शिवनेरी किल्ला संपूर्ण माहिती | Shivneri fort information in marat
![]() |
'Shivneri fort information in marathi' |
maraहाराष्ट्राच्या नयनरम्य डोंगरामध्ये वसलेला, शिवनेरी किल्ला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा पुरावा म्हणून उंच उभा आहे. पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर जुन्नर येथे असलेल्या या भव्य किल्ल्याला महान राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून खूप महत्त्व आहे. किल्ल्याच्या मनमोहक वास्तुकला, चित्तथरारक दृश्ये आणि वेधक इतिहासासह, शिवनेरी किल्ल्याची भेट एक अविस्मरणीय अनुभव देते. 'Shivneri fort information in marathi'
19 फेब्रुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर असल्याने त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. चहू बाजूंनी चढणीला कठीण असणारा हा शिवनेरी किल्ला शंकराच्या पिंडीसारखा दिसतो.
शिवनेरी किल्ल्याला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण ते मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आणि बालपणीचे घर होते. किल्ल्याने त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना पाहिल्या आणि त्यांच्या नेतृत्वगुणांना आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
तुम्ही जसजसे शिवनेरी किल्ल्याजवळ जाल, तसतसे त्याची प्रभावी वास्तुकला तुम्हाला थक्क करून सोडेल. हा किल्ला धोरणात्मकदृष्ट्या एका टेकडीच्या वर बांधला गेला आहे. त्याच्या सभोवताल उंच कड्यांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संभाव्य आक्रमणकर्त्यांपासून नैसर्गिक संरक्षण प्रदान करतो. किल्याचे 'महादरवाजा' म्हणून ओळखले जाणारे मुख्य प्रवेशद्वार, गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि दगडी बांधकाम हे पर्यटकांना आकर्षित करते. किल्ल्याच्या आत, तुम्हाला कडेलोट पॉइंट आणि शिवाई देवीला समर्पित शिवाई मंदिर यासारख्या विविध वास्तू सापडतील.
किल्यावर 'जामा मशीद' नावाची मशीद आणि 'बदामी तलाव' म्हणून ओळखले जाणारे छोटे तलाव देखील आहे.
शिवनेरी गड 'Shivneri fort information in marathi' चढत असताना पीर दरवाजातून आत गेल्यावर गडाच्या डाव्या बाजूला तानाजी मालुसरे नावाचे एक उद्यान देखील आहे. तर गडावर जिजामाता आणि शिवाजी महाराजांची मूर्ती असणारे शिवकुंज नावाचे स्मारक देखील पाहायला मिळते.
किल्ला - शिवनेरी
प्रकार - गिरिदुर्ग
उंची - 3500 फूट
शिवनेरी किल्ल्याचा इतिहास
शिवनेरी किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. इ.स. पहिल्या शतकाच्या सुमारास सातवाहन काळात बांधण्यात आल्याचे मानले जाते. हा किल्ला बहमनी सल्तनत आणि मुघलांसह विविध राजवंशांच्या ताब्यात आला.
गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या काळातील म्हणजेच इसवीसनाच्या पहिल्या शतकातील हा किल्ला, सातवाहन यांच्यानंतर चालुक्य आणि राष्ट्रकूटांच्या सत्तेत होता.
1170 नंतर हा किल्ला यादवांनी जिंकून घेतला आणि गडाचा विस्तार करून, यादवांनी याला गडाचे मुख्य स्वरूप दिले. 'Shivneri fort information in marathi'
पुढे बहमनी राजवटीच्या ताब्यात असणारा हा शिवनेरी किल्ला 1595 मध्ये शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्याकडे जुन्नर प्रांतासोबत आला.
