India's population 2023 | भारताची लोकसंख्या चीन पेक्षा जास्त
![]() |
'India's population 2023' |
भारत हा 2023 मध्ये चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनला आहे. चीन आता दुसऱ्या क्रमांकावर तर तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. बुधवारी म्हणजेच 19 एप्रिल 2023 रोजी UN ने एक जागतिक लोकसंख्येचा अहवाल जाहीर केला; आणि त्या अहवालानुसार भारतातील लोकसंख्या 142.86 कोटी तर चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या ही चीन पेक्षा जवळपास 29 लाख जास्त आहे. संयुक्त राष्ट्र हे 1950 पासून लोकसंख्येची माहिती गोळा करून अहवाल जाहीर करत असते. पण त्यांच्या अहवालात पहिल्यांदाच भारताची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे. भारतात 1951 पासून जनगणना होते, त्यात लोकसंख्या वाढीचा आलेख हा नेहमीच चढता पाहायला मिळतो. 'India's population 2023' नजीकच्या काळात भारताने येथील लोकांना चांगले आरोग्य सुविधा पुरविल्या आणि त्यामुळे येथील लोकांचे आयुष्यमान वाढत असून लोकसंख्येत भर पडत आहे. शासनाच्या हम दो हमारे दो या लोकसंख्या नियोजनाला तिलांजली देत भारताने एक नंबर ला जाण्याचा मान मिळवला आहे. तर दुसरीकडे चीनमधील जन्म दर कमी होऊन वृद्धांची संख्या वाढली आहे.
2050 पर्यंत हे असतील सर्वाधिक लोकसंख्येचे देश
2022 मध्ये UN च्या अहवालात त्यांनी असे नमूद केले होते की, 2023 मध्ये भारत हा चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होईल. अहवालानुसार 2050 पर्यंत जगातील निम्मी लोकसंख्या ही काँगो, भारत, इजिप्त, इथिओपिया, पाकिस्तान, नायजेरिया, टांझानिया आणि फिलिपिन्स या 8 देशात मध्येच असेल. अहवालानुसार 2030 पर्यंत जागतिक लोकसंख्या 8.5 अब्ज तर 2050 पर्यंत 9.7 अब्जावर जाऊन पोहोचेल. 'India's population 2023'
भारताची जनगणना
स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वप्रथम 1951 ला जनगणना झाली. भारतात दर दहा वर्षांनी जनगणना होत असते. 2011 च्या जनगणनेनंतर 2021 मध्ये कोरोनाच्या जागतिक संकटामुळे जनगणना होऊ शकली नाही. 2011 च्या जनगणने नुसार भारताची लोकसंख्या ही 1,210,193,422 इतकी होती. तर UN च्या 19 एप्रिल 2023 च्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या ही 1,428,627,663 इतकी आहे.
• 1951 - 361,088,090
• 1961 - 438,936,918
• 1971 - 548,160,050
• 1981 - 683,329,900
• 1991 - 838,583,988
• 2001 - 1,028,737,436
• 2011 - 1,210,193,422
• 2023 - 1,428,627,663
2023 मध्ये भारताची लोकसंख्या ही 1,428,627,663 म्हणजे 2022 पेक्षा 0.81 टक्के जास्त आहे.
पहिल्यांदा भारताने चीन ला मागे टाकले
![]() |
'India's population 2023' |
भारत हा तरुणांचा देश
2023 मध्ये भारत देश हा पहिल्यांदाच लोकसंख्येत अव्वल स्थानी पोहोचला आहे. अहवालानुसार भारतातील एकूण लोकसंख्येमधील 25% लोकसंख्या ही तरुणांची आहे. तर 65 वर्षाच्या पुढील म्हणजे वृद्ध हे फक्त 7 % आहेत. भारतात 0 ते 14 वयोगटातील 25 टक्के तर 10 ते 19 वयोगटातील 18 टक्के आणि 10 ते 24 वयोगटातील 26 टक्के लोकसंख्या आहे.
भारताला आता रोजगाराची गरज
दिवसेंदिवस भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. आता भारतात लोकसंख्येच्या तुलनेत रोजगार उपलब्धी वाढवावी लागणार आहे. 'India's population 2023' रोजगार कमी होऊन बेरोजगारीची टक्केवारी वाढल्यामुळे तरुण असक्षम होत चालला आहे. त्यात आता लोकसंख्या वाढीचा फटका देखील बसू शकतो. शासनाने रोजगार उपलब्ध करण्यावर भर देऊन ही टक्केवारी कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे वाढत्या लोकसंख्येला बेरोजगारीचा त्रास न होता भारताला आर्थिक सक्षमता येईल.
0 Comments