पाऊस - मराठी निबंध | Paus Marathi Nibandh

पाऊस - मराठी निबंध | Paus Marathi Nibandh

'Paus Marathi Nibandh'
'Paus Marathi Nibandh'



उन्हाळ्यात विस्तवासम पोळणाऱ्या उन्हाचे चटके सहन करून थकलेली धरती आणि तिच्या जिवावर जगणारे मानव जातीसह संबंध पशुपक्षी आभाळाकडे नजर लावून बसलेले असतानाच कुठेतरी पावसाचा पडलेला एखादा थेंब त्यांच्या आनंदाचे दारं उघडे करून देतो आणि त्यांच्या सुकलेल्या रोपट्याला कुठेतरी ताजंतवानं करतो. त्याच पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा भरवशावर शेतकरी आपलं सर्वस्व पणाला लावायला सुरुवात करतो, म्हणायला गेलं तर पाऊस हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटकच आहे. खरंतर पावसाविना हा निसर्गच अपूर्ण आहे असं म्हणावं लागेल. 'Paus Marathi Nibandh'

आता पाऊस म्हटल्यानंतर त्याची वेगवेगळी रुपही आलेच..मनाला प्रसन्न करणारा अल्लददायक पाऊस, धो-धो पडणारा, वाऱ्या वावधनासह, विजांच्या कडकडाटासह पडणारा तर कधी भर उन्हात पडणारा बोचरा पाऊस असे अनेक रूपं घेऊन पाऊस कोसळत असतो.

पशुपक्षी, मानव, झाडेझुडपे अशा प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा पाऊस कधी कधी आपलं अक्राळविक्राळ रुपही दाखवतो, तर कधी त्याच्या श्रावणात कोसळणाऱ्या सरी अनवाणी चालत, रानावनात हिंडत डौलदार हिरवळलेल्या पांदनीतुन आणलेला बेल श्रावण सोमवारी रावळातील महादेवाच्या पिंडीला वाहणाऱ्या निरागस माणसांना भिजवून त्यांच्या भक्तीत सामील होतो. 'Paus Marathi Nibandh' पावसाच्या आगमनाने आपल्या मंजुळ आवाजाने साद घालणारा पावसा..पावसाच्या पहिल्या थेंबासाठी आसुसलेला चातक पक्षी देखील सैरभेर उडायला लागतो. हिरवा शालू नेसून धरती जनु नववधुसारखी नटून बसते. असा हा प्रत्येकाच्या मनाला सुखावणारा तर कधी दुखवणारा पाऊस पावसाळा संपतात मागच्या सर्व आठवणी हृदयात साठवून ठेवायला भाग पाडतो. अशाच काही आठवणी लहानपणी आज्जी अंगणात बसल्यावर सांगायची...

          पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे उन्हाळ्याच्या शेवटी मान्सून आगमनाच्या पूर्वी पाऊस यायचा, ग्रामीण भागात त्याला अवकाळी पाऊस म्हणून ओळखतात. सर्व काही शांत असताना अचानक वारं वावधन सुटायचं;कुठून तरी लांबून गार वाऱ्यासह मातीचा सुगंध यायचा. तो येणारा सुगंध मनाला तृप्त करायचा पण तो सुगंध अनुभवण्याचा आनंद अल्पकाळ टिकायचा.. कारण सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणारा पाऊस प्रत्येक जीवाला भीतीने भेदरून सोडायचा, 'Paus Marathi Nibandh' वर्षानुवर्ष पहाडासारखी छातीकाढून उभी असणारी झाडे मुळासकट उखडून पडायची, घरावरची पत्रे उंच आभाळात कुठेतरी लांब जाऊन पडताना दिसायची. रपरप पत्र्यावरचा आवाज कानालाही भिती घालायचा. अशाप्रकारे अवकाळी पाऊस संपून जून च्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचं आगमन व्हायचं. प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतून जायचा. झाडेझुडपे हिरवीगार व्हायची सगळीकडे हिरवळच हिरवळ पसरायची. पूर्वी मोठ्या प्रमाणात जंगलं होती त्यात मोठी मोठी वृक्ष असायची आणि याचाच परिणाम म्हणजे पाऊस खूप व्हायचा. नदी-नाले ओढे ओसांडून वाहायची. दिवसभर काळ्याकुट्ट ढगांनी भरलेलं आभाळ रात्री गाढ झोपेत बरसायला सुरुवात करायचं. सकाळी उठल्यानंतर दारासमोर साचलेल्या पाण्यात नाचताना गावा शेजारील नदीला पूर आल्याची बातमी ऐकून मनाची उत्सुकता पायांना त्या नदीकडे घेऊन जायची. मस्ती भरलेल्या वळू सारखं ते पुराचं पाणी पाहताना भीती वाटायची पण ते लांबून का होईना पाहण्याची उत्सुकता असायची. त्यात मोठमोठी झाडं,वाळलेली खोडं, तर कधी कधी प्राणीही वाहून जायची.. 'Paus Marathi Nibandh'

