GST संपूर्ण मराठी माहिती | GST information in marathi
![]() |
'GST information in marathi' |
GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर. हा जगभरातील अनेक देशांमध्ये वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणारा मूल्यवर्धित कर आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून आकारण्यात येणारे अनेक अप्रत्यक्ष कर बदलून करप्रणाली सुव्यवस्थित करणे हा जीएसटीचा उद्देश आहे. |
जीएसटी हा कर भारतात 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आला. पूर्वीच्या जटिल कर संरचनेच्या जागी लागू झाला, ज्यामध्ये विविध अप्रत्यक्ष कर होते. 'GST information in marathi'
भारत हा दुहेरी GST मॉडेलचे अनुसरण करतो, म्हणजे GST केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीकडून आकारला जातो. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) केंद्र सरकारद्वारे आकारला जातो. तर राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST) राज्य सरकारद्वारे आकारला जातो.
GST च्या अगोदर भारतात अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर लागू होते. हे कर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असायचे त्यामुळे या करात अस्थिरता आढळून येत होती. काही राज्यात हा कर जास्त तर काही राज्यात कमी होता. या सर्व जटील करांचे एकत्रीकरण करून देशभरात एकसमान कर प्रणाली म्हणजे एक देश एक कर प्रणाली आणण्यासाठी 8 ऑगस्ट 2016 रोजी जीएसटी संबंधी विधेयक संमत करण्यात आले; आणि 1 जुलै 2017 रोजी पासून भारतात वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला.
GST लागू करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती यांनी 30 जून 2017 रोजी मध्यरात्री संसदेत एक विशेष अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनात त्यांनी जीएसटी लागू करण्याची अधिकृत घोषणा केली.
पूर्वीची अनेक अप्रत्यक्ष करप्रणाली रद्द करून जीएसटी सारखी एकसमान कर प्रणाली लागू करण्यासाठी संविधानिक बदल गरजेचे होते. म्हणून 122 वी घटना दुरुस्ती करून नवीन कायदा करण्यात आला. 'GST information in marathi'
केंद्रीय अर्थमंत्री हे प्रमुख असलेली 'गुड्स अँड सर्विसेस कौन्सिल' ही वैधानिक संस्था जीएसटीचे नियमन करत असते.
GST म्हणजे काय?
जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर होय. हा केंद्र आणि राज्य शासनाकडून अप्रत्यक्षपणे वस्तू आणि सेवांवर आकारला जाणारा कर आहे.
GST या करामुळे ग्राहकाला भारतातील कोणत्याही राज्यात एखाद्या वस्तूवरील कर हा समान भरावा लागेतो.
GST च्या अगोदर असलेले कर
• Service tax
• State tax
• Duties of excise
• Purchase tax
• Central sales tax
• Central excise duty
GST जीएसटी चे घटक
CGST
CGST म्हणजे Central goods and services tax होय.
CGST हा राज्या अंतर्गत होणाऱ्या व्यवहारांवर केंद्र सरकार द्वारे आकारण्यात येणारा कर आहे.
SGST
SGST म्हणजे State goods and services tax होय.
राज्य अंतर्गत होणाऱ्या वस्तू व सेवांच्या विक्रीवर राज्य शासनाद्वारे SGST आकारला जातो. 'GST information in marathi'
जर आपण एखादी वस्तू एकाच राज्यात खरेदी करून त्याच राज्यात विकली तर त्या व्यवहारावर आपल्याला एसजीएसटी द्यावा लागतो.
IGST
IGST म्हणजे Integrated goods and services tax होय.
IGST हा वस्तू व सेवांच्या आंतरराज्यामध्ये होणाऱ्या खरेदी विक्रीवर लागणारा कर आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून IGST आकारतात.
UTGST
UTGST म्हणजे Union territory GST होय. UTGST हा देशातील केंद्रशासित प्रदेशांमध्ये आकारण्यात येतो दिल्ली, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, दादरा नगर हवेली, अंदमान आणि निकोबार, लक्षदीप, लडाख, दमन दिव, पाँडिचेरी उभा केंद्रशासित प्रदेशात UTGST आणि CGST आकारला जातो.
GST नोंदणी कोणी करावी?
