प्रतापगड किल्ला संपूर्ण माहिती | Pratapgad fort information in marat
![]() | |
|
प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपासून जवळच असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ही तब्बल 1000 फूट उंच, तर प्रतापगडाची संपूर्ण उंची ही 3556 फूट उंच इतकी आहे. दोन भागात विभागला गेलेला प्रतापगड किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारात मोडतो. प्रतापगडाच्या बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ हे एकूण 3600 चौ. मी इतके आहे. डोंगर, दऱ्या यांच्या सहवासात छाती काढून उभा असलेला प्रतापगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज आणि एकूणच स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला होता.
साहसी किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रतापगडाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा इतिहास जोडला गेला आहे. 'Pratapgad fort information in marathi'
पराक्रम, बहादुरी आणि शौर्याचा साक्षीदार असलेला प्रतापगड किल्ला हा शिवरायांनी 1656 झाली भक्कमपणे उभा केला. जावळीच्या खोऱ्यात, घनदाट जंगलात आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेला हा अभेद्य किल्ला महाबळेश्वर पासून अवघ्या 22 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
हे वाचा 👉 राजगड किल्ला
भक्कम तटबंदीच्या संरक्षणात, दोन भागात विभागलेल्या प्रतापगडाचे एकूण क्षेत्रफळ हे 7545 चौरस मीटर इतके आहे.
जावळीच्या खोऱ्यातील याच प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजलखानाचा वध केला होता. ही घटना या किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध झाला तेव्हा संभाजी कावजी यांनी अफजलखानाचे शीर हे कापून धडावेगळे केले होते.
प्रतापगड किल्ला हा शिवकालीन प्रथेनुसार आज देखील सूर्य उजाडण्याच्या आधी उघडला जातो व सूर्य मावळल्यानंतर बंद केला जातो. ही शिवकालीन प्रथा आज देखील जपली जाते.
नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या किल्ल्यावर महादरवाजा, चिलखती बुरुज, शिवलिंग, तुळजाभवानी मातेचे मंदिर, आई जिजाऊंचा वाडा अशा अनेक शिवकालीन वास्तू बघायला मिळतात. 'Pratapgad fort information in marathi'
नैसर्गिक सौंदर्याने आणि शिवकालीन वास्तुकलेच्या आविष्काराने नटलेल्या या किल्ल्यावरून कोयना नदीचे खोरे न्याहाळण्याचा आणि अनुभवण्याचा सुंदर असा अनुभव पर्यटकांना घेता येतो.
प्रतापगड किल्याचा इतिहास Pratapgad fort history in marathi
प्रतापगड किल्ल्याचा इतिहास हा फार अलीकडल्या काळातील सांगितला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जावळीवर आक्रमण करून, जावळी जिंकली. त्यावेळेस प्रतापगडाच्या जागेवर फक्त एक भला उंच डोंगर होता. पूर्वी त्या डोंगराला भोरप्या डोंगर म्हटले जायचे, असे काही इतिहासकारांद्वारे सांगितले जाते.
जावळी जिंकल्यानंतर आसपासच्या परिसरावर वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या डोंगरावर किल्ला उभारण्याचे ठरवले; आणि 1656 साली मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखी खाली छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ला बांधून घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून, स्वराज्याचा विस्तार करत असतानाच आदिलशाहीला अडचण ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी बडीबेगम ने, आदिलशाही सरदार अफजल खानाला स्वराज्यावर चालून जाण्यास सांगितले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमीकावा वापरत 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला होता.
मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 साली प्रतापगड किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर स्थापन केले. मूळ दगडी गाभाऱ्याचे असणाऱ्या या मंदिराच्या समोर दोन भव्य दीपमाळा देखील उभारून, जवळच भव्य नगारखाण्याची इमारत देखील उभारली होती.
स्वराज्याची तिसरे छत्रपती राजाराम महाराज हे एप्रिल 1689 ते ऑगस्ट 1689 या दरम्यान प्रतापगड किल्ल्यावर वास्तव्यासाठी होते, आशा इतिहासात नोंदी आढळतात.
नाना फडणवीस आणि दौलतराव शिंदे यांच्यामध्ये युद्ध चालू असताना 1796 मध्ये, नाना फडणवीस हे काही दिवस प्रतापगडावर आश्रयाला होते.
पुढे 1820 मध्ये 'Pratapgad fort information in marathi' सातारच्या छत्रपती गाधीचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी या मंदिरा समोर लाकडी सभा मंडप उभारला होता. पण गडावर लागलेल्या भीषण आगीत, हा लाकडी सभामंडप जळून खाक झाला, व मंदिरातील सोन्याचे दागिने चोरीला गेले.
हे वाचा 👉 शिवनेरी किल्ला
1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात जाऊन, भारत स्वातंत्र्यानंतर प्रतापगड किल्ला हा भारत शासनाच्या अधिपत्याखाली आला.
