आषाढी वारी-आषाढी यात्रा पंढरपूर | ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra

आषाढी वारी-आषाढी यात्रा पंढरपूर | ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra

'ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra'
'ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra'




आषाढी वारी पंढरपूर, ज्याला आषाढी एकादशी म्हणूनही ओळखले जाते. ही महाराष्ट्रातील एक अत्यंत पूजनीय धार्मिक तीर्थक्षेत्री यात्रा आहे. दरवर्षी, आषाढ महिन्याच्या अकराव्या दिवशी, भाविक-भक्त भगवान विठ्ठल पांडुरंग आणि रुक्मिणी यांचे दर्शन, आशीर्वाद घेण्यासाठी पंढरपूरच्या पवित्र प्रवासाला निघतात. आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला वारी नेण्याची परंपरा तशी फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज हे महान संत दरवर्षी पायी चालत आषाढीला पंढरपूरला जात असत. तीच परंपरा आत्ता देखील भाविकांनी जपून ठेवली आहे. 'ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra'

आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये खूप महत्त्व आहे. पंढरपूरची तीर्थयात्रा ही लाखो भाविकांनी जीवापाड जपलेली परंपरा आहे. असे मानले जाते की पांडुरंग आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी या शुभ दिवशी प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामनात अवतरतात. हा प्रवास भक्ताचे प्रेम, भक्ती आणि परमात्म्याला शरण जाण्याचे प्रतीक आहे.

आषाढी यात्रेच्या काही महिने आधीपासून भाविक शारीरिक आणि मानसिक तयारी करू लागतात. बरेच लोक उपवास करतात, ध्यान करतात आणि त्यांचे मन आणि शरीर शुद्ध करण्यासाठी भजन, कीर्तन आणि नामस्मरणात गुंतून जातात. 'वारी' किंवा 'दिंडी' घेऊन भक्त एकत्र येतात, कित्येक मैल पायी चालतात, भक्तिगीते गातात आणि भगवान विठ्ठलाचे नामस्मरण करत, भगवी पताका घेऊन पंढरीची वाट चालू लागतात. 

पाऊले चालती पंढरीची वाट !

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तीमय होऊन जाते. पारंपारिक पोशाख परिधान केलेले हजारो लाखो भाविक चंद्रभागेच्या तीरावर एकत्र येतात; आणि पंढरपुरात भक्तीचे मेळावे भरवतात. या स्वर्गसुख देणाऱ्या दिव्य यात्रेला जाण्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील लोक एकत्र येतात, आणि पांडुरंगाच्या भक्तीत रमून जातात.

पंढरपूरला पोहोचल्यावर भाविक विविध धार्मिक विधी आणि चालीरीतींमध्ये सहभाग घेतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'दर्शन', ज्यामध्ये आपल्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी, त्याला डोळेभरून पाहण्यासाठी आतुर असतात. आपल्या मायबाप विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविक तासन्तास लांब रांगेत उभे असतात. तासनतास उभे असणारे भाविक पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतात; आणि त्याच्या चरणी लेकरू होऊन आपल्या व्यथा मांडतात. 'ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra'

दर्शनाव्यतिरिक्त, भक्त पंढरपूरमधील पौराणिक महत्त्व असलेल्या पुंडलिक मंदिर आणि चंद्रभागा नदीसारख्या पवित्र ठिकाणी देखील भेट देतात. ते चंद्रभागेत विधीवत स्नान करतात आणि प्रार्थना करतात शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी आणि संबंध जगाच्या कल्याणासाठी.

चल गं सखे, चल गं सखे
पंढरीला जाऊ !!

'ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra'
आषाढी वारी, पंढरपूर




आषाढी वारी पंढरपूर ही केवळ धार्मिक यात्रा नाही; तर प्रत्येक भाविकांच्या हृदयाला स्पर्श करणारा हा अनुभव आहे. संपूर्ण प्रवास भक्ती गायन, नृत्य आणि बंधुत्वाच्या खोल भावनेने भरलेला आहे. भक्तांनी दाखवलेला उत्साह आणि भक्ती सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करते.


