सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती | Sinhagad fort information in marathi
![]() |
'Sinhagad fort information in marathi' |
सिंहगड किल्ला किंवा कोंढाणा किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे शहराजवळ सह्याद्री पर्वतरांगांच्या भुलेश्वर रांगेत वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. अनेक लढाया आणि घटनांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याला मराठा इतिहासात खूप महत्त्व आहे. सिंहगड हा किल्ला सुरुवातीला कोंढाणा किल्ला म्हणून ओळखला जात होता. 1670 मध्ये, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेतला आणि त्याचे नाव सिंहगड असे ठेवले, म्हणजे "सिंहाचा किल्ला." 'Sinhagad fort information in marathi'
सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला, सिंहगड किल्ला भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा आणि चित्तथरारक नैसर्गिक सौंदर्याचा पुरावा म्हणून उभा आहे. हा भव्य किल्ला असंख्य लढायांचा साक्षीदार आहे आणि संपूर्ण इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांचे ठिकाण आहे.
मूळचा कोंढाणा किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहगड किल्ल्याला मराठा इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. हा 14 व्या शतकाच्या आसपास बांधला गेलेला किल्ला बहमनी सल्तनत, आदिल शाही राजवंश आणि मराठा साम्राज्यासह विविध राजवंशांच्या अधिपत्याखाली होता. महान राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला इतिहासात अधिक महत्त्व प्राप्त झाले.
सिंहगड किल्ल्याची वास्तुकला ही त्या काळातील अभियांत्रिकीचे तेज दर्शवते. किल्ला संकुलात भक्कम दगडी भिंती, बुरुज, दरवाजे आणि विविध वास्तूंचा समावेश आहे. उल्लेखनीय वास्तूंपैकी कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा, प्रत्येक अद्वितीय स्थापत्य शैली प्रदर्शित करते. सिंहगडाच्या लढाईत प्राणाची आहुती देणाऱ्या शूर मराठा सेनापतीला समर्पित असलेले भव्य तानाजी मालुसरे समाधी शौर्य आणि बलिदानाची मार्मिक आठवण म्हणून उभी आहे. 'Sinhagad fort information in marathi'
सिंहगड किल्ला हा समुद्रसपाटीपासून अंदाजे 1,300 मीटर (4,300 फूट) उंचीवर वसलेला असून किल्ल्यावर मजबूत दगडी भिंती आणि बुरुज आहेत जे शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी बांधले गेले आहेत. किल्ल्यामध्ये दरवाजे, मंदिरे, पाण्याच्या टाक्या आणि एक शूर मराठा योद्धा तानाजी मालुसरे समाधी तसेच छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधी स्मारकासह अनेक उल्लेखनीय वास्तू गडावर आहेत.
सिंहगड किल्ला इतिहास
सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव हे कोंढाणा असे होते. या किल्ल्यावर कौंदिन्य ऋषींनी तपचर्या केली होती, म्हणून या डोंगराला कोंढाणा असे नाव पडले. पूर्वी हा किल्ला महादेव कोळी राजा नागनाथ नाईक यांच्या ताब्यात होता. 1628-30 दरम्यान मोहम्मद तुगलक यांनी हा किल्ला कोळी राजाकडून जिंकून आपल्या ताब्यात घेतला.
पुढे पुणे प्रांतासोबत हा किल्ला आदिलशाहीत म्हणजे शहाजीराजांकडे आला. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत 1647 मध्ये सिंहगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला. आदिलशाहीत शहाजीराजांना कटकारस्थान करून अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशाहीला सुपूर्त केला.
छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा लढवत 1658 साली सिंहगड पुन्हा जिंकून आपल्या ताब्यात घेतला. 1662 ते 1665 दरम्यान शाहिस्तेखानासह मुघलांनी हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ते सपशेल अयशस्वी झाले. 1665 मध्ये पुरंदरच्या तहात मात्र हा किल्ला मिर्झा राजे जयसिंग यांना द्यावा लागला. 'Sinhagad fort information in marathi'
आग्र्याहून शिवरायांची सुटका झाल्यानंतर शिवरायांनी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. कोंढाणा परत स्वराज्यात आणण्याची आई जिजाऊंची इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवरायांनी प्रयत्न चालू केले. कोंढाणा घेण्याची जबाबदारी शिवरायांनी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली; आणि 4 फेब्रुवारी 1670 रोजी किल्ल्यावर लढाई होऊन किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. या लढाईत मात्र तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले.
1689 नंतर मुघलांनी जिंकून घेतलेला हा सिंहगड परत 1693 दरम्यान स्वराज्यात आला.
इसवी सन 1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराज सिंहगडावर वास्तव्यास असताना 3 मार्च 1700 रोजी त्यांचा सिंहगडावर मृत्यू झाला.