जिजाऊंचे वडील सिंदखेडचे लखुजीराव जाधव यांची हत्या झाली, तेव्हा गरोदर असणाऱ्या जिजाऊ यांना पती शहाजीराजे भोसले यांनी 1629 झाली 500 जणांची फौज सोबत देऊन ताब्यात असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. तेव्हा गडावरील शिवाई देवीला जिजाऊंनी आम्हाला पुत्र झाल्यास त्याला तुझे नाव देईल असा नवस केल्याचे सांगितले जाते. पाहता पाहता फाल्गुन वद्य तृतीयेला 19 फेब्रुवारी 1630 रोजी, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. शिवबांसोबत दोन वर्षे या किल्ल्यावर वास्तव्य केल्यानंतर जिजाऊ मातेने 1632 मध्ये शिवनेरी किल्ला सोडला. तेव्हा शिवनेरीचे किल्लेदार हे मुधोजी विश्वासराव हे होते.
![]() |
'Shivneri fort information in marathi' |
काही काळ लोटल्यानंतर १६३७ मध्ये शिवनेरी मोघलांनी आपल्या ताब्यात घेतला. मोघलाईत शिवनेरी किल्ल्याला आजीखान, फत्तेखान, मुन्शी काझी असे अनेक किल्लेदार होते.
असे सांगितले जाते की जिजाऊंनी शिवनेरी किल्ला सोडल्यानंतर शिवाजी महाराजांना शिवनेरी परत कधीच आपल्या ताब्यात घेता आला नाही. 1678 ला मराठ्यांनी प्रयत्न केला होता पण तेव्हा त्यांना अपयश आले होते. पुढे 38 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर 1716 साली शाहू महाराजांनी शिवनेरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणला.
1771 मध्ये नाना फडणवीस आणि संताजी यांच्यातील तहा मध्ये हा किल्ला कोळ्यांकडे गेला होता.
पेशवे काळात शिवनेरी किल्ल्यावर कैद्यांना ठेवण्यात येत असे. 18 एप्रिल 1774 रोजी सवाई माधवरावांच्या जन्माच्या आनंदात किल्ल्यावरील कैद्यांची मुक्तता पेशव्यांकडून करण्यात आली होती. काळाच्या ओघात या कैदखाण्याची पडझड होऊन गेली. 'Shivneri fort information in marathi'
नंतर एल्ड्रीजन याने 17 मे 1818 रोजी शिवनेरी किल्ल्याला वेढा देऊन किल्ला ताब्यात घेतला.
1820 साली अॅग्लो-मराठा युद्धात शिवनेरी किल्ला हा ब्रिटिश राजवटीच्या अधिकारात गेला.
हे अवश्य वाचा 👉 शिवराज्याभिषेक दिन
शिवाजी महाराजांचे जन्मस्थान
शिवनेरी किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून आदरणीय आहे. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी येथे झाला होता. त्यांच्या सुरुवातीच्या दोन वर्षाच्या आयुष्यात या किल्ल्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
शिवनेरी किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाणे
• प्रवेशद्वार
शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी चा राजमार्गावर सुरुवातीलाच एक भव्य असे प्रवेशद्वार आहे. त्याला महादरवाजा असे म्हणतात. हा महादरवाजा असणारे प्रवेशद्वार पेशवेकालीन आहे.
महादरवाज्याच्या बुरुजांवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पूर्वीच्या काळात या बुरुजांवरून शत्रूंवर नजर ठेवली जायची.
• शिवाई देवी मंदिर
शिवनेरी गडाला असणाऱ्या सात दरवाजांपैकी पाचव्या दरवाजातून म्हणजे शिपाई दरवाजातून आत जातात उजव्या बाजूला शिवाई देवीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात देवीची सुंदर अशी प्राचीन मूर्ती असून, मंदिराच्या मागे गुफा आहे.
आई जिजाऊंनी शिवरायांचे नाव या देवी वरूनच ठेवले होते.
