जंजिरा किल्ला मराठी माहिती | Janjira fort information in marathi
![]() |
'Janjira fort information in marathi' |
मुरुड-जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यात, अरबी समुद्रात वसलेला एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. अलिबाग पासून जवळपास 55 किलोमीटर आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनस, मुंबईपासून 165 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या जंजिरा किल्ल्याची उंची ही साधारण 90 फूट असून किल्ल्याच्या पायाची खोली ही 29 फूट आहे. 22 एकर परिसरात पसरलेल्या या जंजिऱ्यावर एकूण 22 सुरक्षेच्या चौक्या आहेत. 'Janjira fort information in marathi'
(Janjira killa mahiti, janjira fort marathi information, janjiryachi marathi mahiti, जंजिरा किल्ला माहिती, murud-janjira killa marathit mahiti)
जंजिरा किल्ला माहिती मराठी
जंजिरा किल्ल्याचे खरे नाव हे "जंजिरे मेहरुब" असे सांगितले जाते. जंजिरा हा किल्ला पूर्णपणे म्हणजे चारही बाजूंनी समुद्राने घेतलेला आहे.
खरं तर जंजिरा हा शब्द अरबी भाषेतील "जझीरा" या शब्दापासून आलेला आहे.
जंजिऱ्याच्या पूर्वी अरबी समुद्रातील या बेटावर मेढेकोट होता. येथील लोकांना समुद्री लुटारू पासून होणाऱ्या त्रासांचा बंदोबस्त करण्यासाठी निजामी ठाणेदाराणी हा किल्ला बांधला होता. 'Janjira fort information in marathi'
शेवटपर्यंत अजिंक्य राहिलेल्या या जंजिरा किल्ल्याच्या तटावर एकूण 572 तोफा होत्या असे सांगितले जाते. त्यातील कलाल बांगडी ही तोफ सर्वात विशेष व लांब पल्ल्याची तोफ होय.
मुख्यतः सिद्धींच्या ताब्यात असणाऱ्या या जंजिरा किल्ल्याला एकूण 19 बुरुज आहेत. जंजिरा किल्ल्याच्या बुलंद तटबंदीमध्ये तोफा ठेवण्यासाठी कमानी केलेले आहेत. तसेच तटबंदीला जागोजागी पायऱ्या पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी भव्य वाड्याची पडक्या अवस्थेतील वास्तू देखील आहे.
जंजिरा किल्ल्याची भिंत ही 40 फूट उंच असून, किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी देखील आहेत.
जंजिरा किल्ल्याला दोन मुख्य दरवाजे असून, त्यातील "दर्या द्वार" हा दरवाजा समुद्रात उघडणारा दरवाजा गडाच्या पश्चिम दिशेला स्थित आहे.
अरबी समुद्रात एका मोठ्या खडकावर असलेल्या या लाकडी किल्ल्याचे, रूपांतर काँक्रीटमध्ये, मलिक अंबर याने अहमदनगरचा निजामी सुलतानाला खुश करण्यासाठी गेले होते. 'Janjira fort information in marathi'
330 वर्षात या जंजिरा किल्ल्याने जवळपास 20 सिद्धी सत्ताधीश पाहिले आहेत.
महाराष्ट्राच्या समृद्ध समुद्रकिनाऱ्याजवळ काळाच्या तडाख्याला तोंड देत जंजिरा किल्ला हा अभेद्य पणे उभा आहे.
पंधराव्या शतकातील मूळ असलेला जंजिऱ्याचा किल्ला हा मलिक अंबर व आफ्रिकन सिद्धी यांच्या संरक्षणाखाली बांधला गेला. तसेच जंजिरा किल्ला मोक्याच्या बेटावर असल्याने तो अधिकच संरक्षित झाला.
अभ्यद्दपणा हा जंजिराच्या किल्ल्याचा एक महत्त्वाचा पैलू होय. 'Janjira fort information in marathi'
दगडी भिंती, बुरुज, गुंतागुंतीचे बोगदे अशी कल्पक आणि अनोखी वास्तुकला ही जंजिरा किल्ल्याला अजिंक्य ठेवण्यास कारणीभूत राहीली.
जंजिरा किल्ला ताब्यात घेण्यासाठी अनेक लढाया झाल्या, वेढे पडले; पण जंजिरा किल्ला हा अनेक हल्ल्याचा प्रतिकार करत शौर्याचे प्रतीक बनून आजरावर झाला.
जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरील किचकट कोरीव काम, सुंदर तोफा आणि एकंदरीतच अनेक संस्कृतीचा वारसा सांगणारा जंजिरा किल्ला हा मिश्रित वास्तूकलेचे उदाहरण आहे.
