राजगड किल्ला संपूर्ण माहिती | Rajgad fort information in marathi
![]() |
'Rajgad fort information in marathi' |
राजगड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे शहराच्या नैऋत्येस अंदाजे 45 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला साधारण समुद्रसपाटीपासून सुमारे 1,400 मीटर (4,600 फूट) उंचीवर स्थित आहे.
राजगड किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे कारण त्याने 25 वर्षांहून अधिक काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून काम केले. मराठा राज्याच्या निर्मितीमध्ये याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि अनेक लढाया आणि ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत.
किल्ल्याची रचना भव्य आहे आणि मोठ्या क्षेत्राचा व्यापलेला आहे. हे प्रभावी तटबंदी, बुरुज, दरवाजे आणि असंख्य जलसाठ्यांसाठी ओळखले जाते. किल्ल्याची रचना मराठ्यांचे तेज दर्शवते, ज्यामध्ये अनेक स्तरावरील संरक्षण यंत्रणा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी रुप न्याहाळत, स्वराज्याचा साक्षीदार बनलेल्या राजगड किल्ल्याला तीन बाजूंना तीन माच्या असून, किल्ल्याच्या मध्यभागी भक्कम असा बालेकिल्ला आहे.
राजगड किल्ला आजूबाजूच्या सह्याद्री पर्वत आणि दऱ्यांचे चित्तथरारक दृश्ये देतो. बाले किल्ला (मुख्य तटबंदी), सुवेळा माची, पद्मावती माची, संजीवनी माची आणि पद्मावती देवीचे मंदिर हे किल्ल्यातील काही प्रमुख आकर्षणे आहेत. पाली दरवाजा, किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. राजगड किल्ला हे गडप्रेमी पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. गडाचा ट्रेक मध्यम आव्हानात्मक आहे; आणि शिखरावर पोहोचण्यासाठी सुमारे 3-4 तास लागतात. गडावर जाण्याचा मार्ग हा निसर्गरम्य, सौंदर्याने नटलेला असून, वाटेत ऐतिहासिक अवशेष पाहण्याची संधी लाभते. 'Rajgad fort information in marathi'
राजगड किल्ल्याचा इतिहास
राजगड किल्ला हा पूर्वी मुरुंबदेवाचा डोंगर या नावाने प्रचलित होता. गौतमीपुत्र सातकर्णी या शालीवाहन राजाने इसवीसनाच्या पहिल्या शतकात या डोंगरावर बांधकाम करून डोंगराला किल्ल्याचे स्वरूप दिले. 1645 च्या आसपास हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून त्याला राजगड असे नाव दिले. पुढे जवळपास 25 वर्ष या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचे वास्तव्य होते.
सातवाहन काळाच्या पूर्वीपासून असलेला हा किल्ला 1490 च्या सुमारास निजामशाहीत आला. आणि पुढे 125 वर्षे निजामाच्या ताब्यात होता. हा मुरुंबदेवाचा डोंगर 1625 मध्ये आदिलशहाने निजामशाहाकडून जिंकून घेतला. पण परत 1630 च्या दरम्यान हा किल्ला निजामशाहीत आला. तेव्हा शहाजीराजांनी सोनाजी नावाच्या अधिकाऱ्याकडे या किल्ल्याचा कारभार सोपवला.
इतिहासातील अस्पष्ट पुरावे यांच्या आधारे जवळपास १६४५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून घेतला. त्यावर प्रचंड वेगाने इमारती, माच्या, बुरुज, तटबंदी असे बांधकाम सुरू केले; आणि या किल्ल्याला राजगड 'Rajgad fort information in marathi' असे नाव दिले. पुढे हाच किल्ला त्यांनी स्वराज्याच्या राजधानीसाठी निवडला. 1680 ला छत्रपती शिवाजी महाराज आणि 1689 ला छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर मुघल सरदार किशोर सिंह हाडा यांनी राजगड किल्ला जून 1689 ला ताब्यात घेत औरंगजेबाला अर्पण केला. पण काही वर्षांतच राजगड पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला आणि औरंगजेबाला जबरदस्त तडाखा दिला.
पुढे 1703 मध्ये स्वतः औरंगजेबाने राजगडावर मोहीम आखली आणि 4 फेब्रुवारी 1703 रोजी हा राजगड किल्ला जिंकून घेतला; आणि त्यांचे नबिशहागड असे नामकरण केले.