एवढा पाऊस व्हायचा की गावागावाचा संपर्कही तुटायचा. कित्येक दिवस गावाच्या बाहेरही जाता येत नसे. पावसाची एकदा लागलेली झड २०-२५ दिवस उघडायचं नाव पण घेत नसे. सगळीकडे ओलच ओलं व्हायचं. घरात शिरलेलं पाणी जिव वैतागून टाकायचं, एवढा पाऊस पडायचा. ही पावसाची कहाणी सांगताना आजी त्या पूर्वीच्या पावसात जनु भिजूनच सांगायची..त्यातील शब्दनशब्द ऐकताना डोळ्यासमोर ते चित्रच उभं राहायचं. पण अलीकडच्या काळात हा पाऊस अनुभवास नाही आला. दिवसेंदिवस पूर्वीचा पाऊस हरवून जात आहे. तो ऐकलेला पाऊस पुन्हा कधी बरसेल की नाही माहित नाही, आम्ही तो पाऊस कधी अनुभवू की नाही हे पण माहीत नाही.. पण आम्ही ज्या समकालीन कमी तीव्रतेच्या पावसात भिजलोत तो पाऊस मनात खूप आठवणी ठेवून गेला. पडत्या पावसात खेळलेले खेळ, 'Paus Marathi Nibandh' पाऊस उघडल्यानंतर वाहणाऱ्या पाण्यात कागदाच्या सोडलेल्या होड्या, बहरलेलं माळरान, त्या माळरानात भर पावसात भिजताना पायात रुतलेला काटा, श्रावणातील हलक्या सरी झेलताना रानात हळूच कानी पडलेला मोरांचा आवाज अगदी पावसाळा संपताना;बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे खांदे मळणीच्या दिवशी, अनवाणी पायाने चालत जाऊन पावसात भिजत भिजत मातीचे बैल करण्यासाठी आणलेला चिखल..ह्या सगळ्या पावसातील आठवणी मनात एखाद्या रत्नापरी दडून बसल्या आहेत.... ह्या सगळ्या आठवणी आहेतच पण तो आजीच्या तोंडून ऐकलेल्या पाऊस मनात खदखद करत असतो. तो पाऊस आपल्याला अनुभवता आला नाही ही खंत मनात सतत सलत असते. ही मनातील सल काढून टाकायची असेल तर आपल्या समोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे..झाडे लावून ते लेकरा परी जपनं. झाडं जसजशी मोठी होतील तसतशी जंगले वाढून पावसाचे प्रमाण आपोआप वाढयला  लागेल आणि तो मनात घर करून बसलेला, मनात सलत असणारा, मनाला झोडपणारा धुवांधार पाऊस आपल्याला नाही तर किमान आपल्या पुढच्या पिढीला तरी नक्कीच अनुभवता येईल...!'Paus Marathi Nibandh'

'Paus Marathi Nibandh'
'Paus Marathi Nibandh'





बालपणी आजी सांगायची

पुर्वी पाऊस खुप व्हायचा

अक्राळ विक्राळ रूप दाखवून

महापूर यायचा..


पावसाचे असे रूप 

आम्ही कधी नाही पाहिले..

श्रावणाच्या हलक्या सरीतच 

आम्ही बेल फुल वाहिले..

'Paus Marathi Nibandh'

नुसता सोसाट्याचा वारा 

तर कधी हलकासा पाऊस..

सरी धुवांधार झेलण्याची

आमची गंजुन गेलीय हाऊस..


पावसाचं रूप आम्ही

साधंसुधंच पाहीलं..

त्याचं बलाढ्ये रूप बघण्याचं 

स्वप्न अधूरच राहिलं..


पण थोडंफार का होईना 

आम्ही पावसात भिजलोत.. 

कागदाच्या होड्या सोडत 

आम्ही पाण्यामध्ये नाचलोत..



पाऊस - मराठी निबंध | Paus Marathi Nibandh तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा.

Post a Comment

0 Comments