पुरंदर किल्ला संपूर्ण माहिती | Purandar fort information in marathi
![]() |
'Purandar fort information in marathi' |
पुरंदर किल्ला हा पुणे शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर भुलेश्वराच्या डोंगर रांगेत वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. संत सोपानदेव यांची समाधी असलेल्या सासवड गावाजवळ सह्याद्रीच्या डोंगरात स्थित या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी सईबाई यांच्या पोटी झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हे या पुरंदर किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे 20 मैलांवर असलेला हा किल्ला विस्ताराने खूप मोठा असून, किल्ला मजबूत व बेलात आहे. 'Purandar fort information in marathi'
सह्याद्रीच्या नयनरम्य वातावरणात उभा असलेल्या पुरंदर किल्ल्याने अनेक वर्ष वैभव, लढाया पाहिल्या आहेत.
पुरंदर किल्ला हा यादव, बहमनी, मराठे, आदिलशाही यांच्या ताब्यात होता. पण मराठा साम्राज्याशी पुरंदर किल्ल्याचा जवळचा संबंध आहे. कारण या पुरंदर किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख लष्करी चौकी म्हणून अनेक वर्ष काम केले आहे.
पुरंदर किल्ल्यावरील अनेक वास्तू ह्या प्राचीन वास्तू कलेचे उत्तम उदाहरण देणारा पुराचाच आहे. किल्ल्यावरील माची, बालेकिल्ला, भिंती, बुरुज, प्रवेशद्वार हे पुरंदर किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षन आहे.
पुरंदर किल्ल्यावरून दिसणारे निसर्गाचे विहंगम दृश्य मनाला उच्च कोटीचा आनंद देऊन जाते.
बापदेव घाट, कात्रज घाट व दिवे घाट ओलांडून निसर्गाच्या आणि इतिहासाचा समृद्ध ठेवा असलेल्या पुरंदर किल्ल्यावर पोहोचता येते. गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा पुरंदर किल्ला हा जवळपास 1400 फूट उंच असून, तो डोंगर, दऱ्यांच्या विळख्यात दिमाखात अगदी भक्कमपणे उभा आहे.
1200 बाराशे वर्षे जुना असलेल्या पुरंदर किल्ल्या वरून सिंहगड किल्ला, राजगड किल्ला आणि विचित्रगड किल्ला अगदी सहजपणे दृष्टीत पडतात.
सध्या पुरंदर किल्ल्यावर माचीच्या उत्तर दिशेला भारतीय सैनिकांची छावणी आहे. 'Purandar fort information in marathi'
पुरंदर किल्ला इतिहास
पुरंदर म्हणजे इंद्र. पुराण काळात त्रैलोक्याचा राजा इंद्र हा बलाढ्य होता, तसाच पुरंदर किल्ला हा बलाढ्य स्थान असलेला किल्ला होय. रामायण काळात लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी जेंव्हा हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता, त्याच द्रोणागिरी पर्वताचा काही भाग खाली पडला, तो हाच पूर्वी इंद्रनील पर्वत म्हणून ओळखला जाणारा पुरंदर किल्ला होय; असे सांगितले जाते.
खरंतर पुरंदर किल्ल्याचा सर्वात जुना संदर्भ हा इतिहासामध्ये 11 व्या शतकातला यादवकालीन संदर्भ सापडतो. यादवांच्या नंतर पर्शियन राज्यकर्त्यांनी यादवांवर आक्रमण करून पुरंदर किल्ल्यासह आसपासचा परिसर जिंकून घेतला. याच पर्शियन वंशाने 1350 मध्ये पुरंदर किल्ल्यावर काही बांधकाम केले.
पुढे बहमनी काळात बिदरचे चंद्रहास देशपांडे यांनी पुरंदर किल्ला ताब्यात घेऊन बहमनी शासनाच्या अधिपत्याखाली आणला; आणि त्यांच्याच देखरेखी खाली पुरंदर किल्ला मजबूत करण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर बांधकाम चालू करणे केले आणि पुनर्बांधणीसाठी प्रयत्न केले गेले. याच घराण्यातील महादजी निळकंठ यांनी हे काम कसोशीने पूर्ण केले.
पुरंदर किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर किल्ल्यावरील शेंदऱ्या बुरुज सतत पडत असायचा या कारणास्तव बुरुज परत ढासळू नये म्हणून बहिरणाक या सेना नायकानी आपला पुत्र आणि आपली सून, असे महिला आणि पुरुष या बुरुजाखाली बळी म्हणून गाडण्यासाठी दिले. जेणेकरून हा बुरुज पुन्हा पडू नये. 'Purandar fort information in marathi'
इ.स 1489 सालाच्या आसपास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद याने पुरंदर किल्ला निजामशाही राजवटीच्या अधिपत्याखाली आणला. पुढे 1550 साली हा किल्ला परत आदिलशहाच्या अधिपत्याखाली आला.