पालखी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी

सातारा जिल्ह्यातील देशमुख असलेले हैबतबाबा यांच्या प्रेरणेने आळंदीहून ज्ञानोबांच्या पवित्र पादुका पालखीत थाटामातात पंढरपूरला नेण्याचा आरंभ झाला. डोळे दिपवणाऱ्या या सोहळ्यात पूर्वी हत्ती, घोडे असा लवाजमा असायचा. आता मानाच्या खिल्लार बैल जोडीच्या रथाने, लाखो भाविकांसोबत ऊन, वारा, पाऊस झेलत पालखी भक्ती सागरात उजळून निघते. आळंदी येथून निघणारा हा पालखी सोहळा 3 जिल्हे आणि 17 मुक्काम करत पंढरपूर ला जातो. वाटेत या सोहळ्यात 7 गोल रिंगण देखील होत असतात. 'ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra'

आळंदी देवस्थानाच्या वतीने या सोहळ्याचे चोख नियोजन केले जाते.


संत तुकाराम महाराज पालखी

तुकोबांच्या घरात पूर्वीपासूनच वारीची परंपरा होती. तुकाराम महाराज हे देखील आषाढी वारी 'ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra' घेऊन नित्यनेमाने पंढरपूरला जात असत. असे सांगितले जाते की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे तुकोबांच्या वारीला संरक्षण देत असत. त्यामुळे तुकोबांची आषाढी वारी सुखरूप पंढरपूरला पोहोचत असे.

तुकाराम महाराजांच्या नंतर त्यांचे पुत्र नारायण महाराज यांनी ही वारीची परंपरा कायम जपली. त्यांनी वारीचे रूपांतर पालखीत करून, ती अखंड चालू ठेवली. आज देखील ही वारीची परंपरा कायम आहे.

तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून जातो. पुणे 12 व सोलापूर 5 असे एकूण 17 मुक्काम घेत सोहळा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात वाटेत एकूण 6 रिंगण केले जातात.


आषाढी वारी संपूर्ण वेळापत्रक 2023


संत ज्ञानेश्वर महाराज पालखी

11 जून - प्रस्थान

12,13 जून - पुणे

14,15 जून - सासवड

16 जून - जेजुरी

17 जून - वाल्हे

18,19 जून - लोणंद

20 जून - तरडगाव

21 जून - फलटण

22 जून -बरड

23 जून - नातेपुते

24 जून - माळशिरस

25 जून - वेळापूर

26 जून -भेंडीशेगाव

27 जून - वाखरी

28 जून - पंढरपूर


संत तुकाराम महाराज पालखी

10 जून - प्रस्थान

11 जून - आकुर्डी

12,13 जून - पुणे

14 जून - लोणी काळभोर

15 जून - यवत

16 जून - वरवंड

17 जून - उंडवडी गवळ्याची

18 जून - बारामती

19 जून - सणसर

20 जून - अथुर्णे

21 जून - निमगाव केतकी

22 जून - इंदापूर

23 जून - सराटी

24 जून - अकलूज

25 जून - बोरगाव

26 जून - पिराची कुरोली

27 जून - वाखरी

28 जून - पंढरपूर


आषाढी वारीतील प्रमुख पालख्या

• संत ज्ञानेश्वर महाराज - आळंदी

• संत तुकाराम महाराज - देहू

• संत सोपानदेव - सासवड

• संत निवृत्तीनाथ महाराज - नाशिक

• संत मुक्ताबाई - जळगाव

• संत एकनाथ महाराज - पैठण 

• संत नामदेव महाराज - पंढरपूर

• श्री संत गजानन महाराज - शेगाव

• संत निळोबाराय - पिंपळणेर


विठ्ठल मंदिर पंढरपूर

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.

