तिकोणा किल्ला मराठी माहिती |Tikona fort information in marathi

तिकोणा किल्ला मराठी माहिती |Tikona fort information in marathi

'Tikona fort information in marathi'
'Tikona fort information in marathi'


तिकोणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत, पवन मावळात वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.

महाराष्ट्र हा सह्याद्रीच्या डोंगर रांगेने समृद्ध झालेला आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. याच सौंदर्य दृष्टीत भर घालणारे सह्याद्रीच्या कुशीतील बारा मावळ होय. 

बारा मावळातील एक मावळ म्हणजे पवन मावळ होय. या पवन मावळामध्ये लोहगड, तुंग, विसापूर किल्ल्याबरोबरच तिकोणा किल्ला देखील सह्याद्रीच्या डोंगरावर छाती काढून उभा आहे. 'Tikona fort information in marathi'

महाराष्ट्र हा ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध राज्य आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्याचे/गडाचे शौर्य आणि स्थापत्यकलेच्या तेजाने महाराष्ट्र उजळून निघालेला आहे. यापैकीच एक तिकोणा किल्ला होय. अती उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये बसलेला इतिहास प्रेमी, निसर्गप्रेमी तसेच ट्रेकर्स साठी मनमोहक असलेला किल्ला आहे.

तिकोणा किल्ला हा वितंगगड या नावाने देखील ओळखला जातो. या वितंगगड म्हणजेच तिकोणा किल्ल्याला स्वराज्य म्हणजेच शिवकाळात खूप महत्त्व होते.

त्रिकोणी आकाराचा असलेला तिकोणा किल्ला नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे.

किल्ल्याला असलेला त्रिकोणी आकारामुळेच या किल्ल्याला तिकोणा किल्ला हे नाव पडले.

तिकोणा हा किल्ला पवना नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. या त्रिकोणी आकाराच्या तिकोणा किल्ल्यापासून पवना नदीवरील पवना धरण हे जवळच आहे.

पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या तिकोणा किल्ल्याची उंची ही साधारण 3500 फुट इतकी आहे.

चढणीला सोपा असणाऱ्या आणि गिरिदुर्ग प्रकारात मोडणाऱ्या तिकोणा किल्लाच्या पायथ्याला तिकोणा पेठ हे गाव वसलेले आहे. 'Tikona fort information in marathi'


तिकोणा किल्ल्याचे स्थान


तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील पवन मावळ प्रदेशात, पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. 

तिकोणा किल्ला अंदाजे 3500 फूट म्हणजेच साधारण 1100 मीटर उंचीवर, सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेला मोक्याच्या किल्ला आहे. 'Tikona fort information in marathi'

तिकोणा किल्ल्याला चा हा ट्रेक एक दिवसाच्या ट्रेक साठी उत्तम पर्याय आहे.

किल्ल्यावरून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्यांचा आनंद देणारा तिकोणा किल्ल्यावर रस्त्याने सहज प्रवेश करता येतो.


तिकोणा किल्ल्याचा इतिहास Tikona fort history in marathi


सह्याद्रीच्या भाळावरील अलंकार म्हणून शोभून दिसणाऱ्या तिकोणा किल्ल्याचा इतिहास फारसा उपलब्ध नाही.

तिकोणा किल्ल्यावर असणाऱ्या लेण्यांवरून हा किल्ला प्राचीन काळातील असावा असे सांगितले जाते.

पंधराव्या शतकाच्या 'Tikona fort information in marathi' अखेरीस 1485 च्या आसपासम मलिक अहमद याने तीकोणा किल्ल्यावर स्वारी करून किल्ला निजामशाहीच्या ताब्यात आणला.

पुढे 1657 मध्ये स्वराज्य निर्मिती करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि किल्ल्यांना वितंगगड असे नाव दिले.

सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेला तिकोणा किल्ला हा शिवकालीन समृद्ध इतिहासाचा पुरावा आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात तिकोणा किल्ल्यावर बरेच बांधकाम झाल्याचे सांगितले जाते.