इसवी सन 1656 ते 1818 या कालावधी दरम्यान, काही महिने वगळता प्रतापगड किल्ला हा अजिंक्य आणि अभेद राहिला आहे.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले; आणि त्याच्यानंतर 1957 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रतापगड किल्ल्यावर 17 फूट उंचीचा, कांस्य धातूचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
अफजलखानाचा वध, प्रतापगड
स्वराज्याच्या विस्तारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा बराच प्रदेश आणि किल्ले ताब्यात घेतली होती. त्याचाच बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाही दरबारात बडीबेगम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजलखानाची निवड करून, त्याला शिवरायांवर चालून जाण्यासाठी फर्मान सोडले.
अफजलखानाने शिवरायांचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलला; आणि शिवरायांवर चालून आला.
अफजलखान काही दिवस वाईचा सुभेदार असल्यामुळे त्याला या प्रांताची चांगलीच ओळख होती.
घोडदळ, पायदळ, हत्ती, उंट, तोफा, दारूगोळा घेऊन शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी निघाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठीच्या, बडी बेगमच्या आदेशानुसार, अफजल खान हा सोबत याकूब खान, फाजल खान आणि पिलाजी मोहिते, प्रतापसिंह मोरे यांच्यासारखे मराठा सरदार घेऊन मोहिमेचे नेतृत्व करू लागला.
प्रतापगडच्या दिशेने येत असताना वाटेतील गावे, मंदिरे उध्वस्त करत, रयतेला छळत तो अफजलखान आपले हैवानी रूप दाखवत होता. 'Pratapgad fort information in marathi'
अफजल खान हा प्रतापगड च्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला वकील त्याच्याकडे पाठवून, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला घाबरले असून ते आपल्याशी समझोता करू पाहत आहेत, असे सांगितले. सोबत शाही नजराने देखील पाठवले होते.
त्यातूनच पुढे प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची भेट ठरली. भेटीसाठी सुंदर असा शाबियांना उभारला गेला. या शाही शामिन्यात अफजल खान आणि छत्रपती शिवरायांची भेट ठरली होती.
भेटीदरम्यान अफजल खान हा काहीतरी दगाफटका करणार आहे, हे शिवाजी महाराजांना अगोदरच माहीत होते. त्यामुळे त्यांनी अंगामध्ये चिलखत व बोटांमध्ये वाघनखे घातले होते.
अफजल खान भेटीच्या दिवशी लवकर शामियान्यात पोहोचला होता. तिथे उशिराने छत्रपती शिवाजी महाराज येताच, अफजल खान 'आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ' असे म्हणत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन देऊन कपटाने छत्रपती शिवरायांची मान दाबली आणि पाठीवरती कट्यारचा वार केला. पण अंगावर वस्त्राच्या आत चिलखत असल्याने अफजलखानाचा वार मुका जाऊन, शिवरायांना कुठलीही हानी झाली नाही. तेव्हा शिताफीने छत्रपती शिवरायांनी बोटामध्ये लपवलेले वाघ नखे अफजलखानाच्या पोटामध्ये घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला.
अफजलखानावर आपले बंधू संभाजी राजे यांच्यावर झालेल्या दग्याफटक्याचा सूड घेतला. तेव्हा एकच गोंधळ उडाला, अफजलखान ओरडत सैरावैरा धावू लागला.
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी शिवरायांवर तलवार उचलली, तेव्हा शिवरायांनी त्यांना ताकीद देऊन सांगितले की पंत तुम्ही जावा. नाहीतर ब्राह्मण म्हणून आम्ही तुमचा मुलाहिजा ठेवणार नाहीत. म्हणत शिवाजी महाराजांनी त्याला ठार केले. 'Pratapgad fort information in marathi'
पाठीमागून सय्यद बंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करण्यासाठी येताच, शिवरायांचा मावळा जिवाजी महाले यांनी सय्यद बंडा यांचा हात छाटला, आणि थोडक्यात शिवराय बचावले.
'होता जीवा म्हणून वाचला शिवा'
कोथळा बाहेर पडलेल्या अफजलखानाचे संभाजी कावजी यांनी मुंडके कापून जिजाऊंकडे पाठवले होते.
मराठा सैनिकांनी अफजलखानाच्या सैनिकाचा पाठलाग करून, त्यांच्या ताब्यातील बराच प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतला.
प्रतापगड किल्ला फोटो
![]() |
प्रतापगड फोटो |
![]() | |
|
प्रतापगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
• महादरवाजा
प्रतापगडा जवळ जाताच आपल्याला भव्य असा, गुंतागुंतीच्या कोरीव शिल्पांनी सजलेला महादरवाजा दिसतो.
गडाचे हे मुख्य प्रवेशद्वार मराठ्यांच्या शौर्याची आणि सामर्थ्याची प्रचिती करून देतो.
भक्कम तटबंदीच्या मध्ये पश्चिम दिशेला तोंड करून महादरवाजा उभा आहे.
शिवकालीन रितीरिवाजाप्रमाणे आज देखील हा दरवाजा सूर्य उगवण्याचा अगोदर उघडला जातो आणि सूर्य मावळल्यानंतर बंद केला जातो.
