लाल महाल पुणे | Lal mahal pune information in marathi
![]() |
'Lal mahal pune information in marathi' |
जिजाऊ माता ह्या शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक मजबूत आणि प्रभावशाली व्यक्ती होत्या. शिवरायांच्या संगोपनात आणि स्वराज्याच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 'Lal mahal pune information in marathi'
लालमहालाच्या पुनर्बांधणीनंतर, लाल महाल हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य चळवळीचे मध्यवर्ती केंद्र बनले. त्यांच्या मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात आणि स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान लालमहाल हे शिवरायांचे निवासस्थान आणि मुख्यालय म्हणून काम करत होते.
लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याची ऐतिहासिक घटना देखील घडली.
लाल महाल हा पुणे आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी अभिमान आणि आदराचे प्रतीक आहे. लालमहाल हा शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या शौर्याचे आणि समृद्ध वारशाचे प्रतिनिधित्व करतो. लाल महाल ही वास्तू अभ्यासकांना भारतातील सर्वात प्रतिष्ठित राजाचे जीवन आणि कर्तृत्व जाणून घेण्याची संधी देते.
लाल महाल कोठे आहे?
पुणे येथे पीएमपीएमएलच्या बसस्थानकावरून छत्रपती शिवाजी पूल ओलांडून, कसब पेठेत, प्रसिद्ध शिवाजी रोडवरील शनिवार वाड्याच्या अगदी समोरासमोर जिजाऊ उद्यानात लाल महाल आहे. 'Lal mahal pune information in marathi'
पुण्यात फिरवला सोन्याचा नांगर
सतराव्या शतकात पुणे सुपा ही शहाजीराजे भोसले यांची जहागीर होती. या जहागिरीवर शहाजीराजांनी जिजामाता आणि शिवरायांना पाठवले होते. शिवरायांना बेंगलोर येथील दोन वर्षाच्या वास्तव्यात असतानाच सर्व प्रकारचे शिक्षण, युद्ध कौशल्य, प्रशिक्षण शहाजी राजे आणि जिजाऊंनी दिले होते. हत्ती, घोडे, मुसद्दी सरदार आणि आर्थिक पाठबळ देऊन शहाजींनी जिजाऊ आणि शिवाजी महाराजांना पुण्याच्या जहागिरीवर पाठवले. तेव्हा बारा वर्षाचे शिवाजी महाराज आणि जिजाऊमाता पुण्यातील शिवापूर येथे दाखल झाले. तेव्हा आदिलशहाने पुण्याचा जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवून पुण्याला उध्वस्त केले होते. 'Lal mahal pune information in marathi' अशावेळी पुणे जहागिरीचे सर्व सूत्र जिजाऊंकडे आले असता, त्यांनी आदिलशाही सरदारांना झिडकारत, पुण्याला परत एकदा समृद्ध करण्याच्या हेतूने शिवरायांच्या हस्ते पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला.
'Lal mahal pune information in marathi' |
त्यावेळी त्यांच्यासोबत पुण्यातील असंख्य शेतकरी देखील होते. आणि इथेच शिवाजी महाराजांच्या पराक्रमांना सुरुवात झाली.
शाहिस्तेखान प्रकरण
पुणे जहागिरीत आल्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी मोहिमा चालू केल्या. तोरणा, राजगड, पुरंदर, सिंहगड असे केले ताब्यात घेत त्यांनी आदिलशाही बरोबरच मुघलांनाही चकित केले. अशातच शिवाजी महाराजांनी मुघलांच्या जुन्नर येथील तळावर हल्ला करून मुघलांना जबरदस्त तडाखा दिला. 'Lal mahal pune information in marathi'
पुढे औरंगजेब बादशहा झाल्यानंतर शिवरायांनी सिद्धी जोहर, अफजल खान यांचा वध केल्यानंतर, औरंगजेबाला शिवरायांची दक्षिणेत चिंता वाटू लागली. तेव्हा औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ताखानाला दक्षिणेत शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. शिवरायांना तो शाहिस्तेखान चुहा म्हणत दिल्लीहून दक्षिणेकडे रवाना झाला. आपल्या सोबत तोफखान्यासह लाखांची फौज घेऊन तो वाटेतील गावे लुटत 9 मे 1660 रोजी पुण्यात आला. राहण्यासाठी त्याने जिजाऊंनी बांधलेला लाल महाल ताब्यात घेऊन, तिथेच त्यांनी आपला मुक्काम देखील ठोकला.
