अष्टविनायक गणपती दर्शन संपूर्ण माहिती | Ashtavinayak Ganpati information in Marathi

अष्टविनायक गणपती दर्शन संपूर्ण माहिती | Ashtavinayak Ganpati information in Marathi

'Ashtavinayak Ganpati information in Marathi'
'Ashtavinayak Ganpati information in Marathi'


अष्टविनायक म्हणजे गणपतीची आठ मानाची मंदिरे होय. अष्टविनायक मंदिरे ही महाराष्ट्रातील गणपतीचे प्रतिष्ठेचे मंदिरे आहेत. तसेच हे, श्री गणेश भक्तांचे आवडते तीर्थस्थान म्हटले तरी वावगं ठरणार नाही. मोठ्या श्रद्धेने भाविक भक्त या अष्टविनायकांच्या दर्शनासाठी जात असतात. 
हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्याच्या अगोदर गणपतीचे म्हणजे श्री गणेशाचे पूजन केले जाते. एकूणच हिंदू धर्मामध्ये गणपतीला सर्व देवतांपेक्षा अग्रतेचे स्थान दिले गेले आहे. गणपती हा आपला देव आपल्याला संकटाशी लढण्यासाठी बळ देऊन, सर्व समस्या पासून आपले रक्षण करतो. अशी धारणा मनात बाळगून गणेश भक्त गणपतीचे मनोभावे पूजन करत असतात.  'Ashtavinayak Ganpati information in Marathi'
अष्टविनायकाची आठही ठिकाणे हे स्वयंभू स्थानं असल्याने भाविकांना ते अधिकच आकर्षित करत असतात.
14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणजेच गौरीपुत्र गणपती ही देवता सर्वांना पूजनीय असून, दरवर्षी महाराष्ट्रभर 11 दिवसांचा गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 
अष्टविनायकाची मानाची आठ ठिकाणे ही पश्चिम महाराष्ट्र व कोकण मध्ये स्थित आहेत. त्यातील पाच स्थानं ही पुणे जिल्ह्यात, दोन रायगड जिल्ह्यात तर एक अहमदनगर जिल्ह्यात आहे. मृद्गल पुराणात वर्णन आढळणाऱ्या या अष्टविनायकांना पेशवे काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले.
सुखकर्ता, दुखहर्ता व रक्षणकर्ता असणाऱ्या गणपतीच्या दगडांवर कोरीव प्राचीन मुर्त्या ह्या स्वयंभू आहेत, अशी गणेश भक्तांची भावना आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातून अनेक भाविक भक्त मनोभावे अष्टविनायकांची यात्रा करत असतात. प्रत्येक अष्टविनायकाचे दर्शन घेत असताना भक्त सुख-समृद्धी ची मागणी गणपतीच्या म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी करत असतात; आणि बाप्पा देखील नारळ-दुर्वा स्वीकारून आपल्या भक्तांवर सदा वरदहस्त ठेवत असतो.