तू अशी 1646 ते 1649 च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकून घेतले होते. याचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने आपला सरदार फत्तेखान याला शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. याच दरम्यान शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे कैदेत होते. स्वराज्यावर दुहेरी संकट आल्याने कल बिकट होता, त्यामुळे फत्तेखानाशी लढण्यासाठी शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला निवडला. महादजी नीलकंठ याच्या ताब्यात असणारा पुरंदर त्यांच्या अंतर्गत कलहाचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी शिताफीने आपल्या ताब्यात घेतला.
पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात आल्या नंतर त्याच्या साहाय्यानं शिवाजी राजांनी फत्तेखानाशी झुंज देऊन मोठा विजय मिळवला. हा आदिलशहाला जबरदस्त तडाखा होता.
1655 साली पुरंदर किल्ला शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांच्या ताब्यात दिला.'Purandar fort information in marathi'
पुढे मराठ्यांच्या ताब्यात असणाऱ्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांच्या पोटी 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. ही घटना पुरंदर किल्ल्याला इतिहासात अजरामर करून गेली.
पुढे 1665 साली मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी दिलेरखानाला सोबतीला घेऊन पुरंदर किल्ल्यावर हल्ला केला. या लढाईत दिलेरखानाशी लढत असताना मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण येऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. तेव्हा नाईलाजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी म्हणजे औरंगजेबाशी इतिहासातील प्रसिद्ध पुरंदरचा तह केला. या तहात शिवरायांनी पुरंदरसह स्वराज्यातील 23 किल्ले औरंगजेबाला दिले होते.
काही काळ लोटल्यानंतर 1670 च्या आसपास पुरंदर किल्ला शिवाजी महाराजांनी परत स्वराज्यात सामील करून घेतला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुरंदर किल्ला औरंगजेबाने जिंकून घेतला व किल्ल्याला आजमगड असे नाव दिले. पुढे 1695 मध्ये हा पुरंदर किल्ला शाहू महाराजांनी पेशव्यांना दिला. बरेच दिवस पुरंदर किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती.
1776 मध्ये मराठा-इंग्रज यांच्यातील युद्धामुळे पुरंदरचा दुसरा तह झाला. पण पुढे सालबाईच्या तहामुळे अपूर्ण अटीतून हा किल्ला कुरोजी नाईक या कोळी सरदाराने जजनकुन घेतला.
ब्रिटिश जनरल प्रीटझलर याने 1818 मध्ये पुरंदरवर हल्ला करून 16 मार्च 1818 रोजी किल्ला ताब्यात घेतला.
पुरंदरचा तह
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्यामुळे भयंकरपणे चिडलेला आणि गोंधळून गेलेल्या औरंगजेबाने 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी, राजपूत राजा मिर्झा जयसिंग आणि औरंजेबाचा विश्वासु सेनापती दिलेरखान यांना दक्षिणेत पाठवले.
औरंगजेबाचे दोन्ही विश्वास सरदार हे अफाट सैनिकांचा लवाजमा घेऊन स्वराज्यावर चालून आले. स्वराज्यात आल्यानंतर स्वराज्यातील बेलाद पुरंदर किल्ला घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले. जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज आणि एकूणच स्वराज्याचा बिमोड करता येईल. यातूनच 31 मार्च 1665 रोजी जयसिंगाणे पुरंदर किल्ल्याला वेढा दिला.
प्रचंड सैनिक घेऊन दिलेरखान हा पुरंदरवर चालून गेला . त्यावेळेस पुरंदरचे किल्लेदार हे वीर मुरारबाजी हे होते. मुरारबाजी हे शिवरायांचे विश्वासु असलेले जिद्दी आणि पराक्रमी किल्लेदार होते. 'Purandar fort information in marathi'
दिलेरखान हा मुघल सैनिक घेऊन पुरंदरवर सतत हल्ले करत असतानाच एक महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर दिलेरखानाला पुरंदर किल्ल्याजवळील वज्रगड पाडण्यास यश आलं.
त्यानंतर एके दिवशी मुरारबाजी देशपांडे हे गडावरील 700 मावळे घेऊन गडाच्या खाली दिलेरखानावर चालुण गेले. तेव्हा मुरारबाजी आणि दिलेरखानामध्ये घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी यांचे शौर्य पाहून दिलेरखानाने मुरारबाजीला आपल्याकडे येण्याची विनंती केली. पण मुरारबाजी यांनी मी शिवरायांचा मावळा आहे. मी तुझा कधीच होणार नाही; असे सांगितले. तेव्हा दिलेरखानाने तीर मारून मुरारबाजी यांना खाली पाडले, त्यात मुरारबाजी यांना वीरमरण आले.
मुरारबाजी यांच्या विरमरणाची बातमी शिवाजी महाराजांना समजताच त्यांनी रघुनाथराव पंत यांना मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडे बोलणीसाठी पाठवून शरणागती पत्करली.