पवन मावळ व आसपासच्या परिसराचे रक्षण करण्यासाठी या उंच डोंगरावरील तिकोणा किल्ल्याने एक मोक्याची चौकी म्हणून महत्त्वाचे काम केले आहे. 

शेजारी असणाऱ्या लोहगड आणि विसापूर किल्ल्यासारख्या किल्ल्यांच्या प्रदेशांचे निरीक्षण व टेहळणीचे काम  या तिकोणा किल्ल्याने केलेले आहे.

1660 च्या दरम्यान या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांची नियुक्ती केली होती.

शिवरायांच्या ताब्यात असलेला तिकोणा किल्ला हा 11 जून 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या प्रसिद्ध पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवरायांना हा किल्ला मुघलांना द्यावा लागला होता.

मुघल बादशहा औरंगजेब हा दक्षिणेच्या स्वारीवर असताना त्याने हा तिकोणा किल्ला जिंकून घेतला होता; असे काही इतिहासकार सांगतात. 'Tikona fort information in marathi'

औरंगजेबाचा मुलगा अकबर हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला असता, तो या तिकोणा किल्ल्यावर काही दिवस राहिला होता.

पुढे शाहू महाराजांच्या ताब्यात असणारा हा तिकोणा किल्ला 1818 मध्ये इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला; आणि आता तो भारत सरकारच्या अधिपत्याखाली आहे.


तिकोणा किल्ल्याचे स्थापत्य


तिकोणा किल्ला हा पवन मावळ भागात वसलेला नैसर्गिक परिसर आणि मानवनिर्मित सरचनेचे उत्कृष्ट मिश्रण दाखवून देतो.

तिकोणा किल्ल्याच्या तटबंदीच्या मजबूत भिंती, बुरुज आणि भव्य प्रवेशद्वार हे काळाच्या कसोटीवर आज देखील मजबूत टिकून आहेत. 'Tikona fort information in marathi'

स्वराज्यविचार आणि मराठयांच्या पराक्रमाचे तेज किल्ल्यावर गेल्यानंतर आपोआपच उजळून निघू लागते. 

तिकोणा किल्ल्यावरील तिकोणा दरवाजा म्हणून ओळखले जाणारे प्रवेशद्वार तिकोना किल्ल्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करते.


तिकोणा किल्ल्याचे तिकोना शिखर


तिकोणा किल्ल्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिकोणा शिखर होय.

किल्ल्यावरील याच तिकोणा शिखरामुळे किल्ल्याला तिकोणा किल्ला नाव दिले असावे असे सांगितले जाते.

त्रिकोणी आकाराचा खडक असलेल्या या तिकोणा शिखरावर पर्यटक अगदी निसर्गाच्या सानिध्यात हरवून जातात. 

अनेक साहसी, उत्साही पर्यटक-ट्रेकर्स अनेकदा हे तिकोणा शिखर चढून उतरण्याचा अनुभव जिंकण्यासाठी तिकोणा किल्ल्याच्या ट्रेकिंग साठी जात असतात.


तिकोणा किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य


तिकोणा किल्ल्याला अगदी तेराव्या शतकापासून आणि स्वराज्याचा समृद्ध इतिहास आहे. पण तिकोणा किल्ला हा ऐतिहासिक महत्त्वाच्या पलीकडे जाऊन ट्रेकिंग साठी चित्तथरारक आणि विहंगम अनुभव देणारा, नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. 

तिकोणा किल्ल्याची पायवाट चालत असतात परिसरातील हिरवाईचा हिरवागार गालिचा आपल्याला अलगद स्पर्श करतो. 

किल्ल्याच्या सानिध्यात मनाला शांतता आणि प्रसन्नता जाणवते. 'Tikona fort information in marathi'

तिकोणा किल्ल्यावरून दिसणारे सूर्यास्त आणि सूर्योदयाचे सुंदर दृश्य पर्यटकांना सह्याद्रीच्या कुशीत हरवून टाकतात.


