Maharashtra bhushan award | महाराष्ट्र भूषण पुरस्कार माहिती

Maharashtra bhushan award | महाराष्ट्र भूषण पुरस्कार माहिती

'Maharashtra bhushan award'
'Maharashtra bhushan award'




'Maharashtra bhushan award' महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा राज्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. 1996 पासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले राज्य असून, आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्राची मान उंचवणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी शासनाकडून 1995 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. विशेष समितीकडून निवण्यात येणारी व्यक्ती ही महाराष्ट्रामध्ये किमान 15 वर्षे वास्तव्यास असावी लागते.

पुरस्काराची स्थापना झाल्या नंतर पु. ल. देशपांडे यांना 1996 चा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार साहित्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात आला. तर आत्ता 2022 चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक आप्पा धर्माधिकारी यांना देण्यात आला आहे. खारघर येथील मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करून 16 एप्रिल 2023 रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लाखो जनतेच्या उपस्थित धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासन आयोजित या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सुमारे 12 ते 14 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 'Maharashtra bhushan award'


या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी दिला जातो पुरस्कार

• साहित्य

• समाजसेवा

• क्रीडा

• कला

• पत्रकारिता

• विज्ञान

• आरोग्य सेवा

• लोक प्रशासन


पुरस्काराचे स्वरूप

'Maharashtra bhushan award' महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्थापनेच्या वेळी म्हणजे अगदी सुरुवातीला पुरस्कार्थी व्यक्तीला 5 लाख रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत होते. 2012 मध्ये या पुरस्काराची रक्कम वाढवून 10 लाख रुपये करण्यात आली; आणि जानेवारी 2023 च्या निकषानुसार या पुरस्काराची रक्कम 25 लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे करण्यात आले आहे.


पुरस्काराचे आत्तापर्यंतचे मानकरी

1996   -   पु. ल. देशपांडे, साहित्य

1997   -   लता मंगेशकर, कलासंगीत

1999   -   विजय भटकर, विज्ञान

2000 - सुनील गावसकर, क्रीडा

2001 - सचिन तेंडुलकर, क्रीडा

2002 - भीमसेन जोशी, कलासंगीत

2003   -   अभय बंग आणि राणी बंग, समाजसेवा व आरोग्यसेवा

2004 - बाबा आमटे, समाज सेवा

2005 - रघुनाथ माशेलकर, विज्ञान

2006   -   रतन टाटा, उद्योग

2007   -   रा.कृ. पाटील, समाजसेवा

2008   -   नानासाहेब धर्माधिकारी, समाजसेवा

2008   -   मंगेश पाडगावकर, साहित्य

2009   -   सुलोचना लाटकर, कलासिनेमा

2010   -   जयंत नारळीकर, विज्ञान

2011   -   अनिल काकोडकर, विज्ञान

2015 - बाबासाहेब पुरंदरे, साहित्य

2021 - आशा भोसले, कलासंगीत

2022 - अप्पासाहेब धर्माधिकारी, समाजसेवा


विशेष

निळू फुले आणि विलासराव देशमुख

'Maharashtra bhushan award'
'Maharashtra bhushan award'






2004 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी अभिनेते निळू फुले यांना फोन केला आणि 2003 सालाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तुम्हाला देण्याचे ठरवले असल्याचे सांगून त्यावर त्यांची संमती मागितली. तेव्हा अभिनेते निळू फुले यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. पण त्यांनी विलासरावांना मी या पुरस्काराला पात्र असे कोणतेच काम केले नाही, मी एक व्यावसायिक कलाकार आहे पोटापाण्यासाठी मी माझ्या कलेचे पैसे घेतो. यात मी समाजासाठी काहीही केलेले नाही असे प्रामाणिकपणे सांगून तो पुरस्कार नाकारला होता. तेव्हा निळू फुले यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाच खडेबोल सुनावल्याचे प्रा. हरी नरके सर सांगतात. 2003 चा 'Maharashtra bhushan award' महाराष्ट्र भूषण पुरस्कार आदिवासी भागात बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष काम करणारे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना देण्याचे निळू फुले यांनी मुख्यमंत्र्यांना तेव्हा आग्रहपूर्वक सांगितले. आणि 2003 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना देण्यात आला.

2015 साली ब. मो. पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. जेम्स लेनच्या पुस्तकातील प्रस्तावनेचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्रातील विविध पुरोगामी संघटनांनी हा पुरस्कार पुरंदरेंना देण्यास विरोध केला होता.

16 एप्रिल 2023 रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमादरम्यान उपस्थित बऱ्याच लोकांना उष्माघाताचा त्रास झाला. दुर्दैवाने यात काही जणांना आपले प्राण देखील गमावावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यू पावलेल्या सदस्यांच्या कुटुंबांना 5 लाखांची मदत जाहीर करून त्यांचे सात्वन केले. 'Maharashtra bhushan award'




Post a Comment

0 Comments