महाराष्ट्राचे मुख्यमंत्री | Maharashtra chief minister
![]() |
'Maharashtra chief minister' |
मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. कलम 164 नुसार राज्यपाला कडून विधानसभेला बहुमत मिळणाऱ्या पक्षातील व्यक्तीला मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते. जोपर्यंत बहुमत शाबूत आहे तोपर्यंत ती व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहू शकते. केंद्रातील पंतप्रधानाचे जे स्थान आहे तेच स्थान राज्यात मुख्यमंत्र्याला भारतीय संविधानाने बहाल केले आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारी व्यक्ती ही विधानसभा किंवा विधानपरिषदेची सदस्य असायला हवी. आणि तसे नसेल तर पुढच्या 6 महिन्यात त्या व्यक्तीला विधानसभा किंवा विधान परिषद वरून निवडून यावे लागते. नाहीतर घटनेनुसार 'Maharashtra chief minister' त्या व्यक्तीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो.
मुंबई राज्याचे विभाजन होऊन 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली; आणि यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. तर 1962 मध्ये मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून पदावर विराजमान झाले. सध्या एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.
मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री
• बाळ गंगाधर खेर - 1947 ते 1952
• मोरारजी देसाई - 1952 ते 1956
• यशवंतराव चव्हाण - 1956 ते 1960
महाराष्ट्राचे आत्तापर्यंत चे मुख्यमंत्री
• यशवंतराव चव्हाण - 1 मे 1960 ते 20 नोव्हें 1962
• मारोतराव कन्नमवार - 20 नोव्हें 1962 ते 24 नोव्हें 1963
• पी के सावंत - 25 नोव्हें 1963 ते 5 डिसें 1963
• वसंतराव नाईक - 5 डिसें 1963 ते 21 फेब्रु 1975
• शंकरराव चव्हाण - 21 फेब्रु 1975 ते 17 मे 1977
• वसंत दादा पाटील - 17 मे 1977 ते 18 जुलै 1978
• शरद पवार - 18 जुलै 1978 ते 17 फेब्रु 1980
• अब्दुल रहमान अंतुले - 9 जून 1980 ते 21 जाणे 1982
• बाबासाहेब भोसले - 21 जाणे 1982 ते 2 फेब्रु 1983
• वसंत दादा पाटील - 2 फेब्रु 1983 ते 3 जून 1985
• शिवाजीराव निलंगेकर पा. - 3 जून 1985 ते 12 मार्च 1986
• शंकरराव चव्हाण - 12 मार्च 1986 ते 26 जून 1988
• शरद पवार - 26 जून 1988 ते 25 जून 1991
• सुधाकरराव नाईक - 25 जून 1991 ते 6 मार्च 1993
• शरद पवार - 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995
• मनोहर जोशी - 14 मार्च 1995 ते 1 फेब्रु 1999
• नारायण राणे - 1 फेब्रु 1999 ते 18 ऑक्टो 1999
• विलासराव देशमुख - 18 ऑक्टो 1999 ते 18 जाणे 2003
• सुशीलकुमार शिंदे - 18 जाणे 2003 ते 1 नोव्हें 2004
• विलासराव देशमुख - 1 नोव्हें 2004 ते 8 डिसें 2008
• अशोक चव्हाण - 8 डिसें 2008 ते 11 नोव्हें 2010
• पृथ्वीराज चव्हाण - 11 नोव्हें 2010 ते 28 सप्टें 2014
• देवेंद्र फडणवीस - 31 ऑक्टो 2014 ते 12 नोव्हें 2019
• देवेंद्र फडणवीस - 23 नोव्हें 2019 ते 28 नोव्हें 2019
• उद्धव ठाकरे - 28 नोव्हें 2019 ते 30 जून 2022
'Maharashtra chief minister'
• एकनाथ शिंदे - 30 जून 2022 पासून
या राजकीय पक्षांचे झाले मुख्यमंत्री
• काँग्रेस
• पुलोद
• शिवसेना
• भाजपा
• शिवसेना (शिंदे गट)
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
◆ यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सातारा जिल्ह्यात झाला. मुंबई द्विभाषिक राज्याचे तिसरे मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण हे मुंबई राज्याच्या विभाजनानंतर उदयास आलेल्या महाराष्ट्र राज्याचे 1 मे 1960 रोजी पहिले 'Maharashtra chief minister' मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. |
काँग्रेस पक्षातून राजकारणात करत असताना यशवंतराव चव्हाण यांनी भारताचे उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारली. यशवंतराव चव्हाण हे शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी झटणारे समाजहीतवादी नेते होते. यशवंतराव चव्हाण हे एक उत्तम लेखक म्हणून देखील भारतभर प्रसिद्ध आहेत.
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती
◆ वसंतराव नाईक
हरितक्रांतीचे जनक म्हणून ख्याती असणारे वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती आहेत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे वसंतराव नाईक हे 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 पर्यंत सलग 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वसंतराव नाईक हे सर्वाधिक म्हणजे 11 वर्षे 77 दिवस मुख्यमंत्री पदावर राहून राज्याचा कारभार करत होते. 'Maharashtra chief minister'
सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री झालेले व्यक्ती
◆ शरद पवार
विद्यार्थी दशेतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करणारे शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात कमी वयाचे, सर्वात तरुण मुख्यमंत्री झालेले व्यक्ती आहेत. ते सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले व्यक्ती आहेत. शरद पवार यांनी 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळलेला आहे.
• 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980
• 26 जून 1988 ते 4 मार्च 1990
• 4 मार्च 1990 ते 25 जून 1991
• 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995
राष्ट्रपती राजवट
1960 पासून आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे. 'Maharashtra chief minister'
• 17 फेब्रु. 1980 ते 8 जून 1980
• 28 सप्टें. 2014 ते 30 ऑक्टो. 2014
• 12 नोव्हें. 2019 ते 23 नोव्हें. 2019
मुख्यमंत्रीपदाचा कार्यकार पूर्ण करणाऱ्या व्यक्ती
◆ वसंतराव नाईक
◆ देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे
प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समृद्ध वारसा असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे आपल्या शालेय जीवनापासूनच राजकारणाशी जोडले गेले होते. 2003 मध्ये शिवसेना कार्याध्यक्ष आणि नंतर शिवसेना पक्षप्रमुख झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना-भाजप युती संपुष्टात आली; तेव्हा शरद पवार, सोनिया गांधी यांच्या सोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 'Maharashtra chief minister' झाले. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
एकनाथ शिंदे
1984 साली शिवसेनेचे शाखाप्रमुख असलेले एकनाथ शिंदे हे 30 जून 2022 पासून महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे यांनी राजकीय जीवनात अनेक पदे भूषवली आहेत. राजकारणात येण्याआधी रिक्षा चालवत असल्याचे ते स्वतः सांगतात. 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत मतभेदांमुळे ते 40 समर्थक आमदारांना घेऊन माहाविकास आघाडी, उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले; आणि भाजप सोबत जाऊन 'Maharashtra chief minister' महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
![]() |
'Maharashtra chief minister' |
FAQ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?
- 30 जून 2022 पासून मा. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.
सर्वात कमी काळ पदावर असणारे मुख्यमंत्री कोण?
- मा. देवेंद्र फडणवीस. त्यांनी 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 पर्यंत म्हणजे फक्त 3 दिवस काम केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत?
- 30 जून 2022 पासून मा. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री झाले?
- एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री आहेत.
महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून कोणी पदभार सांभाळला?
0 Comments