अष्टविनायक गणपती क्रम


• पहिला - मयुरेश्वर, मोरगाव

• दुसरा - चिंतामणी, थेऊर 

• तिसरा - सिद्धेश्वर, सिद्धटेक 

• चौथा - श्री महागणपती, रांजणगाव

• पाचवा - विघ्नेश्वर, ओझर 

• सहावा - गिरिजात्मक, लेण्याद्री
 
• सातवा - वरदविनायक, महड

• आठवा -बल्लाळेश्वर, पाली


अष्टविनायक गणपती मंदिर मराठी माहिती


• मयुरेश्वर

मोरगावचा मयुरेश्वर हे अष्टविनायकांपैकी गणपतीचे पहिले स्थान होय.
मयुरेश्वराचं स्थान असलेलं मोरगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव या ठिकाणी आहे.
बारामती पासून 35 किलोमीटर अंतरावर मोरेश्वराचे मंदिर आहे. या मंदिरापासून जवळच पंधरा ते सतरा किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर आहे.
असे सांगितले जाते की मोरया गोसावी नावाचे गणेश भक्त यांची गणपती वर प्रचंड भक्ती होती. ते मोरगावच्या अष्टविनायक मंदिरामध्ये गणपतीची मनोभावे पूजा करत असत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री गणपतीने मोरया गोसावी यांना आशीर्वाद दिला की, हे मोरया इथून पुढच्या काळात माझ्या नावाच्या नंतर लोक तुझ्या नावाचा जयघोष करतील; आणि तेव्हापासूनच "मंगलमूर्ती मोरया" हा जयघोष प्रचलित झाल्याचे सांगितले जाते.  
सुखकर्ता, दुखहर्ता ही गणपतीची आरती रामदास स्वामी यांनी मोरगाव येथील गणपतीच्या मंदिरातच लिहिल्याचे सांगितले जाते. 'Ashtavinayak Ganpati information in Marathi'
मोरगाव येथील अष्टविनायकाचे पहिले स्थान असलेल्या गणपतीच्या मंदिराच्या जवळच कऱ्हा नावाची नदी आहे. या नयन रम्य वातावरणात असलेल्या मंदिरात सुंदर नक्षीकाम काम पाहायला मिळते.
प्राचीन काळापासून बुरुज सदृश दगडी बांधकाम असलेल्या मंदिरातील मोरेश्वराच्या डोळ्यात आणि बेंबी मध्ये हिरे पाहायला मिळतात. त्यामुळे मंदिराचा गाभारा प्रकाशित होऊन उजळून निघतो.
मोरेश्वराचे मंदिर हे सुभेदार गोळे यांनी बांधले असल्याचे येथील जुने लोक सांगत असतात.
पुणे, बारामती, जेजुरी येथून मोरगावला जाण्यासाठी शासकीय या खाजगी वाहनांची सुविधा आहे.

• चिंतामणी

थेऊर येथील चिंतामणी हा गणपती अष्टविनायकांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा गणपती आहे. 
चिंतामणी, थेऊर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात, पुणे शहरापासून अगदी 30 किलोमीटर अंतरावर आहे.
चिंचवड गावचे सत्यपुरुष श्री चिंतामणी महाराज यांनी त्यावेळी तब्बल 40000 रुपये खर्च करून थेऊर येथील चिंतामणी गणपतीचे मंदिर बांधले आहे. त्यात चिंचवडचे च असलेले श्री नारायण महाराजांनी आणखी भर घालून मंदिराच्या वैभवात वाढ केली. 'Ashtavinayak Ganpati information in Marathi'
तसेच त्याच्यानंतर माधवराव पेशवे यांनी सागवानी लाकडाचा सभामंडप हा चिंतामणी यांच्या चरणी अर्पण केला आणि मंदिराच्या परिसराचा विस्तार केला.
पेशवे घरातील लोक सतत थेऊर येथील चिंतामणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असत. थोरले माधवराव पेशवे यांचे निधन थेऊर येथेच झाले.
चिंतामणी गणपतीच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे उत्तर दिशेला असून, मंदिरातील गणपतीची म्हणजे चिंतामणीची भव्य मूर्ती ही पूर्वेकडे तोंड करून असलेली, मांडी घातलेल्या अवस्थेत व डाव्या सोंडेची आहे. 
मंदिराच्या बाहेरील देवळ्यामध्ये देखील छोट्या छोट्या तीन मूर्त्या आहेत.
चिंतामणी मंदिराच्या बाहेर आकर्षक दिसणारी भव्य घंटा ही पेशवे चिमाजीआप्पा यांनी लावली आहे.
श्रीचिंतामणी यांचा चिंतामणी हा कपिल ऋषी यांनी परत केला, आता त्या ठिकाणी प्राचीन कदम वृक्ष पाहायला मिळतो.