• शिवजन्मघर
19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. ते ठिकाण म्हणजे जन्मघर ही दोन मध्ये इमारत आहे. 'Shivneri fort information in marathi'
ही दोन मजली इमारत आज देखील आहे. यातील खालच्या मजल्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या इमारतीत पाळणा आणि जिजाऊ-शिवबा यांचे पुतळे आहेत.
शिवजयंतीच्या दिवशी ही इमारत फुलांनी सजवली जाऊन आतील पाळण्यात मुख्यमंत्रीच्या हस्ते शिवप्रतिमा ठेवली जाते.
• बदामी तलाव
शिवनेरी गडावर जन्म घराच्या बाजूला, कडेलोट टोकाकडे जाताना एक भले मोठे बदामाच्या आकाराचे तळे आहे. तो बदामी तलाव होय.
बदामी तलाव हे जिजाऊंनी दिलेले नाव आहे.
या तलावत पाण्याची पातळी मोजण्या करिता एक खांब देखील दिसतो. तर आत बसण्यासाठी दोन थंडगार जागा देखील आहेत.
• गंगा-जमुना टाकी
शिवनेरी किल्ल्यावर जन्म घराकडे जाताना, जमिनीमध्ये काळ्या खडकात दोन पाण्याच्या टाक्या आहेत. त्यांना गंगा जमुना असे नाव आहे.
या टाक्यांची विशेषता म्हणजे यात वर्षभर पाणी असते. थंडगार असे पाणी पिण्यासाठी याचा वापर केला जातो.
• बुद्ध लेण्या
शिपाई दरवाजातून आत जाऊन आई शिवाई देवीचे मंदिर लागते.
या शिवाई देवीच्या मंदिरापासून काही अंतर पुढे गेल्यावर शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या दगडांमध्ये कोरलेल्या लेण्या असून, त्या बुद्ध लेण्या आहेत.
• अंबरखाना
राजमार्गावरील सात दरवाजे वर चढून गेल्यानंतर लगेचच अंबरखाना दिसतो. जीर्ण अवस्थेत असणाऱ्या या वास्तूमध्ये पूर्वीच्या काळी मुबलक असा धान्य साठा असायचा.
अंबरखाना ही गडावरील महत्त्वाची असलेली वास्तू आता पडलेल्या अवस्थेत आहे.
• कडेलोट टोक
शिवनेरी गडावरील शिव जन्म घराच्या बाजूला असणाऱ्या, बदामी तलावाच्या पुढे गेल्यानंतर कडेलोट टोक आहे. या टोकाची उंची ही जवळपास 1500 फूट आहे.
पूर्वी गद्दार, गुन्हेगारांना शिक्षा म्हणून या टोकावरून त्यांचा कडेलोट करण्यात येत असे.
शिवनेरी किल्ला फोटो
![]() |
शिवनेरी किल्ला, जुन्नर |
शिवनेरी किल्ला फोटो |
शिवनेरी किल्ल्याचे सात दरवाजे
शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे राजमार्ग, म्हणजेच सात दरवाजांचा मार्ग होय. गडावर जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. या मार्गातून गड चढून वर जाण्यासाठी आपल्याला सात प्रवेशद्वारातून जावे लागते. त्यातील पहिले आणि मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा आहे. 'Shivneri fort information in marathi'
◆ महादरवाजा
◆ पीर दरवाजा
◆ परवानगीचा दरवाजा
◆ हत्ती दरवाजा
◆ शिपाई दरवाजा
◆ फाटक दरवाजा
◆ कुलाबकर दरवाजा
शिवनेरी किल्ल्यावर जाण्याच्या वाटा
उंच डोंगरावर वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्यतः दोन वाटा आहेत. या दोन वाटेने वर चढून शिवनेरीवर पोहोचता येते.