पुढे त्यांनी हिरवे निशाण घेऊन पुणे प्रांतातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. लाल महालात राहून तो एक एक मराठा सरदार फितवत होता. रयतेची लूटमार करत होता. हे सर्व राजगडावर असणाऱ्या जिजाऊ आणि शिवरायांना सलत होते. शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना या मुलखात पाठवलं. त्यात त्यांना थोडेसे यशही आलं. अशातच शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला अद्दल घडवण्यासाठी एक नामी डाव आखला.
शाहिस्तेखानाची बोटे कापली
शिवाजी महाराजांनी लाल महालात निर्धास्तपणे असणाऱ्या मुघलांची बारकाईने माहिती घेतली; आणि 6 एप्रिल 1666 या दिवशी, रात्री मोगल सैन्य रमजानचा उपवास सोडून गाढ झोपेत असतानाच शिवाजी महाराज हे निवडक मावळ्यांना घेऊन लाल महालाच्या भिंतीला भोक पाडून, लाल महालाच्या आत शिरले. हे शाहिस्तेखानाच्या दास्यांमार्फत शाहिस्तेखानाला समजतात तो बावरला. मराठा मावळे मुघल सैन्यावर तुटून पडले. आरडाओरडा झाला, पळापळ चालू झाली. दरम्यान खानाचा मुलगा फत्तेखान हा मारला गेला. खान देखील जीव वाचवण्यासाठी पळत होता. 'Lal mahal pune information in marathi'
शिवरायांनी हल्ला केल्याचे समजताच मुघल सैनिक फरार झाले. खान देखील जीव वाचवत पळत होता. शाहिस्तेखान हा खिडकीतून उडी मारत होता. तेवढ्यात शिवाजी महाराजांनी त्याच्यावर वार केला आणि तो त्यांच्या बोटांवर बसताच त्यांच्या हाताची बोटे तुटली. तेव्हा खान जनानखान्यात लपून बसला.
नंतर खानाच्या सैन्याला हूल देत शिवाजी महाराज सिंहगडावर पोहोचले.
या घटनेनंतर शाहिस्तेखान फारच घाबरला आणि तिसऱ्या दिवशीच तो दिल्लीकडे रवाना झाला.
सध्याचा लाल महाल
सध्याचा लाल महाल ही वास्तू पुण्यातील शिवाजी रोडवर आहे. आता उभी असलेली ही वास्तू पुणे महानगरपालिकेने 1988 साली उभारलेली आहे. शहाजीराजे आणि जिजाऊंनी बांधलेला लाल महाल सध्या अस्तित्वात नाही.
या लाल महालात जिजाऊंचा पुतळा असून, बाजूला रायगड किल्ल्यांची प्रतिकृती देखील आहे. लाल महालासमोर पुण्याची जमीन सोन्याच्या फाळाने नांगरत असतानाचे जिजाऊ आणि बाल शिवबांचे शिल्प आहे. 'Lal mahal pune information in marathi'
हजारो लोक दररोज लाल महाल बघण्यासाठी येऊन जिजाऊंचे दर्शन घेत, शिवरायांच्या इतिहासात हरवून जातात.
सध्या लाल महाल हा शिवाजी महाराजांना समर्पित संग्रहालय आणि स्मारक म्हणून उभा आहे. संग्रहालयात शस्त्रे, चिलखत, चित्रे आणि शिल्पे यांसह शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित विविध कलाकृती आहेत. जेणेकरून लोकांना स्वराज्याच्या समृद्ध इतिहासाचा अभ्यास करता यावा.
नूतनीकरण आणि जतन
लाल महाल, पुणे |
गेल्या काही वर्षांमध्ये, लाल महालाचे अनेक नूतनीकरण आणि विस्तार करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात, ऐतिहासिक वास्तू म्हणून या लालमहालाची देखभाल आणि जतन करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेने घेतली आहे. 'Lal mahal pune information in marathi'
0 Comments