मे 1707 मध्ये गुणाजी सावंत यांनी राजगड किल्ला मराठ्यांच्या ताब्यात म्हणजे शाहू महाराजांना जिंकून दिला. पेशवे काळात राजगडावरील आर्थिक स्थिती ढासळली आणि अशातच हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात गेला.
राजगड किल्ल्यावरील महत्त्वाच्या घटना
• छत्रपती शिवाजी महाराज 6 एप्रिल 1663 रोजी लाल महालात शाहिस्तेखानावर हल्ला करून राजगडावर पोहोचले होते.
• छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले असता तिथे त्यांना कैदेत ठेवले होते. पण आपल्या चतुराईने शिवाजी महाराज हे आग्र्याहून निसटून 12 सप्टेंबर 1666 रोजी राजगडावर आपल्या निवडक सहकार्यांसोबत सुखरूप पोहोचले होते.
• राजगडावर छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. 'Rajgad fort information in marathi'
• 1670 मध्ये तानाजी मालुसरे सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी राजगडावरूनच निघाले.
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई यांचे निधन राजगडावर 5 सप्टेंबर 1659 रोजी झाले.
राजगड किल्ल्यावरील मुख्य दरवाजे
• गुंजवणे दरवाजा
• पाली दरवाजा
• आळू दरवाजा
राजगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे
राजवाडा
राजवाडा ही राजगडावरील सर्वात महत्त्वाची अशी वास्तू आहे. रामेश्वर मंदिरापासून वर गेल्यानंतर समोर भव्य असा राजवाडा होता. आता या ठिकाणी राजवाड्याचे अवशेष आहेत. या राजवाड्याच्या समोरच एक विस्तीर्ण अशी शिवबाग होती. इथेच अंबरखाना, सदर आणि दारूची कोठार आशा महत्वाच्या वस्तू देखील होत्या. या भाग्यशाली राजवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज वास्तव्यास असायचे.
बालेकिल्ला
बालेकिल्ला हा गडावरील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. बालेकिल्ला हा राजवाड्यात सर्वात उंच ठिकाण आहे. अरुंद, कठीण चढणीचा रस्ता ओलांडून महादरवाजातून बालेकिल्ल्यात जाता येते. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारावर कमळ आणि स्वस्तिकाचे शिल्प कोरलेले पाहायला मिळतात. तटबंदीने वेढलेला बालेकिल्ल्यात जाण्यासाठी उत्तर बुरुजाच्या खालून एक पायवाट देखील आहे. आत गेल्यानंतर चंद्रतळे आणि जननी मंदिर देखील दिसते. 'Rajgad fort information in marathi'
सईबाईंची समाधी
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मानंतर काही दिवसातच सईबाई यांचे बाळंत व्याधीने राजगडावर निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार राजगडावरच करण्यात आले. तिथेच पद्मावती माचीवर, पद्मावती देवीच्या मंदिरासमोर सईबाईंची समाधी आहे. 'Rajgad fort information in marathi'
पद्मावती मंदिर
राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मावती देवीचे मंदिर बांधले आणि त्यात मूर्ती स्थापित केली. मंदिरात तीन मुर्त्या आहेत. त्यातील एक मूर्ती ही भोरच्या पंतांनी स्थापन केली होती. मंदिरातील तांदळा/पद्मावती देवीला शेंदूर लावलेला आहे. या मंदिरात 20 ते 30 जण सहजपणे राहू शकतात. पद्मावती मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत. तसेच समोरच सईबाईंची समाधी देखील आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार हा 2002 साली झाला आहे.
पद्मावती तलाव
पद्मावती माची च्या समोरच एक विस्तीर्ण तलाव पाहायला मिळतो तो पद्मावती तलाव होय. सुंदर बांधकामाच्या या तलावाच्या भिंती आजही चांगल्या स्थितीत असून, त्यातील कमानी मधून तलावात जाता येते. पद्मावती तलावाच्या खोदकामातून निघालेला दगड गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात आला होता. इथेच पद्मावती मंदिराच्या समोर रामेश्वर मंदिर आहे. या मंदिरात शिवलिंग आणि मारुतीची मूर्ती आहे.