● सात दरवाजांचा मार्ग (राजमार्ग)
● साखळीची वाट
पर्यटन आणि नैसर्गिक अनुभव
पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी शिवनेरी किल्ला एक स्वर्ग आहे. किल्ल्यावरचा ट्रेक निसर्गाशी जोडण्याची आणि पश्चिम घाटाच्या सौंदर्यात डुंबण्याची एक रोमांचक संधी देतो. किल्यावर जाण्याची पायवाट ही मध्यम आव्हानात्मक आहे. घनदाट जंगले आणि खडकावर वळण घेणारी आहे.
शिवनेरी किल्ल्याला भेट देण्याच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे किल्ला चढताना चित्तथरारक अनुभव भेटतो. तुम्ही किल्ल्यावर चढत असताना, तुम्हाला आजूबाजूच्या ग्रामीण भागाचे, हिरव्यागार टेकड्या आणि नयनरम्य निसर्गाचे आकर्षक दृश्य बघायला मिळेते. किल्ल्यावरील सूर्योदय आणि सूर्यास्ताची दृश्ये विशेषतः विलोभनीय आहेत, ज्यामुळे संपूर्ण किल्ल्यावर सोनेरी रंगाची छटा दिसते.
शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती
19 फेब्रुवारी हा छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस; या दिवशीच शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. त्यामुळे 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर शासकीय शिवजयंती साजरी केली जाते. मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची प्रमुख उपस्थिती असते.
मुख्यमंत्री आणि उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते किल्ल्यावरील शिवजन्म घरातील बाळ शिवाजींची प्रतिमा असलेला पाळणा हलवला जातो. त्यानंतर गडावर मुख्यमंत्र्यांचे भाषण देखील होते.
![]() |
शिवनेरी किल्ला, शिवजयंती |
देशभरातून हजारो लाखो शिवप्रेमी 19 फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर 'Shivneri fort information in marathi' येऊन शिवरायांना वंदन करत असतात. दरम्यान गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत ढोलताशांच्या गजरात गडावरील शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो.
शिवनेरी किल्ल्यावर कशे जावे
शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी जायचे असेल तर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यतः दोन प्रमुख मार्ग आहेत.
मुंबई हून शिवनेरी किल्ल्याला जायचे असेल तर, माळशेज घाट पार करून जावे लागते. माळशेज घाटापासून हा किल्ला 9 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून येणारा हा रस्ता गणेश खिंडीतून एक ते दीड तासात गडापर्यंत पोहोचवतो.
पुणे मार्ग जर तुम्ही पुणे शहरातून जात असाल तर, नाशिक हायवे वरून पुणे नारायणगाव या रस्त्याने शिवनेरी किल्ल्याला जाण्यासाठी रस्ता चालू आहे. पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर तुम्ही सरकारी बस किंवा खाजगी वाहनांनी जाऊ शकता.
शिवनेरी किल्ला प्रवेश शुल्क
शिवाजी महाराजांच्या जन्माने समृद्ध झालेल्या शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
पर्यटक, अभ्यासक, एकूणच सर्व शिवप्रेमींसाठी हा किल्ला बघण्यासाठी मोफत आहे. त्यामुळे पर्यटक हा किल्ला मनसोक्त अभ्यासू शकतात, फिरू शकतात.
निष्कर्ष
शिवनेरी किल्ल्याला भेट देणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखनीय जीवनाची आणि मराठा साम्राज्याच्या भव्यतेची झलक देणारा काळाचा प्रवास आहे. किल्याच्या मनमोहक वास्तुकलेपासून ते मंत्रमुग्ध करणारी दृश्ये आणि सांस्कृतिक महत्त्वापर्यंत, या किल्ल्याचे प्रत्येक पैलू तुम्हाला आश्चर्यचकित करतात. तुम्ही इतिहासप्रेमी असाल, निसर्गप्रेमी असाल किंवा फक्त समृद्ध अनुभव शोधत असाल तर शिवनेरी किल्ला हे एक असे ठिकाण आहे जे तुम्हाला आयुष्यभर टिकून राहतील अशा आठवणी देतो. 'Shivneri fort information in marathi'
0 Comments