तलाठी भरती 2023 | Maharashtra talathi bharti 2023

तलाठी भरती 2023 | Maharashtra talathi bharti 2023

'Maharashtra talathi bharti 2023'
'Maharashtra talathi bharti 2023'




तलाठी हे महाराष्ट्र महसूल विभागातील एक महत्त्वाचे पद आहे. महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेतून हे पद भरले जाऊन, तलाठ्याची नेमणूक ही जिल्हा अधिकाऱ्याकडून केली जाते. हे महसूल विभागातील वर्ग 3 चे पद आहे. तलाठी हा जमिनीच्या नोंदी, सातबारा उतारा, आठ अ चा उतारा अशा सर्व नोंदी अद्यावत करत असतो. गावात काही नैसर्गिक आपत्ती आली की उदा. दुष्काळ, महापूर, गारपीट, अवकाळी पाऊस, वादळ यांचे पंचनामे करून; ती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याची मुख्य जबाबदारी ही तलाठ्याची असते. 'Maharashtra talathi bharti 2023' जमिनी खरेदी-विक्री व्यवहाराच्या सर्व नोंदी तलाठी ठेवत असतो. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीचा तलाठ्याची हमखास संपर्क येत असतो. गाव पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर सांभाळणाऱ्या तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील अनेक मुलं-मुली अभ्यास करतात. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन निवड होणाऱ्या या तलाठी पदाच्या परीक्षेची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहूया.


 वयाची मर्यादा Age limit

'Maharashtra talathi bharti 2023' या महसूल विभागातील पदाच्या परीक्षेला अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे तर कमाल वय हे  43 वर्षे असावे लागते. यात खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला वयाच्या 38 वर्षापर्यंत परीक्षेस बसता येते. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार वयाच्या 43 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतो. अपंग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची मर्यादा जास्तीत जास्त 43 वर्षे आहे. तर तत्कालीन परिस्थितीनुसार ही माहिती जाहिराती मध्ये अधिक स्पष्टपणे सांगितले जाते.


शैक्षणिक पात्रता

तलाठी पदासाठी उमेदवारा हा किमान कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा लागतो. तसेच उमेदवार हा संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयातील MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी व हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.


'Maharashtra talathi bharti 2023'

आवश्यक कागदपत्रे

• शाळा सोडल्याचा दाखला (10th, 12th, पदवी)

• मार्कशीट (10th, 12th, पदवी)

• बोर्ड सर्टिफिकेट (10th, 12th)

• पदवी प्रमाणपत्र 

MSCIT प्रमाणपत्र

• अधिवास प्रमाणपत्र (Domacile)

• राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality)

• जातीचा दाखला (Caste )

• नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer)

• जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity)

• EWS प्रमाणपत्र 

• अपंग प्रमाणपत्र 

• माजी सैनिक प्रमाणपत्र

• Sport Certificate

• प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र


परीक्षेचे स्वरूप

तलाठी हे पद गट (क)  विभागातील असून परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारे असतो. तलाठी पदासाठी सरळ सेवा पद्धतीने फक्त एकच लेखी परीक्षा घेतली जाते. या पदासाठी कोणतीही मुलाखत होत नाही. लेखी परीक्षा ही मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित-बुद्धिमत्ता या विषयांवर आधारित घेतली जाते.प्रत्येक विषयावरील 25 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा असते. परीक्षेचा कालावधी हा 2 तास असून या परीक्षेत नकारात्मक गुण पद्धत नसते. तलाठ्याच्या परीक्षेत मराठी या विषयावरील प्रश्न हे इयत्ता 12 दर्जाचे तर बाकी विषयावरील प्रश्न हे पदवीच्या दर्जाचे असतात. 'Maharashtra talathi bharti 2023'


 'Maharashtra talathi bharti 2023' अभ्यासक्रम

'Maharashtra talathi bharti 2023'
'Maharashtra talathi bharti 2023'

मराठी 

मराठी व्याकरण - समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, प्रयोग, समास, वाक्यरचना, शब्दार्थ, काळ व काळाचे प्रकार, क्रियापद, विभक्ती, नाम, सर्वनाम, म्हणी व वाक्प्रचार, शब्दसंग्रह, संधी व संधीचे प्रकार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, प्रसिद्ध लेखक आणि पुस्तके.


इंग्रजी English

Synonyms, Antonyms, Tense, Spelling, Punctuation, Voice, Article, Question tag, Vocabulary, idioms, Sentence, Noun, Verb, Adjective, Fill in the blank sentence, Simple sentence structure, Common error.


सामान्यज्ञान

इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भारतीय संविधान/राज्यघटना सामान्य विज्ञान, पंचायतराज, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, माहितीचा अधिकार 2005, क्रीडा, मनोरंजन, संगणक, माहिती तंत्रज्ञान, समाज सुधारक, सामाजिक-राजकीय घडामोडी आणि इतर.


अंकगणित-बुद्धिमत्ता

अंकगणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग,वर्गमूळ, काळ-काम-वेग, सरासरी, लसावी-मसावी, नफा-तोटा,सरळव्याज, चक्रवाढव्याज, चलन, मापन, परीमिती, घड्याळ. 'Maharashtra talathi bharti 2023'

बुद्धिमत्ता- अंकमालिका, अक्षरमालिका,आकृती, वेगळेपण-वेगळा शब्द व अंक ओळखणे, वेन आकृती, निष्कर्ष, नातेसंबंध, समसंबंध, कालमापन, विसंगत घटक.

'Maharashtra talathi bharti 2023' 


Post a Comment

0 Comments