• सिद्धेश्वर

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक गणपती हा अष्टविनायक गणपती मधील क्रमांक 3 चा गणपती आहे. 
भीमा नदीच्या काठी वसलेला उजव्या सोंडेचा हा  अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती आहे. नदीकाठी वसलेला सिद्धेश्वर हा अष्टविनायकांपैकी स्वयंभू असलेला अष्टविनायक होय.
सिद्धटेक येथे असलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात, दौंड शहरापासून अगदी 19/ एकोणावीस किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
दौंड मार्गे सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाला जायचे असेल तर, भीमा नदी ओलांडून म्हणजे होडीतून सिद्धेश्वराला जावे लागते.
अष्टविनायकांपैकी सिद्धटेक येथे बसलेली सिद्धिविनायकाचे मंदिर हे महान अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले आहे सिद्धेश्वर गणपतीच्या मंदिरामध्ये प्रवेश करतानाच डाव्या बाजूला शंकर, गणपती, विष्णू, आदिमाया, सूर्य आहेत.
दिसायला अगदी सुंदर दिसणारे श्री सिद्धिविनायकाचे मंदिर हे उत्तराभिमुख असून मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे.
सिद्धिविनायक मंदिरातील गाभाऱ्यात सिद्धिविनायक यांची मूर्ती असलेले सिंहासन दगडाचे असून, श्री सिद्धिविनायका भोवती चांदीचे मखर पहायला मिळते. 
मंदिराच्या गाभाऱ्यात बाजूलाच श्रींचे शेजघर देखील आहे. सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या बाजूला दोन मोठ्या मूर्त्या आहेत, त्या मूर्त्या ह्या जय आणि विजयाच्या आहेत.
सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा हा 10 फूट रुंद आणि 15 फूट उंच आहे. तर मंदिराच्या पुढे मोठा सभामंडप असून प्रवेशद्वारावर नगारखाना आहे.

• महागणपती

महागणपती हे अष्टविनायकांपैकी चौथ्या क्रमांकाचे अष्टविनायक आहे.
महागणपती हे अष्टविनायकांपैकी असलेले गणपतीचे मंदिर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात, रांजणगाव येथे पुणे-अहमदनगर महामार्गावर, पुणे शहरापासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे.
अष्टविनायकांपैकी सर्वात शक्तिशाली असलेला महागणपती या मंदिराची स्थान साधारण 10 व्या शतकातील समजले जाते.
पुणे अहमदनगर रोडवर रांजणगाव येथे स्थित असलेले अष्टविनायकांपैकी एक असलेले महागणपती हे सर्वात शक्तिमान अष्टविनायक समजले जाते.
महागणपती उजव्या सोंडेचा असून महागणपतीला बसण्यासाठीचे आसन हे कमळाच्या फुलाचे आहे.
महागणपती मंदिरातील गणेश मूर्तीला दहा हात असून, सुंदर आणि रेखीव अशी ही गणेशाची मूर्ती माणसाचे मन मोहून टाकते. 'Ashtavinayak Ganpati information in Marathi'
महागणपती मंदिराचा जिर्णोद्धार हा पेशवे काळात म्हणजेच माधवराव पेशवे यांनी महागणपती मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे दाखले इतिहासात दिले जातात. तसेच किबे या इंदोरच्या सरदाराने देखील मंदिर व मंदिर परिसराचे नूतनीकरण करून वैभवात भर घातल्याचे सांगितले जाते. त्यांनी मंदिराला लाकडी सभा मंडप बसवला होता.
पुराण कथांमध्ये असं सांगितलं जातं की त्रिपुरासुर हा दैत्य महादेवाचा निश्चिम भक्त होता. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्याला काही शक्ती प्रदान केल्या होत्या, पण त्या शक्तीचा हा दैत्य दुरुपयोग करून पृथ्वीवरील, स्वर्गावरील लोकांना त्रास देऊ लागला. तेव्हा स्वतः भगवान शंकराने, श्री गणेशाचे दर्शन घेऊन, या राक्षसासोबत युद्ध करून त्याचा बंदोबस्त म्हणजे वध केला होता. त्यामुळेच या रांजणगाव येथील अष्टविनायकाला 'त्रिपुरारिवदे म्हणजेच महागणपती' म्हटले जाते.