हे मंदिर वारकऱ्यांचे मायबाप असणारे भगवान पांडुरंग आणि रुक्मिणी यांना समर्पित आहे. भगवान विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पूजनीय आहेत. भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आणि पलीकडून भाविक येत असतात. 'ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra'

'ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra'
विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर




विठ्ठल रुक्मिणी या मंदिराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे. असे मानले जाते की मूळ मंदिर हे 12 व्या शतकाच्या आसपास बांधले गेले होते. कालांतराने, मंदिर संकुलाचे अनेक नूतनीकरण आणि विस्तार झाला आहे. मंदिराची वास्तू ही हेमाडपंती शैलीची दिसून येते, जी यादव राजवटीत प्रचलित होती. मंदिराच्या संकुलात अनेक सभागृहे, अंगण आणि देवस्थान आहेत. मुख्य गर्भगृहात विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे. सुमारे साडेतीन फूट उंच उभी असलेली काळ्या पाषाणातील विठ्ठलाची मूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण आहे.

मंदिर परिसरात आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी दरम्यान भव्य सण, उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांमध्ये सहभागी होऊन पांडुरंगाचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात.

मंदिर परिसरात भक्तांसाठी निवास, मोफत भोजन आणि आंघोळीची सोया आशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. भाविकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरवण्याचे काम मंदिर ट्रस्ट कडून केले जाते.


चंद्रभागा

विठ्ठलाच्या भक्तांसाठी चंद्रभागा नदीला मोठे धार्मिक महत्त्व आहे. चंद्रभागा नदी ही पंढरपूरमधील प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळून वाहते.

मूळची भीमा नदी असलेली चंद्रभागा ही पंढरपूर मध्ये चंद्राच्या कोरीप्रमाणे वाहत जाते म्हणून ही भीमा नदी चंद्रभागा म्हणून प्रसिद्ध झाली. 'ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra'

आषाढी एकादशी हा पंढरपूरमधील सर्वात महत्त्वाचा वार्षिक उत्सव आहे. या दिवशी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविक भक्त शेकडो मैलांचा प्रवास करत, पायी चालत वारी घेऊन मोठ्या श्रद्धेने येत असतात. 

'ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra'
चंद्रभागा, पंढरपूर




आषाढी, कार्तिकी एकादशीला किंवा इतर प्रसंगी पंढरपूरला येणारे भाविक चंद्रभागा नदीत विधीवत स्नान करत असतात. असे मानले जाते की चंद्रभागेचे स्नान हे अंगी असलेल्या पापांना शुद्ध करते आणि माणसाचे मन निर्मळ करते.

माझी माय चंद्रभागा आज चांदण्यात न्हाली |

भोळ्या संतांची पंढरी आज आम्हासी लाभली || 

स्कंद पुराण आणि पद्म पुराण यांसारख्या प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये देखील चंद्रभागा नदीचा उल्लेख आढळतो. विठ्ठलाच्या अवतारात श्रीकृष्णाने स्वतः या नदीत स्नान केल्याचे सांगितले जाते. चंद्रभागा नदीचा विठ्ठल पांडुरंग आणि पंढरपूर यांच्याशी असलेला संबंध तिचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वाढवतो. त्यामुळेच पंढरपूरात आलेला प्रत्येक भाविक या नदीच्या पवित्र पाण्याने स्नान करूनच जातो.


आषाढी एकादशी शासकीय पूजा

आषाढी एकादशी निमित्त या दिवशी पहाटे लवकर, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे सपत्नीक पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करत असतात. राज्याचे प्रमुख म्हणून हा बहुमान त्यांना मिळतो. त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील एका दांपत्याला दरवर्षी या महापुजेचा मान दिला जातो. 'ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra'

आषाढी वारी ही भक्ती, प्रेम आणि एकात्मतेचे सार दाखवणारी पवित्र यात्रा आहे. हा विठ्ठलावरील श्रद्धेचा आणि प्रेमाचा उत्सव आहे. तुम्ही प्रत्यक्ष या आषाढी वारीत/यात्रेत सहभागी असाल किंवा दुरूनच त्याचे साक्षीदार असाल तरी देखील हा भक्ती, भाव, प्रेमाचा उत्सव मानवी मनाला पराकोटीचे समाधान देतो.


आषाढी वारी-आषाढी यात्रा पंढरपूर | ashadhi wari | ashadhi ekadashi pandharpur yatra ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल.


जय हरी विठ्ठल 🚩🙏



Post a Comment

0 Comments