MSCIT कोर्स संपूर्ण माहिती | MSCIT Course information in marathi
![]() |
'MSCIT Course information in marathi' |
21 व्या शतकात संगणक हे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. प्रत्येक क्षेत्रात आज संगणकाद्वारे कामे केली जात आहेत. आयटी कंपनीमध्ये बसून काम करणारा माणूस असो किंवा अगदी शेतात बसून आपल्या शेतमालाची ऑनलाईन विक्री करणारा शेतकरी, शाळेत जाणारा विद्यार्थी की एखादे दुकान चालवणारा दुकानदार असो प्रत्येक जण आज आपापल्या उपयोगासाठी संगणक वापरत असतो. या इंटरनेट च्या युगात जगत असताना प्रत्येकाला संगणक म्हणजे काय आणि त्याविषयी माहिती हवी असते. याचाच विचार करून महाराष्ट्र शासनाने संगणकाची माहिती शिकवणारा एमएससीआयटी नावाचा कोर्स चालू केला. या कोर्स द्वारे संगणकाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. दहावी, बारावी झालेले विद्यार्थी MSCIT कोर्स करण्यासाठी खूप उत्सुक असतात. संगणकीय ज्ञान आत्मसात करण्यासाठी समाजातील प्रत्येक जण धडपड करत असतो. त्यांच्यासाठी हा एमएससीआयटी कोर्स एक वरदानच ठरला आहे. 'MSCIT Course information in marathi' |
तंत्रज्ञानाच्या मागे धावणाऱ्या या 21व्या शतकात लोकांना IT साक्षरता प्रदान करून, ज्ञान अध्ययनाचे परिणाम कारक साधन म्हणून उदयास येऊन, माणसाला इंटरनेटशी जोडणारा mscit हा कोर्स अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाला आहे.
काळाची गरज बनलेला संगणक ज्याला येत नाही तो जगाच्या खूपच मागे पडला जातो असे आपण म्हणू शकतो. म्हणून आपल्याला जगासोबत जाण्यासाठी मदत करणाऱ्या कोर्सची माहिती आपण 'MSCIT Course information in marathi' या लेखात बघणार आहोत.
MSCIT म्हणजे काय ?
एम एस सी आय टी हा संगणक शिकण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी महाराष्ट्र शासनाने चालू केलेला कोर्स आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणात MKCL द्वारे 2001 मध्ये या कोर्सची सुरुवात करण्यात आली. हा माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम शिकवणारा सर्वोत्तम कोर्स मानला जातो. हा कोर्स साधारण अडीच ते 3 महिन्यांचा असतो. IT साक्षरता प्रधान करणाऱ्या mscit या कोर्समध्ये दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इंटरनेट सहित संपूर्ण संगणकाची माहिती अगदी बेसिक गोष्टींपासून शिकवली जाते. या कोर्समध्ये अगदी सुरुवातीला संगणकाची ओळख करून दिल्यानंतर मग अभ्यासक्रमाला सुरुवात केली जाते. mscit कोर्स पूर्ण करणाऱ्या उमेदवारास महाराष्ट्र शासनाचे सर्टिफिकेट देखील प्रदान केले जाते.
![]() |
'MSCIT Course information in marathi' |
MSCIT चा अर्थ |
संगणकाचे संपूर्ण ज्ञान देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या mscit या कोर्सचे पूर्ण स्वरूप म्हणजे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी Maharashtra State Certificate In Information Technology असा आहे.
MSCIT कोर्ससाठी प्रवेश
'MSCIT Course information in marathi' एमएससीआयटी कोर्सला प्रवेश करण्यासाठी आपल्याला कोणतीही परीक्षा देण्याची आवश्यकता नसते. सरकार मान्यता प्राप्त असलेल्या लर्निंग सेंटर मध्ये जाऊन आपण सहजपणे प्रवेश घेऊ शकतो. Athorized lerning Center मध्ये आपल्याला ऍडमिशन फॉर्म भरून द्यावा लागतो आणि सोबत ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी आणि पासपोर्ट साईज फोटो द्यावा लागतो. त्यानंतर ALC द्वारे आपली माहिती MKCL ला दिली जाते आणि आपला प्रवेश निश्चित केला जातो.
MSCIT कोर्स साठी पात्रता काय आहे?
mscit हा कोर्स करण्यासाठी तशी विशेष काही पात्रता नाही. विद्यार्थी दहावी, बारावी झाल्यानंतर हा कोर्स करत असतात. कारण तेव्हा त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो; आणि अभ्यासक्रम समजण्यास देखील सोपा जातो. संगणक शिकण्याची इच्छा शक्ती असणारा प्रत्येक जण हा कोर्स करू शकतो. विद्यार्थी, संगणक क्षेत्रात करियर करणारी मुलं, नोकरीत बढती हवी असणारे असे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या कोर्स साठी पात्र असतो. अशा प्रकारे mscit कोर्स साठी कोणतीही ठराविक पात्रता किंवा अटी नाहीत.