• विघ्नेश्वर

विघ्नेश्वर हे अष्टविनायकांपैकी पाचवे अष्टविनायक गणपती मंदिर ओझर येथे स्थित आहे.
विघ्नेश्वर अष्टविनायक मंदिर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर येथे आहे. विघ्नेश्वराचे मंदिर हे लेण्याद्रीपासून 14 किलोमीटर तर पुणे शहरापासून 85 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असलेले ओझर येथील विघ्नेश्वराची मंदिर म्हणजे अष्टविनायकांपैकी विघ्नेश्वर अष्टविनायक हे सर्वात श्रीमंत अष्टविनायक समजले जाते.
मंदिरातील अष्टविनायक म्हणजे गणपतीची मूर्ती ही लांब व रुंद स्वरूपाची आहे.
डोळ्यात माणिक व कपाळावर हिरा असलेली सुंदर व मंगल अशी गणपतीची मूर्ती ओझर येथील अष्टविनायकाच्या मंदिरामध्ये शोभून दिसते.
ओझर येथील अष्टविनायकांपैकी असलेला गणपती हा आपल्या भक्तांवर आलेल्या संकटांचे, विघ्नांचे हरण करत असतो, त्यामुळेच या अष्टविनायक गणपतीला विघ्नेश्वर गणपती असे म्हटले जाते.
ही विघ्नेश्वराची मूर्ती स्वयंभू आहे.
जुन्नर तालुक्यात ओझर येथे कुकडी नदीच्या तीरावर वसलेले विघ्नेश्वर अष्टविनायक मंदिराच्या चारही बाजूने भक्कम तटबंदीचे बांधकाम केलेले असून, तटबंदीच्या आत मध्यभागी विघ्नेश्वराचे म्हणजेच गणपतीचे मंदिर आहे.
कुकडी नदीच्या काठी असलेल्या विघ्नेश्वराच्या जागृत मंदिराचा जीर्णोद्धार हा पेशवा बाजीराव यांचे बंधू चिमाजी आप्पा पेशवे यांनी केला आहे.
विघ्नेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी राहण्याची सोय म्हणून धर्मशाळेची व्यवस्था मंदिर परिसरात केलेली आहे. तसेच ओझर येथून जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील आहे. विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन भाविक शिवनेरी गडावर जात असतात.

• गिरिजात्मक

लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मक अष्टविनायक हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी सहावे अष्टविनायक गणेश मंदिर आहे.
गिरिजात्मक अष्टविनायक मंदिर हे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात लेण्याद्री येथे वसलेले आहे. गिरीजात्मकाचे मंदिर हे जुन्नर शहरापासून 7 किलोमीटर तर पुणे शहरापासून 97 किलोमीटर अंतरावर आहे.
गिरिजात्मक गणेशाचे मंदिर हे शिवनेरी गडाच्या सानिध्यात, कुकडी नदीच्या परिसरात, ओझरच्या विघ्नेश्वरा पासून काही अंतरावर, डोंगरावर स्थित स्वयंभू गणपती मंदिर आहे.
अष्टविनायक गणपती मंदिरात श्री गणेशाची दगडांमध्ये कोरलेली सुंदर, मन मोहून टाकणारी मूर्ती आहे. या गिरीजात्मक मंदिराच्या आवारात दगडांमध्ये खोदकाम तसेच दगडांवर कोरीव काम केल्याने दिसून येते. मंदिरात असलेल्या दगडी खांबांवर असलेले सुंदर कोरीव काम मन सुखावणारे आहे. त्यात प्रामुख्याने हत्ती, सिंह आणि वाघाचे नक्षीकाम आढळून येते. तर हे मंदिर ज्या परिसरात आहे, त्याच परिसरात जुन्नरच्या प्राचीन लेण्या देखील आहेत.
डोंगरावर असलेल्या या गिरीजात्मक मंदिराचा जिर्णोद्धार हा पेशवे काळात झालेला असून, मंदिरात जाण्यासाठी 400 पायऱ्या चढून वर जावे लागते. 'Ashtavinayak Ganpati information in Marathi'

