आळंदी देवाची | alandi information in marathi

आळंदी देवाची | alandi information in marathi 

'alandi information in marathi'
'alandi information in marathi'



'alandi information in marathi' इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आळंदी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी या आळंदी तीर्थक्षेत्री आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ आळंदी गावात घालवला. आळंदी हे ठिकाण पुण्यापासून अगदी 25 किलोमीटर अंतरावर आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी 1218 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. त्याच ठिकाणी आता त्यांचे भव्य समाधी मंदिर देखील आहे.आळंदी मध्ये अनेक वारकरी शिक्षण संस्था असून त्यात शेकडो मुलं शिक्षण घेत असतात.

वारकरी संप्रदायात आळंदीला खूप मोठे महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आषाढी, कार्तिकी एकादशीला विशेष यात्रा असते; त्यामुळे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात. 'alandi information in marathi' आषाढी एकादशीला आळंदी येथून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक भक्तांच्या सोबत जवळपास 250 किलोमीटर अंतर पायी चालत जाते.

 संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला इंद्रायणी नदीवर अतिशय सुंदर असा पायऱ्यांचा घाट देखील आहे. या घाटावर गोवोगावून आपल्या ज्ञानोबारायाच्या दर्शनासाठी आलेले भाविक तीर्थस्नान करूनच जातो. या घाटावर आंघोळ करून टाळ, मृदंग आणि भजनाच्या आवाजात माणसाचे मन अगदी प्रसन्न होऊन जाते. या घाटावर इंद्रायणी नदीपात्रात डोळ्याचं पारणं फेडणारा उंच असा गरुडखांब दिमाखात उभा आहे.


इंद्रायणी काठी होऊनिया दंग

करू नामस्मरण ज्ञानोबारायांचे 

'alandi information in marathi'
इंद्रायणी नदी घाट आळंदी


संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत 

असे सांगितले जाते की एकदा चांगदेव महाराज हे योगी वाघावर बसून संत ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला आले होते; तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसोबत एका भिंतीवर बसून ऊस खात त्या भिंतीला चालवत चांगदेवांना भेटण्यासाठी गेले होते. ही ऐतिहासिक भिंत आज देखील आळंदीत पाहायला मिळते.


ज्ञानेश्वर माऊलींची समाधी

नंदी केश्वराच्या उत्तरेस असणाऱ्या दोन पायऱ्यांच्या खालूनच ज्ञानोबाराय हे समाधीच्या ठिकाणी गेल्याचे सांगितले जाते.


अष्टोत्तरशे वेळ समाधी निश्चळ | पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली 

उठविला नंदी शिवाचा ढवळा उघडली शिळा विवराची 


पाषाणाच्या गाभाऱ्यात ज्ञानोबारायांची सुंदर आणि मनमोहक अशी संजीवन समाधी आहे. समाधीच्या पाठीमागे साक्षात विठ्ठल आणि रखुमाई हे माऊलींच्या मागे उभे आहेत. समाधीचे दर्शन घेऊन प्रसन्नतेने मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा मारत असताना आवारातील सुवर्ण पिंपळ आणि अजान वृक्ष मानवी मन प्रफुल्लित करतात. 'alandi information in marathi' आळंदीत येऊन समाधी दर्शन घेऊन इंद्रायणीस्नान करणारा निरागस वारकरी हा प्रेमाचा, समतेचा आणि समृद्धीचा संदेश घेऊनच परत जातो. 


आळंदी मधील बघण्यासारखी ठिकाणे


• माऊलींची समाधी

• इंद्रायणी घाट

• मुक्ताई मंदिर

• विश्राम वड

• सिद्ध बेट

• श्री ज्ञानेश्वरी मंदिर


आळंदीला जाण्याचा मार्ग

मनपा, पुणे स्टेशन, स्वारगेट, बालेवाडी येथून पीएमटी ची बस सेवा दररोज चालू असते. 'alandi information in marathi'

Post a Comment

0 Comments