पुढे 1703 मध्ये औरंगजेबाने ताब्यात घेतलेला हा किल्ला, 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. 'Sinhagad fort information in marathi'
सिंहगड किल्ला लढाई
1665 साली पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेल्या किल्ल्यांमध्ये सिंहगडाचा देखील समावेश होता. हा बेलाद असा किल्ला परत स्वराज्यात आणण्याच्या दृष्टीने शिवाजी महाराज लढाईची तयारी करत होते. तेव्हा त्यांनी या लढाईची जबाबदारी ही त्यांचे बालपणीचे मित्र तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली.
आधी लगीन कोंढाण्याचे
कोंढाणा किल्ल्याच्या मोहिमेवर जाण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी आपला मुलगा रायबाचे लग्नकार्य थांबवले आणि 4 फेब्रुवारी 1670 रोजी गडाच्या पायथ्याला जाऊन पोहोचले. सोबत सूर्याची मालुसरे व शेलार मामा हे देखील होते.
लढाईसाठी निवडलेल्या रात्रीच्या वेळी अवघड अशी तटबंदी असलेला कडा चढून काही मावळ किल्ल्याच्या आत शिरले, व त्यांनी गडाचा कल्याण दरवाजा उघडला. कल्याण दरवाजापाशी मावळे घेऊन बसलेले तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे हे मावळ्यांसह किल्ल्याच्या आत जाऊन किल्लेदार उदेभान राठोड यांच्याशी भयान युद्ध झाले.
उदेभानशी लढताना तानाजी मालुसरे यांची ढाल तुटून, तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. तेवढ्यात उदेभानावर शेलार मामांनी वार केला; आणि तो ही कोसळला.
तानाजी मालुसरे धारातीर्थी पडलेले पाहून मावळे माघारी फिरू लागले, तेव्हा सूर्याची मालुसरे यांनी गडावरून खाली जाण्यासाठीचा दोर कापून टाकला आणि मावळ्यांना किल्ला लढण्यास सांगितले. त्यावेळेस मराठा सैनिकांनी पूर्ण ताकदीने शत्रूंवर हल्ला केला आणि कोंढाणा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात घेतला. 'Sinhagad fort information in marathi'
गड आला पण सिंह गेला
कोंडाणा किल्ला आपल्या ताब्यात आला पण आपला साथीदार नरवीर तानाजी मालुसरे यांना या लढाईत वीरमरण आले आहे; असे शिवाजी महाराजांना समजतात, त्यांच्या तोंडून "गड आला पण सिंह गेला" असे लाखमोलाचे उद्गार बाहेर पडले. तेव्हा तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ शिवरायांनी कोंढाणा किल्ल्याचे नामकरण करून किल्ल्याचे नाव 'सिंहगड' असे ठेवले.
सिंहगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे
छत्रपती राजाराम महाराज समाधी
कोंढानेश्वर मंदिराच्या मागे जाऊन खालच्या बाजूला छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे.
3 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले होते. 'Sinhagad fort information in marathi'
![]() |
छत्रपती राजाराम महाराज समाधी, सिंहगड |
तानाजी मालुसरे स्मारक
कोंढाणेश्वराच्या मंदिराच्या थोडे समोर जाऊन आणि अमृतेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे समाधी स्मारक आहे.
4 फेब्रुवारी 1670 च्या उदेभान सोबत कोंढाण्याच्या लढाईत त्यांना सिंहगडावर वीरमरण आले होते.
![]() |
तानाजी मालुसरे स्मारक, सिंहगड |
अमृतेश्वर मंदिर
गडावर तानाजी स्मारकाच्या बाजूला महादेव कोळी यांचे दैवत असलेले अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
या अमृतेश्वर मंदिरात भैरव आणि भैरवी अशा दोन मूर्त्या आहेत.
कोंढानेश्वर मंदिर
किल्ल्याच्या संकुलात वसलेले, भगवान शिवाला समर्पित हे प्राचीन मंदिर कौंदिन्य ऋषींनी बांधले होते असे मानले जाते. हे भाविकांना आकर्षित करते आणि ऐतिहासिक भव्यतेमध्ये आध्यात्मिक वातावरण देते.'Sinhagad fort information in marathi'
![]() |
कोंढानेश्वर मंदिर, सिंहगड |
कल्याण दरवाजा
सिंहगड किल्ल्याच्या पश्चिमेस कोंढाणपूर गावातून गडावर येताना कल्याण दरवाजा लागतो. या दरवाजाच्या बुरुजांवर दगडी शिल्पे असून त्यावर शिलालेख देखील आहे.
![]() |
कल्याण दरवाजा, सिंहगड |
1870 साली सिंहगडाच्या लढाई वेळी तानाजी व सूर्याजी मालुसरे हे याच कल्याण दरवाज्यातून किल्ल्याच्या हात आले होते.
दारूचे कोठार
पूर्वी यात दारुगोळा ठेवला जाई. या दारूच्या कोठारात 1751 साली अपघात होऊन काही माणसं ठार झाली होती.