MSCIT कोर्सची फी
या कोर्सच्या फी संदर्भात अनेकांना प्रश्न असतात. मित्रांनो सर्वांना परवडेल अशीच फी आपल्याकडून आकारली जाते. 'MSCIT Course information in marathi' सांगायचे झाले तर अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, सर्टिफिकेट शुल्क अशी सर्व मिळून 5000 रुपये फी ALC द्वारे आपल्याकडून आकारतात येते. आपण फी सहजपणे भरू शकण्यासाठी इन्स्टॉलमेंट ची देखील सुविधा असते.
◆ फी एक रकमी भरायची असेल तर - 5000 रु.
◆ दोन इन्स्टॉलमेंट मध्ये - 5200 रु. ते 5500 रु.
मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये फी 6000 देखील असू शकते.
MSCIT कोर्स अभ्यासक्रमातील विषय
mscit कोर्स जॉईन केल्यानंतर सुरुवातीला संगणक चालू करणे, बंद करणे, स्टार्ट बटन अशा बेसिक स्वरूपाची माहिती दिली जाते.Theory शिकवून झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते.
शिकवले जाणारे विषय
• नोट पॅड
• पेंट
• अप्लिकेशन
• इंटरनेट
• Window 7
• Window 10
• MS Word 2013
• MS Excel 2013
• Outlook
• Power Point
• Window Explorer
• Era
![]() |
'MSCIT Course information in marathi' |
विद्यार्थ्यांना अगदी माऊस हाताळण्यापासून, नोट्स कशा लिहायच्या, संगणकावर आकृती-चित्र काढणे, रिझुम तयार करणे, हेडर, फुटर, फॉरमॅट, डॉक्युमेंट, प्रेझेंटेशन तयार करणे, Excel वापरणे, ई-मेल-कॉन्टॅक्ट तयार करणे, फाईल कॉपी करणे, पेस्ट करणे, नाव बदलणे,ऑनलाईन, ऑफलाइन आशा सर्व प्रकारची माहिती mscit कोर्सच्या अभ्यासक्रमा मध्ये अगदी पद्धतशीर पणे शिकवली जाते. 'MSCIT Course information in marathi' |
या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांची आयटी संकल्पना जागरूक होऊन टायपिंग स्पीड देखील प्रगत होते. तसेच कीबोर्ड मधील अनेक शॉर्टकट बटनांची माहिती देखील होते.
MSCIT परीक्षा
Mscit कोर्स मध्ये अभ्यासक्रम शिकवून झाल्यानंतर 50 मार्कांचा Era सोडवावा लागतो. तर 50 मार्कांची फायनल Exam असते. त्यात 35 गुणांच प्रॅक्टिकल आणि 15 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी 1 तासाचा वेळ असतो. हे सर्व प्रश्न शिकवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. या अंतिम परीक्षेत पास होण्यासाठी प्रात्यक्षिकात 35 पैकी 14 तर mcq मध्ये 15 पैकी 6 गुण घेणे आवश्यक असते. ही परीक्षा परीक्षक आणि कॅमेरा रेकॉर्डिंग च्या देखरेखीत पार पडते. हवी असल्यास विद्यार्थी परीक्षेची भाषा देखील बदलू शकतो.
नापास- झाल्यास विद्यार्थी परत Exam ची फीस भरून 2 महिन्यांनी पुन्हा परीक्षेत बसू शकतो.
Mscit केल्या नंतर नोकरी मिळेल का?
एमएससीआयटी कोर्स पूर्ण केल्यानंतर बऱ्याच नोकऱ्या उपलब्ध आहेत. उदा. बँकिंग, प्रोग्रामर, IT सल्लागार, संगणक चालक, इंटरफेस, अभियंता, आयटी क्षेत्र, अध्ययन, इंटरनेट क्षेत्र आशा प्रकारे सहजपणे रोजगार मिळू शकतो. 'MSCIT Course information in marathi'
MSCIT कोर्सचे फायदे
मित्रांनो संगणक हा मानवाचा अविभाज्य घटक होऊन बसला आहे. डिजिटल युगात जगायचे असेल तर संगणक ज्ञान अवगत असायलाच हवे. mscit कोर्स आपल्याला या डिजिटल युगासी नाते जोडायला मदत करतो. भविष्यात याचा खूप मोठा फायदा आपल्यालाच होणार हे नक्की. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही विविध ठिकाणी नोकरीसाठी अर्ज दाखल करू शकता, IT क्षेत्रात काम करायचे असेल तर याचा खूप मोठा आधार आहे. सरकारी नोकरीसाठी mscit कोर्स उत्तीर्ण असणे खूप महत्त्वाचे आहे. असे अनेक फायदे mscit कोर्स केल्यानंतर होतात.
'MSCIT Course information in marathi' हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीला देखील ही माहिती कळावी याससाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.
0 Comments