंत्र झाल्यापासून हरीहर किल्ला हा भारत सरकारच्या ताब्यात आहे.


हरीहर किल्ला व परिसरातील पाहण्यासारखी ठिकाणे


• हरिहर किल्ल्याच्या कातळ पायऱ्या


• स्वच्छ पाण्याचा तलाव


• कातळ पाण्याचे टाके


• हनुमान मंदिर


• महादेव लिंग आणि नंदी


• किल्ल्यावरील राजवाडा


• निवृत्तीनाथ समाधी


• वैतरणा तलाव


• आंबोली धरण


हरीहर किल्ल्याचे स्थापत्य


हरिहर किल्ला कातळ खडकामध्ये, पहाडामध्ये वसलेला किल्ला आहे. 'Harihar fort information in marathi'

हरीहर किल्ल्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हरिहर किल्ल्याचा असलेला त्रिकोणी आकार. हरिहर किल्ल्याचा हाच त्रिकोणी आकार हा इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा असल्याचे जाणीव करून देतो. 

हरिहर किल्ल्याच्या बांधकामांमध्ये असलेल्या विशिष्ट प्रकारे दगडी बांधकाम हे दगडी बांधकाम भारतीय प्राचीन वास्तू कलेचे कौशल्य प्रदर्शित करते. 

हरीहर किल्ला चढण्यासाठी खडकामध्ये कोरलेल्या दगडाच्या पायऱ्या आणि प्रवेशद्वार ज्याला स्थानिक भाषेत हर्षलखांब देखील म्हणतात; हे एक प्राचीन अभियंत्रिकेचा चमत्कारच आहे. 

हरिहर किल्ल्यामध्ये हनुमानाला समर्पित एक लहान मंदिर देखील आहे. 'Harihar fort information in marathi'

किल्ल्यावर असलेले हनुमानाचे मंदिर किल्ल्याला ऐतिहासिक महत्वा बरोबरच धार्मिक महत्त्व देखील प्राप्त करून देते.


हरीहर किल्ल्याचा ट्रेक


हरीहर किल्ल्याचा ट्रेक हा एक रोमांचकारी अनुभव देणारा ट्रेक आहे. 

हरीहर किल्ल्याचा ट्रेक हा नवख्या आणि अनुभवी ट्रेकर्सना नेहमीच आकर्षित करत असतो.

हरीहर किल्ल्याचा प्रवास हा खडकाळ कोरीव पायऱ्या, घनदाट जंगल, खडबडीत डोंगराळ भागामधून जाणारा आहे.

हरिहर किल्ल्याच्या ट्रेक मधील सर्वात भीतीदायक आणि आव्हानात्मक प्रवास म्हणजे हर्षलखांब, जो खडक कापलेल्या पायऱ्यावर, उभ्या चढाईचा आहे.

हर्षल खांबांवरील चढण ही पर्यटकांसाठी चित्तथरारक अनुभव देणारा, कर्तुत्वाच्या भावनेची जाणीव करून देणारा आणि आश्चर्यकारक विहंगम दृश्य दाखवणारा आहे.

उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या कडक झपाट्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे निसरट झालेल्या पायऱ्यांमुळे हरिहर किल्ल्याचा ट्रेक हा आव्हानात्मक आणि धोकादायक ठरू शकतो.


हरीहर किल्ल्यावर जाण्यासाठी योग्य वेळ


हरिहर किल्ल्याला भेट देण्याचे नियोजन करत असाल तर किल्ल्याला भेट देण्याची योग्य वेळेची पडताळणी करूनच नियोजन करा. 'Harihar fort information in marathi'

हरिहर किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात योग्य वेळ ही हिवाळ्यातील नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांच्या दरम्यान होय. 

हिवाळ्यामधील हवामान हे अल्हाददायक आणि तुलनेने आद्रता कमी असलेले असते, त्यामुळे सहसा हिवाळ्यातच हरीहर किल्ल्यावर जावे.

पावसाळ्यामध्ये निसरट उतार आणि वाढलेल्या धोक्याच्या घटनांमुळे पावसाळ्यातील ट्रेक सहसा टाळावेत.


हरीहर किल्ल्याला कसे जायचे


हरीहर किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे.

नाशिक शहरापासून हरिहर किल्ल्याचे अंतर हे साधारण 60 किलोमीटर इतके असू शकते.

मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर हुन रेल्वे मार्गाने नाशिक रेल्वे स्टेशन किंवा इगतपुरी रेल्वे स्टेशन वर उतरून बसने अथवा टॅक्सी घेऊन हरीहर किल्याच्या पायथ्याला असणाऱ्या गावात पोहचता येते. 'Harihar fort information in marathi'

तसेच नाशिक-त्रंबकेश्वर रस्त्याने किंवा कसारा-घोडाळा रस्ताने निरगुडपाडा आणि नाशिक-जव्हार रस्त्याने हर्षवाडी या पायथ्याच्या गावात जाऊन हरीहर किल्ल्यावर जाता येते. 


हरीहर किल्ल्याला भेट देण्यासंबंधी काही टिपा


हरिहर किल्ल्याला भेट देण्यासाठी जात असाल तर काही महत्त्वाच्या बाबी पाळल्या पाहिजेत.

हरीहर किल्ला चढण्यासाठी पायामध्ये मजबूत ट्रेकिंग शूज असावेत.

किल्ल्यावर चढण करत असताना थकवा येऊ नये यासाठी पुरेसे पाणी व हलकासा नास्ता घ्या.

हरीहर किल्यावर जाताना गट करून किल्ला चढायला लागा.

जर पहिल्यांदाच हरीहर किल्ल्यावर जात असेल तर, सोबत एखादा अनुभवी ट्रेकर घेऊन जा.

किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात कचरा टाकणे टाळावे.

हरीहर किल्ल्याचा संपूर्ण ट्रेक होईपर्यंत या पवित्र वारसास्थळाचे पावित्र्य राखावे. 'Harihar fort information in marathi'


निष्कर्ष

हरीहर किल्ला मराठी माहिती | Harihar fort information in marathi, हरीहर किल्ल्याची माहिती मराठीत, harihar fort



हे देखील वाचा 👇






 

Post a Comment

0 Comments