श्री तीर्थक्षेत्र देहू माहिती | Dehu information in marathi

श्री तीर्थक्षेत्र देहू माहिती | Dehu information in marathi

'Dehu information in marathi'
'Dehu information in marathi'




देहू हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठी असलेलं एक तीर्थक्षेत्र आहे. हे पुणे शहरापासून सुमारे 25 किमी अंतरावर आहे. 17 व्या शतकातील संत, कवी आणि तत्त्वज्ञ संत तुकाराम  महाराज यांचे जन्मस्थान म्हणून देहू हे भारतभर प्रसिद्ध आहे. देहूला मोठे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. या शहरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह विविध हिंदू देवतांना समर्पित अनेक मंदिरे आहेत, जे पांडुरंग विठ्ठल, तुकाराम महाराज यांच्या भक्तांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.

धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, देहू हे सुंदर नैसर्गिक परिसर आणि प्रसन्न वातावरणासाठी देखील ओळखले जाते. हे शहर इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले असून हिरवाईने वेढलेले आहे. शहरी जीवनातील गजबजाटापासून दूर शांततापूर्ण माघार शोधणाऱ्यांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

एकूणच, देहू हे ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक महत्त्व असलेले ठिकाण आहे; आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे अन्वेषण करण्यात स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी नक्कीच भेट देण्यासारखे आहे. 'Dehu information in marathi'

संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनासाठी गेले अशी आख्यायिका सांगितली जाते. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाची साक्ष देणारा नांदुरकी वृक्ष आजही देहू गावामध्ये पाहायला मिळतो. असे सांगितले जाते की तुकाराम बीज या दिवशी त्या नांदुरकी वृक्षाच्या फांद्या आजही या दिवशी हलताना पाहायला मिळतात. 

हे देखील वाचा 👉 आळंदी देवाची


संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील मराठी कवी आणि महाराष्ट्रातील भक्ती चळवळीतील संत होते. त्यांना मराठी भाषेतील सर्वात महत्त्वाचे संत मानले जाते आणि त्यांच्या भक्ती काव्यासाठी ओळखले जाते. आजही त्यांचे अभंग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गायले जातात आणि अभ्यासले जातात.

तुकाराम महाराजांचा जन्म 1608 मध्ये महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू या गावात झाला. त्यांचा जन्म एका कुणबी कुटुंबात झाला. त्यांनी आपले जीवन आध्यात्मिक साधनेसाठी वाहून घेण्यापूर्वी शेतकरी म्हणून काम केले. ते विठ्ठलाचे भक्त बनले आणि त्यांनी मराठीत 5,000 हून अधिक अभंग (भक्तीपर कविता) रचले, जे आजही लोकप्रिय आहेत.

तुकाराम महाराज त्यांच्या साध्या आणि सरळ लेखन शैलीसाठी ओळखले जात होते. ज्यामुळे त्यांचे अभंग सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचले. देवाच्या नजरेत सर्व लोक समान आहेत असा त्यांचा विश्वास होता आणि ते जातिभेद आणि सामाजिक विषमतेविरुद्ध बोलले. 'Dehu information in marathi'

तुकाराम महाराजांच्या शिकवणीचा आणि अभंगाचा महाराष्ट्रातील भक्ती चळवळीवर खोलवर परिणाम झाला. संत तुकाराम महाराजांना मराठी भाषेतील श्रेष्ठ संत मानले जाते. त्यांचा वारसा आजही महाराष्ट्रात आणि त्यापलीकडे लोकांना प्रेरणा देत उभा आहे.


संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान मंदिर

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान मंदिर हे देहू मधील मुख्य विठोबा रखुमाई मंदिरापासून अगदी जवळच आहे. ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज राहायचे ते त्यांचे राहते घर असलेल्या ठिकाणीच हे जन्मस्थान मंदिर उभे आहे. एखाद्या घरासारखे दिसणाऱ्या या मंदिराचे बांधकाम हे साठ-सत्तर वर्षांपूर्वी झालेले आहे. त्यामुळे तुकोबांच्या मूळ घराचे अवशेष उपलब्ध नाहीत.

सभामंडप आणि गाभारा असणाऱ्या या मंदिराचे बांधकाम हे माळवदाचे असून, गाभाऱ्यातील उंच चौथऱ्यावर संत तुकाराम महाराजांची गळ्यात तुळशी माळ घातलेली, धोतर, पागोटे अंगरखा असा देखणा पोशाख केलेली मूर्ती आहे. तर थोडेच बाजूला तुकोबांच्या पत्नी जिजाबाई यांची देखील मूर्ती आहे. या मंदिरात तुकाराम महाराजांचे वंशज नियमित पूजा करत असतात. 'Dehu information in marathi'


