शिवराज्याभिषेक दिन सोहळा | Shiv rajyabhishek din in marathi
![]() |
'Shiv rajyabhishek din in marathi' |
शिवराज्याभिषेक दिन, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस म्हणून ओळखले जाते. हा महान योद्धा राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या दिवसाला इतिहासात खूप महत्त्व आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या समृद्ध इतिहासाचा आणि चैतन्यमय उत्सवाचा गौरवशाली वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. |
1630 मध्ये जन्मलेले शिवाजी महाराज एक योद्धा, राजकारणी आणि दूरदर्शी राजे म्हणून प्रसिद्ध झाले. 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक 'Shiv rajyabhishek din in marathi' झाला. हा सोहळा स्वतंत्र मराठा राज्याच्या जन्माचे प्रतीक होते. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा कार्यक्षम शासन, लष्करी पराक्रम आणि सामाजिक-आर्थिक सुधारणांचा काळ म्हणून गौरव केला जातो. त्यांनी रयतेचे राज्य स्वराज्यावर भर दिल्याने पिढ्यांपिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या शक्तिशाली मराठा साम्राज्याचा पाया घातला गेला.
शिवराज्याभिषेक दिन हा शिवाजी महाराजांच्या चिरस्थायी वारसा आणि त्यांच्या सुशासन, सामाजिक न्यायाच्या आदर्शांची आठवण म्हणून काम करतो. धार्मिक सहिष्णुता, महिला हक्क आणि समाजातील उपेक्षित घटकांसाठी कल्याणकारी उपक्रमांबद्दलची त्यांची बांधिलकी आजही लोकांना प्रेरणा देते.
शिवराज्याभिषेक दिन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखनीय कामगिरीचा आणि स्वराज्याच्या तेजस्वी विचारांचा उत्सव आहे. भारतीय इतिहासाच्या वाटचालीला आकार देणार्या महान राजाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी लोक रायगडावर आणि गावोगावी, खेडोपाडी शिवराज्याभिषेक दिन साजरा करतात. 'Shiv rajyabhishek din in marathi'
6 जून शिवराज्याभिषेक दिन
राज्याभिषेक करत असताना शिवाजी महाराजांच्या सोबत महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजी महाराज देखील होते. कित्येक महिन्यांपासून तयारी चालू असणाऱ्या या सोहळ्यास राजे हे जिजाऊंचे दर्शन घेऊन सामोरे गेले.
6 जून 1674 रोजी पहाटे मंत्रांच्या उच्चारात स्नान करून, कुलदैवताचे स्मरण करत गागाभट्ट यांच्या हस्ते राज्यभिषेकास सुरुवात झाली. पांढरे वस्त्र, गळ्यात फुलांच्या माळा परिधान करून, डोक्यावर छत्र अशा विधीत शिवाजी महाराज सोन्याच्या पाटावर बसले. बाजूलाच त्यांचे अष्टप्रधान मंडळ उभे होते. गागाभट्टाच्या मंत्र उच्चारात सप्त नद्यांच्या जलकुंभाने महाराजांवर अभिषेक झाला. नंतर सोळा सुवासिनींनी शिवाजी महाराजांना पंचारती ओवाळली. राजेशाही वस्त्र परिधान करून, गळ्यात अलंकार आणि डोक्यावर राजमुकुट घालून शिवाजी महाराज 32 मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झाले. तेव्हा छत्रपती नावाची आरोळी आसमंतात दुमदुमली. छत्रपतींच्या नावाचा जयघोष झाला. हत्तीवरून अंबारीतून शिवाजी महाराजांची रायगडावर मिरवणूक काढली गेली.
शिवाजी महाराज छत्रपती होऊन सिंहासनावर बसले, तेव्हा दालनात शिवरायांच्या नावाचा जयघोष करत रयत आनंद साजरा करत होती. कारण गुलामीला पायदळी तुडवून त्यांचा राजा छत्रपती झाला होता. राज्याभिषेक सोहळ्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारचे दानधर्म देखील केले होते. 'Shiv rajyabhishek din in marathi'
विधिवत सोहळा आटोपल्यावर शिवाजी महाराजांनी रयतेचे आशीर्वाद आणि जगदीश्वराचे दर्शन घेत छत्रपती हा विचार स्वराज्याला अर्पण केला.