मुघलांसोबत आता तह करायचा ठरवून शिवाजीराजे हे मिर्झाराजे जयसिंग यांच्या तंबूकडे गेले आणि तहाची बोलली करत पुरंदर वरील हल्ले थांबवले. तहाची बोलणी करून तहाचे कलमे ठरवली गेली आणि मंजूर करण्यात आली. 11 जून 1665 रोजी झालेला हाच तह पुरंदरचा तह म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला.
या पुरंदरच्या तहाच्या कलमानुसार शिवरायांनी स्वराज्यातील 23 किल्ले व किल्ल्यांच्या खालचा चार लक्ष होणाचा प्रदेश मुघलांना देण्याचे कबूल केले; व मुघलांना गरज असेल तेव्हा मदत करण्याचे ठरले.
तह नंतर मिर्झाराजे जयसिंग म्हणजेच मुघलांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांना पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात आली होती.
पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना दिलेले 23 किल्ले
• पुरंदर
• रोहिडा
• रुद्रमाळ
• कोंढाणा
• विसापूर
• लोहगड
• प्रबळगड
• तिकोणा
• माहूली
• तुंग
• कर्नाळा
• सोनगड
• मनरंजन
• पळसगड
• नरदुर्ग
• मार्गगड
• वसंतगड
• मानगड
• भंडारगड
• नंगगड
• सागरगड
• अंकोल
• कोहोज
पुरंदर किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे
• बिनी दरवाजा
बिनी दरवाजा हा पुरंदर माचीवर आहे. पुरंदर माची वरील हा एकमेव दरवाजा आहे.
नारायणपूर गावातून जाताना हा बिनी दरवाजा लागतो.
• पुरंदरेश्वर मंदिर
पुरंदर किल्ल्यावरील पुरंदरेश्वर मंदिर हे महादेवाला समर्पित मंदिर आहे.
हेमाडपंथी असणाऱ्या या मंदिरामध्ये इंद्राची मूर्ती दिसून येते.
पुरंदरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार हा थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केला.
• रामेश्वर मंदिर
पुरंदरेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला रामेश्वर मंदिर आहे.
रामेश्वर मंदिर हे पेशवे वंशाचे मंदिर असून, ते पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. 'Purandar fort information in marathi'
• दिल्ली दरवाजा
पुरंदर किल्ल्यावरील दिल्ली दरवाजा हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाजाच्या बाजूला लक्ष्मीचे मंदिर आहे.
• खन्दकडा
दिल्ली दरवाजातून आत गेल्यानंतर डावीकडे सरळ पूर्वेकडे गेलेला जो कडा दिसतो तो खन्दकडा होय.
खन्दकड्याच्या शेवटी एक बुरुज आहे
• केदारेश्वर मंदिर
केदार दरवाजातून पंधरा मिनिटे चालत गेल्यानंतर आपल्याला केदारेश्वर मंदिर दिसते.
केदारेश्वर मंदिर गडावरील सर्वात उंच ठिकाणी आहे.
केदारेश्वर मंदिर हे पुरंदर किल्ल्यावरील मूळ दैवत आहे.
• शेंदऱ्या बुरुज
पद्मावती तलावाच्या मागे तटबंदी सोबत जो बुरुज दिसतो, तो शेंदऱ्या बुरुज होय.
असं सांगितलं जातं की हा बुरुज पूर्वी नेहमी नेहमी ढासळाचा, त्यामुळे या बुरुजाखाली पती-पत्नीचा बळी दिल्यानंतर हा बुरुज कधीच आसळला नाही.
• मुरारबाजी देशपांडे पुतळा
बिनी दरवाज्यातून आत गेल्यानंतर आपल्याला वीर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा दिसतो.
1665 मध्ये दिलेरखाना सोबत लढत असताना मुरारबाजी यांना पुरंदर किल्ल्यावर वीरमरण आले.
पुरंदर किल्ल्यावरील हा मुरारबाजी यांचा पुतळा 1970 मध्ये उभारण्यात आला आहे. 'Purandar fort information in marathi'
पुरंदर किल्ल्यावरील इतर ठिकाणी
• पुरंदर माची
• छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ
• छत्रपती संभाजी महाराज पुतळा
• पद्मावती तलाव
पुरंदर किल्ल्याला कसे जावे
पुणे शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरंदर किल्ल्याला, पुणे शहरातून बापदेव घाट, कात्रज घाट आणि दिवे घाटातून जाता येते.
सासवड मध्ये उतरून सासवड - नारायणगाव गाडीने पुरंदरच्या पायथ्याला उतरून गडावर जाता येते.
नारायणगाव हे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे प्रमुख गाव आहे.
खाजगी वाहन असेल तर पुरंदर किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहन घेऊन जात येते.
![]() |
'Purandar fort information in marathi' |
पुरंदर किल्ल्याला भेट देण्याची वेळ
पुरंदर किल्ला हा सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान पर्यटकांसाठी खुला असतो. या वेळेत जाऊन पर्यटक पुरंदर किल्ला पाहू शकतात. 'Purandar fort information in marathi'
0 Comments