शिळा मंदिर

संत तुकोबांच्या राहत्या घराच्या बाजूला असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे खूप जुने असल्याचे मानले जाते. या मंदिराच्या आवारातच आता संत तुकाराम महाराजांचे भव्य शिळा मंदिर उभे राहिले आहे. तुकाराम महाराजांची अभंग गाथा ही इंद्रायणी नदीत बुडवली, तेव्हा तुकाराम महाराज 13 दिवस ज्या शिळेवर उपोषणास बसले होते ती पवित्र शिळा या मंदिरात स्थापित केली असून, मंदिरात तुकोबांची काळ्या पाषाणातील 42 इंचाची मूर्ती आहे. या शिळा मंदिराची उंची 42 फूट असून मंदीरावर 36 कळस बसवण्यात आले आहेत.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर आवारातील या शिळा मंदिराचे लोकार्पण हे भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 जून 2022 रोजी झाले आहे. 'Dehu information in marathi'


इंद्रायणी डोह

'Dehu information in marathi'
इंद्रायणी डोह, देहू




संत तुकाराम महाराज पांडुरंगाची मनोभावे भक्ती करत असत. या भक्तीतूनच ते अभंग लिहायचे. तुकाराम महाराज या अभंगातून कीर्तनात समाज परिवर्तन करत होते. हे त्यांच्या निंदकांना पाहवत नव्हते. म्हणून त्या निंदकांनी तुकाराम महाराजांना अभंगाची गाथा पाण्यात बुडवण्याची आज्ञा दिली; आणि या अभंगाच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवल्या गेल्या. असे सांगितले जाते की, तेव्हा तुकाराम महाराजांनी इंद्रायणीतीरी एका शिळेवर बसून उपोषण केले. आणि 13 दिवसानंतर या गाथा पाण्यावर तरुण आल्या अशी आख्यायिका सांगितली जाते. 'Dehu information in marathi'


गाथा मंदिर देहू

ज्या ठिकाणी तुकोबांची गाथा पाण्यात बुडवली त्याच्या बाजूलाच, इंद्रायणी तीरावर भव्य दिव्य असे गाथा मंदिर उभारण्यात आले आहे. हे गाथा मंदिर संत तुकाराम महाराजांचा समर्पित आहे. आकर्षक पायऱ्या चढून आत गेल्यानंतर, मंदिराच्या मध्यभागी संत तुकाराम महाराजांची भव्य अशी बैठी मूर्ती आहे. तर दुसऱ्या मजल्यावर विठ्ठल रुक्मिणी यांच्या मुर्त्या आहेत. या गाथा मंदिराच्या आतील बाजूस भिंतीवर संगमरवरी दगडावर संत तुकाराम महाराजांची संपूर्ण गाथा कोरली आहे. हेच या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या समोर असलेले आकर्षक पाण्याचे कारंजे गाथा मंदिराच्या सौंदर्यात अजून भर घालतात. देहू मध्ये आलेला प्रत्येक भाविक या मंदिरात येऊन तुकोबांचे दर्शन घेऊनच जातो.

'Dehu information in marathi'
गाथा मंदिर, देहू




एकंदरीत गाथा मंदिर भक्ती भावाने गजबजलेले तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भावीक येथे येऊन तुकोबांच्या पायावर डोकं टेकवत असतात.

भंडारा डोंगर

अवघ्या जगाला आदर्श असणारी अभंग गाथा ही संत तुकाराम महाराजांनी ज्या डोंगरावर बसून लिहीली, सांगायचे झाले तर भक्तीचे मळे पिकवणारा भंडारा डोंगर हा देहू गावापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तुकाराम महाराज याच डोंगरावर अभंगाची रचना करत बसायचे आणि त्यांची पत्नी जिजाबाई त्यांना भाकरी घेऊन यायच्या. हे आपण बऱ्याच कथांमध्ये, चित्रपटांमध्ये बघितले आहे. या डोंगरावर जाण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतराचा घाटवळणाचा पक्का रस्ता आहे. डोंगरावरील मंदिरात संत तुकाराम महाराज, विठ्ठल-रुक्माई, गणपती यांच्या मूर्त्या आहेत. तर भाविकांसाठी येथे भक्तनिवास देखील आहे. या मंदिराच्या बाजूला भव्यदिव्य आशा मंदिराचे बांधकाम चालू आहे. 100 कोटी रुपये खर्च करून हे मंदिर उभारले जात आहे.

असे सांगितले जाते की भंडारा डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकोबांचे दर्शन घेण्यासाठी आले, तेव्हा इथेच बसून छत्रपतींच्या मावळ्यांनी तुकोबांच्या पत्नी जिजाबाईंच्या हातची शिदोरी मोठ्या आनंदाचे खाल्ली होती.

भंडारा डोंगराच्या मागच्या बाजूने डोंगर उतरून पायवाटेने चालत गेले की एक गुफा आहे. ही गुफा काळ्या पाषाणात कोरलेली असून गुफेसमोर दोन पाण्याचे टाके देखील आहेत. ही गुफा बौद्ध लेणी असल्याचे सांगतात. 'Dehu information in marathi'

डोंगराच्या माथ्यावरून दिसणारे निसर्गाचे सौंदर्य हे आपल्या मनाला अगदी प्रसन्न करते. तर पावसाळ्यात डोंगराची हिरवळ ही निसर्गाचे सौंदर्य अजूनच खुलवते. या ठिकाणी भाविक, पर्यटक नेहमीच भेट देत असतात.



'Dehu information in marathi' ही माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

Post a Comment

0 Comments