हे देखील वाचा 👉 रायगड किल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ
• प्रधान (पेशवा) - मोरोपंत
• अमात्य - रामचंद्र नीलकंठ
• सुरणीस - अनाजीपंत
• वाकनिस - दत्ताजी पंत त्रिंबक
• सेनापती - हंबीरराव मोहिते
• डबीर - रामचंद्र त्रिंबक
• न्यायाधीश - निराजी रावजी
• पंडितराव - मोरेश्वर पंडित
शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड
6 जून हा शिवरायांचा राज्याभिषेक दिन अखंड स्वराज्यासाठी भाग्याचा दिवस आहे. कारण या दिवशी आपले शिवाजी राजे 'छत्रपती' झाले. रयतेच्या राजाचा राज्यभिषेक दिन हा दरवर्षी दुर्गराज किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
थाटामाटात साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यास शिवप्रेमी हे हजारो लाखोंच्या संख्येने 6 जून रोजी रायगडावर हजेरी लावत असतात. 6 जून रोजी पहाटेपासूनच ढोल, ताशा, तुतारीच्या आवाजात, बेलभंडारा आणि गुलालाची उधळण करत हा सोहळा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने साजरा केला जातो. 'Shiv rajyabhishek din in marathi'
![]() |
शिवराज्याभिषेक सोहळा, दुर्गराज रायगड |
स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची साक्ष देणारा हा सोहळा आपल्याला आजही प्रेरणा देतो. या सोहळ्या दरम्यान रायगडावर विविध कार्यक्रम केली जातात. शाहिरी पोवाडे, तलवारीच्या युद्ध कला, प्रबोधनपर व्याख्याने अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास उलगडला जातो. देशभरातून लाखो शिवप्रेमी या सुवर्ण सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शवत असतात.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने आता 6 जून हा दिवस 'शिवस्वराज्य दिन' म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जात आहे. 'Shiv rajyabhishek din in marathi'
उत्सव
महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात लोक शिवाजी महाराजांना समर्पित मंदिरे आणि देवस्थानांमध्ये प्रार्थना करून करतात. विशेष समारंभ आयोजित केले जातात, जेथे शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासक शिवरायांच्या जीवनातील आणि कर्तृत्वातील प्रबोधन करतात.
रंगीबेरंगी मिरवणुका रस्त्यावर भरतात, ज्यामध्ये मावळे आणि शाही दरबारातील सदस्यांची वेषभूषा केलेले कलाकार असतात. या मिरवणुका शिवाजी महाराजांच्या काळातील वैभव आणि भव्यता दर्शवितात. पारंपारिक वाद्ये आणि लोक सादरीकरणाचे लयबद्ध ताल शिवराज्याभिषेक उत्सवात भर घालतात.
स्मरणीय कार्यक्रम
शिवाजी महाराजांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शने आयोजित केली जातात. या घटनांमधून त्याचे शौर्य, सामरिक तेज आणि न्यायप्रती बांधिलकी दिसून येते. नाट्यप्रदर्शन आणि ऐतिहासिक नाटके शिवाजी महाराज आणि त्यांच्या विश्वासू सेनापतींच्या शौर्यगाथा जिवंत करतात.
शिवराज्याभिषेक दिनी 'Shiv rajyabhishek din in marathi' प्रख्यात विद्वानांच्या जाहीर भाषणांतून शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत लागू केलेल्या प्रगतीशील प्रशासकीय धोरणांवर प्रकाश टाकला जातो. हे शाहिरी कार्यक्रम समृद्ध समाजाच्या उभारणीत नेतृत्व, शौर्य आणि एकतेवर भर देतात.
शिवराज्याभिषेक दिन शुभेच्छा संदेश
साऱ्या रयतेकडे पाहुनी
राजे बसले सिंहासनी ।
प्रजा आनंद करी साजरा
शिवरायांना करून मुजरा ।।
रायगडी राजा अमुचा
आज सिंहासनि बसला ।
तेज सोनेरी सुर्यापरी
जणू देवची अमुचा दिसला ।।
रयतप्रेमी राजा शिवबा
अवघ्या स्वराज्याने पाहला ।
युगंधराचा हा परमात्मा
आज छत्रपती जाहला ।।
इतिहासाची आवड असेल तर हे लेख नक्की वाचा 👇
लाल महाल पुणे
राजगड किल्ला
FAQ
0 Comments