• चिलखती बुरुज
प्रतापगड किल्ल्यावर महादरवाजातून आत गेल्यानंतर आपल्याला एक भव्य बुरुज दिसतो. तो चिलखती बुरुज होय.
या बुरुजाचे बांधकाम हे चिलखती पद्धतीने करण्यात आलेले आहे.
• भवानी देवीचे मंदिर
प्रतापगडावर असलेले भवानी देवीचे मंदिर हे छत्रपती शिवरायांच्या श्रद्धेचे प्रमुख ठिकाण होय.
चिलखती बुरुजापासून काही पायऱ्या चढून या मंदिराकडे जाता येते. 'Pratapgad fort information in marathi'
भवानी मंदिरामध्ये भवानी मातेची प्रसन्न मूर्ती स्थापन केलेली आहे. ही मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळमधून गंडकी नदीपात्रातून शाळीग्राम शिळा आणून त्या शिळेपासून घडवलेली आहे, असे सांगितले जाते.
पूर्वी शिवकाळात या भवानी मातेच्या मंदिरासमोर रोज सनई, चौघडे वाजवून पुजारी भवानी मातेला नैवेद्य दाखवत असे.
• शिवलिंग
श्री भवानी मातेच्या मंदिराला लागूनच एक शिवलिंग आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे शिबलिंग नित्य शिवपुजेसाठी वापरत असत. हे शिवलिंग स्फटिकाचे आहे.
शिवलिंगाजवळ सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार देखील आहे.
• जिजाऊंचा वाडा
छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ मासाहेब या प्रतापगडावर वास्तव्यात असताना, ज्या वाड्यात राहायच्या त्या वाड्याचे अवशेष आजही आपल्याला प्रतापगडावर पाहायला मिळतात.
प्रतापगडावरील हा जिजाऊंचा वाडा केदारेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला आहे.
• बालेकिल्ला
प्रतापगड किल्ला हा मुख्यतः दोन भागांमध्ये विभागला गेलेला आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे बालेकिल्ला होय.
बालेकिल्लाचे एकूण क्षेत्रफळ हे 3660 चौरस मीटर इतके आहे.
प्रतापगड किल्ल्यावरील बालेकिल्ला या सर्वोच्च ठिकाणावर नगारखाना, मंदिर, प्रवेशद्वार आशा ऐतिहासिक वास्तू आहेत.
बालेकिल्ल्यावरून प्रतापगड किल्ल्याच्या आजूबाजूच्या दऱ्या आणि पर्वतांचे विहंगमदृश्य पाहायला मिळतात.
• अफजलखान कबर
अफजलखानाची कबर याला अफजलखानाचे थडगे असे देखील म्हटले जाते.
प्रतापगडाच्या पायथ्याशी ही अफजलखानाची कबर आहे.
गडाच्या दक्षिण-पूर्व दिशेला असलेल्या या अफजलखानाच्या कबरीवर जाण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची कबर ही छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक आहे.
• हनुमान मंदिर
• केदारेश्वर मंदिर
• दिंडी दरवाजा
• नगारखाना
प्रतापगड किल्ल्याजवळील आकर्षक ठिकाणे
• ठोसेघर धबधबा
• पाचवड गाव
• कोयना नदी
• कोयना वन्यजीव अभयारण्य
हे वाचा 👉 पुरंदर किल्ला
प्रतापगड किल्ल्याला कसे जायचे?
प्रतापगड किल्ला हा पुणे शहरापासून 140 किलोमीटर आणि सातारा शहरापासून 75 किलोमीटर अंतरावर आहे.
प्रतापगड किल्ल्याला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे महाबळेश्वर होय.
सातारा जिल्ह्याच्या उत्तर दिशेला जावळी तालुक्यात महाबळेश्वर पासून 23 किलोमीटर अंतरावर प्रतापगड किल्ला आहे. 'Pratapgad fort information in marathi'
महाबळेश्वर बस स्थानकावरून प्रतापगडला जाणाऱ्या गाडीत किंवा महाडला जाणाऱ्या गाडीत बसून किंवा महाबळेश्वरहून खाजगी वाहन घेऊन प्रतापगड किल्ल्यासाठी जाता येते.
प्रतापगडाच्या पायथ्या पासून चारशे ते पाचशे पायऱ्या चढून, गडावर जाण्यासाठी जवळपास एक तासाचा कालावधी लागतो.
निष्कर्ष
खरंतर प्रतापगड किल्ला हा मराठ्यांच्या शौर्याचा आणि स्थापत्य कलेचा एक उल्लेखनीय पुरावा आहे.
ऐतिहासिक महत्त्व, अविस्मरणीय अनुभव, घनदाट जंगल, दऱ्या हे पर्यटकांची प्रतापगड किल्ला भेट समृद्ध करून टाकते.
इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी, ट्रेकर्स हे मनमोहक भूतकाळ आणि गौरवशाली वारसा अनुभवण्यासाठी नेहमीच प्रतापगड किल्ल्याला भेट देत असतात. 'Pratapgad fort information in marathi'
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
0 Comments