देवटाके
तानाजी स्मारकाच्या मागे प्रसिद्ध असे पिण्याच्या पाण्याचे देवटाके म्हणून ओळखले जाणारे टाके आहेत.
आजही या टाक्यांचे पाणी थंडगार, स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे. 'Sinhagad fort information in marathi'
गडावरील इतर ठिकाणे
• पुणे दरवाजा
• तानाजी कडा
• कलावंतीण बुरुज
• टिळक बंगला
• उदेभान स्मारक
• घोड्यांची पागा
• हत्ती टाके
सिंहगड किल्ला फोटो
![]() |
सिंहगड किल्ला फोटो |
![]() |
सिंहगड किल्ला फोटो |
सिंहगड किल्ला नैसर्गिक सौंदर्य आणि ट्रेक
सिंहगड किल्ल्याला नैसर्गिक वैभव लाभले आहे जे पर्यटकांना आकर्षित करते. किल्ल्याच्या उंच ठिकाणाहून, विशेषत: सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणारी विहंगम दृश्ये विस्मयकारक असतात. आजूबाजूच्या टेकड्या, घनदाट जंगले आणि वाहणारी आंबी नदी एक नयनरम्य पार्श्वभूमी तयार करते जी प्रत्येक पर्यटकावर आपली छाप सोडते.
सिंहगड किल्ला खडकवासला धरण आणि पानशेत धरणासह अनेक जलसाठ्यांनी वेढलेला आहे. हे जलाशय किल्ल्याचे निसर्गरम्य सौंदर्य वाढवतात. 'Sinhagad fort information in marathi'
सिंहगड किल्ल्याच्या आजूबाजूच्या हिरवीगार हिरवळ, निसर्गरम्य दऱ्या आणि मोसमी धबधबे आहेत, जे पर्यटकांना शहरी जीवनाच्या गजबजाटातून एक नयनरम्य वातावरणाचा अनुभव देते. निसर्गप्रेमी आणि धाडसी पर्यटक गडावर जाण्यासाठी थरारक ट्रेक करू शकतात. सिंहगडाची ट्रेकिंग सह्याद्री पर्वतरांगा, हिरवळ आणि किल्ल्याच्या नैसर्गिक अधिवासातील वन्यजीवांचे साक्षीदार होण्याची संधी देते.
सिंहगड परिसरातील स्वादिष्ट पदार्थ
सिंहगड किल्ल्याला भेट दिल्यावर या भागातील चविष्ट पदार्थांचा आनंद घेता येतो. जवळचे पानशेत गाव अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी ओळखले जाते. तोंडाला पाणी आणणारी कांदा भाजी (कांद्याची भजी), भाकरी (ज्वारीची भाकरी) आणि बेसन आणि भाकरीसोबत दिलेली प्रसिद्ध झुंका-भाकर हे पदार्थ चुकवू नका.
सिंहगड किल्ल्याला कसे जावे
सिंहगड किल्ला पुण्याच्या नैऋत्येस अंदाजे ३० किलोमीटर अंतरावर आहे. पुणे शहरापासून खडकवासला धरणाच्या शेजारून, डोनजे मार्गे सिंहगड किल्ल्याला जाण्यासाठी उत्तम रस्ता जोडलेला आहे. अनेक बसेस आणि खाजगी वाहने किल्ल्याच्या पायथ्याशी जातात. 'Sinhagad fort information in marathi' पर्यटक त्यांची वाहने पायथ्याशी लावू शकतात आणि नंतर गडावर जाऊ शकतात.
सिंहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ
किल्ल्याला वर्षभर भेट दिली जाऊ शकते. परंतु सर्वोत्तम वेळ म्हणजे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर हा असतो. कारण तेव्हा परिसर हिरवागार असतो आणि हवामान आल्हाददायक असते. तथापि, सिंहगड किल्ल्याला भेट देण्याचे नियोजन करण्यापूर्वी एकदा हवामानाची स्थिती तपासून घ्या. कारण मुसळधार पावसामुळे किंवा कडक उन्हामुळे ट्रेक आव्हानात्मक होऊ शकतो.
निष्कर्ष
सिंहगड किल्ला हा एक ऐतिहासिक खजिना आहे, जो इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना नेहमी आकर्षित करतो. किल्ल्याचा समृद्ध भूतकाळ, स्थापत्यकलेचे तेज आणि चित्तथरारक परिसर यामुळे किल्ल्याची सफर अविस्मरणीय ठरते. सिंहगड किल्ला महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा एक विलक्षण अनुभव देतो. या भव्य किल्ल्याला भेट देण्याची योजना करा आणि शौर्य, स्थापत्य वैभव असलेला, नैसर्गिक सौंदर्याने नटलेला किल्ला मनाभावातून अनुभवा. 'Sinhagad fort information in marathi'
FAQ
0 Comments