जे व्यावसायिक पूर्वीचे vat, excise सारखे कर भरायचे त्या व्यवसायिकांना जीएसटी नोंदणी आवश्यक आहे. याप्रमाणेच उत्पादन, सेवा, वितरण आणि ई-कॉमर्स सारखे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस देखील GST नोंदणी आवश्यक आहे. पण त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 10, 20 तर काही ठिकाणी चाळीस लाखांच्या वर असावे. 'GST information in marathi' अटी पेक्षा कमी उत्पन्न आणि नवीन व्यवसायिकांसाठी जीएसटी नोंदणी ही ऐच्छिक आहे.
GST नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे
• GST फॉर्म
• आधारकार्ड
• पॅनकार्ड
• व्यवसाय पुरावा
• ओळखपत्र
• बँकखाते
• व्यवसाय पत्ता
• डिजिटल सही
• फोटो
GST नोंदणी प्रक्रिया
◆ GST नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही www.gst.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
◆ आता मेनू बारमधील service वर क्लिक करून, नवीन नोंदणी New Registration या पर्यायाची निवड करा.
◆ नवीन पेज ओपन झाले की त्यातील भाग A संदर्भातील पॅनकार्ड, मोबाईल नंबर, इमेल अशी माहिती भरून OTP साठी क्लिक करा.
◆ तुम्हाला आता एक TRN प्राप्त होईल. जो नोंदणी प्रक्रियेत महत्वाचा असतो. 'GST information in marathi'
◆ B भागातील सर्व तपशील भरून कागदपत्रे अपलोड केल्यानंतर GST चे कर्मचारी तुमचे कागदपत्रे तपासून बघतात.
◆ GST कर्मचाऱ्याकडून कागदपत्राची पडताळणी होऊन अर्ज मंजूर होतो व त्यानंतर तुम्हाला एक GSTIN दिला जातो.
GST जीएसटी चे दर
भारतातील GST चार कर स्लॅबमध्ये संरचित आहे. 5%, 12%, 18% आणि 28%. याव्यतिरिक्त, काही वस्तू आणि सेवा GST मधून मुक्त आहेत किंवा शून्य कर दराच्या अंतर्गत येतात.
0% कर असलेल्या वस्तू
जीवन आवश्यक वस्तूंवर जीएसटी लावला जात नाही.
उदा. अन्नधान्य, मीठ, गुळ, भाज्या, वर्तमानपत्र, सॅनिटरी नॅपकिन इ.
5% कर असलेल्या वस्तू
साखर, तेल, चहा, मसाले, अगरबत्ती, कॉफी, आयुर्वेदिक औषधे, पिझ्झा ब्रेड, खते इ.
12% कर असलेल्या वस्तू
स्नॅक्स, लोणचे, चीज, लोणी, तूप, टूथपेस्ट, छत्री, भ्रमणध्वनी, औषधे इ.
18% कर असलेल्या वस्तू
चॉकलेट, मिनरल वॉटर, डिटर्जंट, परफ्युम, टीव्ही, वॉशिंग मशीन, केक, आईस्क्रीम,शाम्पू, फ्रीज इ.
28% कर असलेल्या वस्तू
सिगारेट, पान मसाले, सिमेंट, वेल्डिंग मशीन, ऑटोमोबाईल्स इ.
GST दंड
GST जीएसटी नोंदणीकृत व्यावसायिकांनी जर वेळेत GST नाही भरला, तर त्या व्यवसायिकाला 10000 रुपये किंवा कराच्या 10% रक्कम दंड म्हणून भरावी लागते.
![]() |
'GST information in marathi' |
GST जीएसटी चे फायदे
सुलभ कर रचना.
GST जीएसटी हा कोणत्याही राज्यात एकसमान आहे.
प्रत्येक ठिकाणी समान कर असल्याने व्यवसाय वाढीस मदत होते.
GST या एक कर रचनेमुळे पूर्वीच्या अनेक कर रचनेचा त्रास कमी झाला.
व्यवहारात पारदर्शकता आली.
GST मुळे कोणालाही कर चुकवता येणार नाही.
GST जीएसटी या एकसमान करामुळे वस्तूंची किंमत सारखीच राहते. 'GST information in marathi'
GST परिषद
GST परिषद ही केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी बनलेली एक घटनात्मक संस्था आहे. कर दर, सूट आणि प्रक्रियात्मक समस्यांसह जीएसटीच्या विविध पैलूंवर शिफारसी करण्यासाठी GST परिषद जबाबदार असते.
GST ची अधिकृत वेबसाईट
www.gst.gov.in
0 Comments