• वरदविनायक

अष्टविनायकांपैकी सातवे अष्टविनायक म्हणजे महड येथील वरदविनायक गणपती मंदिर होय.
वरदविनायक हे महड येथील अष्टविनायक मंदिर, रायगड जिल्ह्यात खोपोली जवळ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग लगत आहे.
वरदविनायक हे सातवे अष्टविनायक मंदिर हे गणपतीचे स्वयंभू स्थान असून, त्याचा मठ असा देखील उल्लेख केला जातो.
महड येथील अष्टविनायक गणपतीचे मंदिर हे कौलारू स्वरूपाचे असून, मंदिराच्या गोल घुमटावर सोनेरी कळस आहे; आणि या मंदिराच्या सोनेरी कळसावर नागोबाचे म्हणजे सापाचे नक्षीकाम केलेले आहे.
वरदविनायक गणपतीच्या मंदिरातील सिंहासनारूढ मूर्तीसंबंधी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की, गणपतीच्या एका निस्सीम भक्ताला मंदिराच्या मागील तळ्यामध्ये पडलेली मूर्ती दिसली, त्या भक्तांनी त्या गणपतीच्या मूर्तीचा शोध घेतल्यानंतर त्याला ती मूर्ती मिळाली; आणि त्याने ती मूर्ती या वरदविनायक मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठित केली, ती आता मंदिरात असलेली हीच मूर्ती असल्याचे म्हटले जाते.
महड येथील वरदविनायक अष्टविनायक मंदिरातील गणपतीची मूर्ती ही सिंहासनावर असून, ती मूर्ती उजव्या सोंडेची मूर्ती आहे. वरदविनायक मंदिराचे बांधकाम हे पेशवे काळातील आहे.

• बल्लाळेश्वर

पाली येते स्थित असलेले बल्लाळेश्वर अष्टविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी आठवे अष्टविनायक गणपती मंदिर आहे.
बल्लाळेश्वर हे पाली येथील अष्टविनायक मंदिर रायगड जिल्ह्यात, सुधागड तालुक्यात असून ते खोपोलीपासून 38 किलोमीटर तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली-पेन महामार्गावरून पालीस जाता येते.
सुधागड किल्ल्याच्या परिसरात, आंबी नदीच्या प्रसन्न वातावरणात वसलेले बल्लाळेश्वर हे स्वयंभू अष्टविनायक गणपती मंदिर पूर्वेकडे दरवाजा असलेले मंदिर आहे. बल्लाळेश्वर अष्टविनायक मंदिरातील गणपतीच्या मूर्तीचे कपाळ हे मोठे असून, मूर्तीच्या डोळ्यांमध्ये हिरे लावलेले आहेत.
पाली येथील या अष्टविनायक गणपतीच्या चिरेबंदी मंदिरात चिमाजी अप्पा यांनी अर्पण केलेली भली मोठी घंटा लावलेली आहे. 'Ashtavinayak Ganpati information in Marathi'

निष्कर्ष

गणपती म्हणजे सर्वांचा लाडका गणपती बाप्पा यांचे स्वयंभू स्थान असलेले महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरे हे, सर्व जाती धर्मातील गणेश भक्तांसाठी तीर्थक्षेत्र असलेली पूजनीय ठिकाणे आहेत. 
दर महिन्यातील गणेश चतुर्थीला व अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी व आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येथे येत असतात. महाराष्ट्रातील या आठ अष्टविनायकांची यात्रा करण्यासाठी भाविकांना महाराष्ट्रातील, रायगड, पुणे आणि अहमदनगर अशा तीन जिल्ह्यातून प्रवास करावा लागतो. 'Ashtavinayak Ganpati information in Marathi'
दगडांमध्ये, डोंगरावर तर कधी नदीकाठी वसलेल्या या अष्टविनायकांच्या कोरीव मूर्त्यांवर डोकं टेकवल्यानंतर गणेश भक्त हे समाधानी होऊन दर्शन झाल्याचा आनंद घेत असतात.

FAQ

गिरीजात्मक हे अष्टविनायक मंदिर कोठे आहे?

- लेण्याद्री


अष्टविनायक मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहेत?

- पुणे, रायगड, अहमदनगर


पुणे जिल्ह्यात अष्टविनायकाचे किती स्थान आहेत?

- 5 पाच







Post a Comment

0 Comments