संजीवनी माची
'Rajgad fort information in marathi' राजगडावर असलेली संजीवनी माची ही जवळपास दोन ते अडीच किलोमीटर लांबीची आहे. ही माची तीन टप्प्यात बांधलेली असून माचीवर घरे देखील होते. त्याचे अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात. संजीवनी माचीवर अनेक पाण्याची टाकी देखील आहेत. या माचीला एकूण 19 भव्य बुरुज आहेत. तोरणा किल्ल्यावरून राजगडावरील संजीवनी माचीवर येण्यासाठी अळू दरवाजाचा वापर करावा लागतो. इथूनच चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते.
संजीवनी माची पर्यटक, निसर्गप्रेमी आणि राजगड किल्ल्याला भेट देणार्या इतिहासप्रेमींना आकर्षित करते. राजगड किल्ला आणि संजीवनी माचीवरील पर्यटन हे मध्यम आव्हानात्मक असून किल्ल्याचे अवशेष, मंदिरे आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या इतर वास्तूंचे अन्वेषण करण्याची आणि हिरवळ, ताजी हवा आणि विहंगम दृश्ये न्याहाळण्याची संधी संजीवनी माचीवर भेटते.
सुवेळा माची
पद्मावती तलावाच्या बाजूने सरळ वर जाऊन तिठा लागतो, तेथून बालेकिल्ल्याचा आणि संजीवनी माचीचा रस्ता सोडून तिसऱ्या रस्त्याने सुवेळा माचीकडे जाता येते. या माचीला चिलखती बुरुज आणि तटबंदीची झालर आहे. तर माचीच्या उजवीकडे पाली दरवाजा दिसतो.
ही सुवेळा माची छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकताच किल्ल्याच्या उजवीकडे भक्कम बांधली. ही माची संजीवनी माचीच्या दृष्टीने लहान आहे. माचीचे बांधकाम तीन टप्प्यात असून ही माची पुढे लहान होत जाते. सुवेळा माचीचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे साथीदार येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे यांचे याच सुवेळा माचीवर वास्तव्य होते.
पद्मावती माची
पद्मावती माची ही गडावरील तीन मच्यांपैकी सर्वात प्रशस्त माची होती. पूर्वी या माचीवर इमारती देखील होत्या. 'Rajgad fort information in marathi'
या पद्मावती माचीवर राणी सईबाईंची समाधी, पद्मावती देवीचे मंदिर, पद्मावती तलाव, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, रत्नशाळा अशा महत्त्वाच्या वास्तू आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजवाडा ही मुख्य वास्तू देखील याच पद्मावती माचीवर आहे. आजही त्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात.
राजगड किल्ला फोटो
![]() |
राजगड किल्ला फोटो |
![]() |
राजगड किल्ला फोटो |
![]() |
राजगड किल्ला फोटो |
राजगड किल्ल्यावर जाण्याचा मार्ग
पुणे शहरातून वेल्हे रस्त्याने राजगड 'Rajgad fort information in marathi' किल्ल्यावर जाता येते. सर्वात जवळचा मार्ग गुंजवणे हा आहे. गुंजवणे हे राजगडाच्या पायथ्याचे गाव आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहने किंवा टॅक्सी भाड्याने घेतल्या जाऊ शकतात; आणि त्यानंतर चालत गडाच्या माथ्यावर जावे लागते. दरम्यान हवामानाची स्थिती तपासणे आणि पुरेसे पाणी आणि स्नॅक्स पर्यटकांनी आपल्या जवळ ठेवावे.
राजगड किल्ल्यावरून दिसणारे इतर किल्ले
• तोरणा किल्ला
• पुरंदर किल्ला
• प्रतापगड किल्ला
• लिंगाणा किल्ला
• सिंहगड किल्ला
• लोहगड किल्ला
• मल्हारगड किल्ला
• रोहिडा किल्ला
• विसापूर किल्ला
• रायगड किल्ला
• रायरेश्वर किल्ला
महत्त्वाचे
'Rajgad fort information in marathi' राजगड किल्ल्याजवळ मर्यादित निवास पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यटक अनेकदा पुणे किंवा किल्ल्याच्या जवळपासच्या ठिकाणी राहणे पसंत करतात; आणि किल्ल्यावर एक दिवसाच्या सहलीचे नियोजन करतात. कारण गडावर तळ ठोकण्यास परवानगी नाही.
![]() |
'Rajgad fort information in marathi' |
0 Comments