तिकोणा किल्ल्यावर काय पाहावे


• त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर


• श्री तुळजाई देवी मंदिर


• सातवाहन कालीन लेणे


• बालेकिल्ला


• धाण्यकोठार


• पाण्याचे तलाव


• मारुतीची मूर्ती


• बुरुज / दरवाजे



तिकोणा किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ


तिकोणा किल्ल्याला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ आणि काळ म्हणजे श्रावण महिन्याच्या नंतर आणि हिवाळा ऋतूचा संपूर्ण काळ हा आहे. 'Tikona fort information in marathi'

या काळामध्ये किल्ल्याच्या परिसरातील नैसर्गिक वातावरण हे आल्हाददायक असते आणि परिसर हा हिरवळलेला असतो.

उन्हाळ्यामध्ये आणि पावसाच्या मोसमात हा ट्रेक आव्हानात्मक देखील होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात आणि भर पावसात तिकोणा ट्रेक शक्यतो टाळावा.


तिकोणा किल्ल्याला भेट देण्यासंबंधित टिपा


तिकोणा किल्ल्याला भेट देत असताना पर्यटकांनी आरामदायक आणि मजबूत असे ट्रेकिंग शूज घातले पाहिजेत.

तसेच तिकोणा किल्ल्याच्या ट्रेकिंग साठी जात असताना सोबत पुरेसे पाणी, स्नॅक्स आणि प्रथमउपचाराची पेटी सोबत ठेवणे आवश्यक आहे.

जर तुम्ही तिकोणा किल्ल्याच्या ट्रेकसाठी पहिल्यांदाच जात असाल तर, तुम्ही तिकोणा किल्ल्याच्या ट्रेकसाठी अनुभवी स्थानिक ट्रेकर्स यांच्या मार्गदर्शनातच ट्रेक साठी जावे.

किल्ल्याला भेट देत असताना आपण एक आपली जबाबदारी म्हणून किल्ल्याच्या परिसरात कुठलाही अनुसूचित प्रकार न करता, नैसर्गिक आणि ऐतिहासिक किल्ल्याचे पावित्र्य राखले पाहिजे. 'Tikona fort information in marathi'

तिकोणा किल्ल्याच्या भेटीदरम्यान फोटोग्राफीच्या अतिआहारी या जाता, आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे.


तिकोणा किल्ल्याला कसे जावे


मुंबई-पुणे-बेंगलोर या महामार्गावर लोणावळ्यापासून तिकोणा किल्ल्याला जाता येते. 

पुण्याहून कामशेत-कालेकॉलनी मार्गे तसेच लोणावळा-दुधीवर खिंड-काले या मार्गाने तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला बस, मोटारसायकल किंवा टॅक्सीने सहज पोहचता येते.

मुंबईपासून 120 किलोमीटर आणि पुणे शहरापासून साधारण 60 किलोमीटर अंतर असणाऱ्या तीकोणा किल्ल्याला जाण्यासाठी तळेगाव दाभाडे, लोणावळा, पुणे, मुंबई या ठिकाणाहून बस उपलब्ध आहेत.

पर्यटक हे आपले खाजगी वाहन घेऊन किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या तिकोणा पेठ पर्यंत सहज पोहचू शकतात.


निष्कर्ष


सह्याद्री कुशीत पवन मावळात वसलेला तिकोणा किल्ला हा ऐतिहासिक महत्त्व असलेला, स्थापत्यशास्त्राची भव्यता प्रदर्शित करणारा आणि मनमोहक निसर्ग सौंदर्यासह भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हा तिकोणा किल्ला एक अविस्मरणीय अनुभव देतो. 'Tikona fort information in marathi'

साहस ट्रेक, इतिहासाची अवड असणारे किंवा निसर्गाच्या सौंदर्यात नाव्हून जाण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला तिकोणा किल्ला एक आपल्या काळजात जागा देतो.



इतर महत्त्वाचे लेख


तोरणा किल्ला

मुरुड-जंजिरा किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला





Post a Comment

0 Comments