Bhide Wada | मुलींची पहिली शाळा

 Bhide Wada | मुलींची पहिली शाळा

Bhide Wada | मुलींची पहिली शाळा
Bhide Wada | मुलींची पहिली शाळा



 




'Bhide Wada' महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने 1 जानेवारी 1848 रोजी, तात्याराव भिडे यांच्या मालकीचा असलेल्या भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा चालू केली. 

13 वर्षाचे असलेले ज्योतिराव फुले यांनी 9 वर्षाच्या सावित्रीबाई बरोबर विवाह केला. सावित्रीबाई तेव्हा अशिक्षित होत्या; कारण पूर्वी जातीपातीमूळे खालच्या जातीच्या लोकांना, विशेषतः महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जायचे. पण ज्योतिराव फुले हे सामाजिक जाण असलेले समाज सुधारक होते. त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईंना घरातच प्राथमिक शिक्षण देऊन शिक्षित केले. सावित्रीबाईंना लिहिता वाचता येत होते तेव्हा ज्योतिरावांनी समाजातील इतर मुलींना, स्त्रियांना शिकवण्याचं धाडस केलं. त्यातूनच या 'Bhide Wada' भिडे वाड्यातील पहिल्या शाळेची सुरुवात झाली. आणि त्याची जबाबदारी त्यांनी सावित्रीबाईंवर सोपवली. या कामासाठी घरातून, समाजातून विरोध झाला, पण त्याला न जुमानता या फुले दाम्पत्याने पुढे जाण्याचे ठरवले होते. 

सावित्रीबाई मुलींना शिकवण्यासाठी आपल्या घरातून भिडे वाड्यापर्यंत चालत जात असत. तेव्हा वाटेत लोक त्यांना घाणेरड्या शब्दांत हिनवत असत. एवढेच नाही तर दगड, धोंडे, शेण, चिखल त्यांच्या अंगावर फेकून मारायचे. सावित्रीबाई हे सगळं सहन करत होत्या; कारण त्यांना आपल्या पतीचे समाजातील स्त्रिया शिक्षित करण्याचे स्वप्न साकार करायचे होते. घरून येताना सावित्रीबाई सोबत पिशवीमध्ये एक दुसरी साडी घेऊन येत असत आणि शाळेत गेल्यानंतर लोकांनी अंगावर घाण फेकून खराब केलेली साडी बदलून सोबत आणलेली साडी नेसत आणि आनंदाने त्या मुलींना शिकवण्याचे काम करायच्या.

 ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या या कामासाठी घरातून देखील विरोध झाला. त्याचा परिणाम म्हणजे दोघांनाही घरातून बाहेर जावं लागलं. तेव्हा फातिमा शेख यांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना आपल्या घरात राहण्यास परवानगी दिली. फातिमा शेख या सावित्रीबाईंकडून शिक्षण घेऊन पुढे त्यांना शिकवणी मध्ये मदत करू लागल्या आणि मग याच फातिमा पहिल्या मुस्लिम  शिक्षिका झाल्या.'Bhide Wada'

ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी एवढे कष्ट उपसून मुलींना शिकवलं, परिणामी दगड धोंड्याचा मारा सहन केला. त्यामुळे आज मुली शिकून सुशिक्षित झाल्या आणि देशातील सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकल्या. 


आज शाळेची असलेली व्यवस्था

'Bhide Wada'
भग्न अवस्थेतील 'Bhide Wada'


पुणे महानगरपालिकेची ईमारत मागे टाकत, छत्रपती शिवाजी महाराज पूल ओलांडून, शनिवार वाड्याच्या थोडंसं समोर जाऊन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या अगदी समोरासमोर बुधवार पेठेत असणाऱ्या या भिडे वाड्यातील शाळेत पूर्वी 8 खोल्या, पाण्यासाठी विहीर आणि शौचालय होते. पण आज घडीला या वास्तूची जीर्ण अवस्था होऊन बसली आहे. भिंती कोसळल्या आहेत, माळवदाची लाकडं मोडून छत कोसळले आहे, टेबल मोडलेत, 'Bhide Wada' भिंतीच्या मातीने तर तळ मजला बुजून नष्टच होत आला आहे. एवढेच नाही तर संपूर्ण वास्तुच नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे. 

1990 च्या दरम्यान पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेकडे तारण असणाऱ्या या भिडे वाड्यातील शाळेचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. या वास्तूचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी अनेक संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले, आंदोलने केली, उपोषणे देखील केली आणि करत आहेत. 

भिडे वाड्याचा काया पालट करण्यासाठी अनेक 'Bhide Wada'  राजकारण्यांकडून घोषणांची बरसात केली गेली. 2018 मध्ये पुण्याचे पालकमंत्री असलेले गिरीश बापट यांनी भिडे वाडा हे राष्ट्रीय स्मारक होईल आणि या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही अशी घोषणा केली. सांस्कृतिक विभागाला तशा नोटीसी दिल्याचे सांगितले गेले. पुणे महानगरपालिकेच्या तत्कालीन महापौर मुक्ता टिळक यांनी देखील भिडे वाड्यासाठी महानगरपालिकेकडून भरघोस निधी देण्याचं आश्वासन दिले होते. आणि आता बाबा आढाव यांच्या उपोषणाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिडेवाड्यासाठी 50 कोटीची घोषणा करून अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे. 

  Bhide Wada | मुलींची पहिली शाळा  भिडे वाडा हे देशातील सर्वात मोठे जिवंत स्मारक आहे, आणि हा भिडे वाडा परत एकदा दिमाखात उभा राहावा यासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवं.

Post a Comment

0 Comments