जंजिराच्या बाबतीत अनेक गूढ सांगितले जाते. बुरुज, झपाटलेले बोगदे, किल्ल्यातील दडलेला खजिना अशा अनेक दंतकथा सांगितल्या जातात.
भारताचा सागरी वारशाचा अभिमान उरात घेऊन उभ्या असलेल्या जंजिरा किल्ल्याला भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली आहे.
जंजिरा किल्ल्याचा इतिहास
अरबी भाषेतील जझीरा या मूळ शब्दापासून जंजिरा या शब्दाची उत्पत्ती झाली.
अलिबाग जवळ अरबी समुद्रात जमिनीपासून एका बेटावर 500 मीटर आत असलेला जंजिरा किल्ला हा पूर्वी एक सामान्य बेटाच्या रूपात होता.
या बेटावर पूर्वी कोळी लोकांची वस्ती होती. या वस्तीवरील लोकांना समुद्रातील लुटारू लोकांचा खूप त्रास व्हायला लागला. तेव्हा राम पाटील याने निजामशाहाकडून परवानगी मिळवून बेटाची पाटीलकी घेतली. कोळी लोकांनी लाकडा चे ओंडके उभे करून मेढेकोट तयार केला. पुढे हा मेढे कोटाचा पाटील झालेल्या राम पाटील यांनी निजामशहाचे आदेश झुंगारायला सुरुवात केली, तेव्हा राम पाटील याचा बंदोबस्त करण्यासाठी थानेदाराने पिरमखान यांची नेमणूक केली.
पिरम खानाने चतुराईने दारूच्या व्यापाराचे सोंग घेऊन राम पाटलाला या मेढेकोटात एक दिवस राहू देण्याची विनंती केली. त्यासाठी पिरमखनाने या पाटलाला दारूची पिपं भेट म्हणून दिली होती.
बेट पाहत असताना पिरमखानाने संपूर्ण बेटाचा अंदाज घेतला. रात्री पाटलाला पार्टी देऊन पाटलासह संपूर्ण कोळी लोक दारूच्या नशेत असताना पिरमखानाने कोळी लोकांची कत्तल केली आणि मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला.
पुढे बिऱ्हाणखानाची या मेढेकोटावर पिरमखानाच्या जाग्यावर नेमणूक झाल्यावर मेढेकोट मजबूत बांधण्यासाठी निजामशहाकडून त्याने परवानगी मिळवली, आणि भक्कम बांधकाम चालू केले.
1617 साली मलिक अंबर याला जंजिरा किल्ल्याची जहागिरी मिळाली. मलिक कंबर याला जंजिऱ्याचे मूळ पुरुष म्हटले जाते. 'Janjira fort information in marathi'
15 व्या शतकाच्या उत्तरार्धात अहमदनगरच्या निजामशासकाच्या काळात बांधलेला जंजिरा किल्ला हा, मलिक अंबरच्या काळात लष्करी रित्या मजबूत करण्यात आला.
मूळ आफ्रिकेतील असलेले हे सिद्धी अतिशय क्रूर होते. या सिद्धांना वजीर आणि नवाब म्हणून ओळखले जायचे. जंजिऱ्यावरील सिद्धांना 11 तोफांचा सलामीचा मान देखील होता असे सांगितले जाते.
मराठे, पोर्तुगीज, ब्रिटिशांसह अनेकांनी जंजिरा किल्ला घेण्या साठी प्रयत्न केले पण कोणीही यशस्वी होऊ शकले नाही.
चारही बाजूने समुद्रांनी वेढलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना देखील घेता आला नाही.
छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्या घेण्यासाठी मोहीम उघडली होती. जंजिरा किल्ला घेण्यासाठी संभाजी महाराजांनी समुद्रामध्ये सेतू तयार केला होता तसेच जंजिरा किल्ल्याच्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग देखील उभारला होता. जिंकत आलेली जंजिरा मोहीम ही औरंगजेबाच्या हल्ल्यामुळे संभाजी महाराजांना अर्ध्यावर सोडावी लागली होती.
संभाजी महाराजांच्या सांगण्यावरुन मोहिमेचा भाग म्हणून जंजिरामध्ये प्रवेश केलेले कोंडाजी फर्जंद यांना सिद्धीने पकडून ठार केले होते.
18 व्या शतकात भारतात ब्रिटिश सत्तेचा उदय झाल्यानंतर सिद्धींनी आसपासच्या प्रदेशावर ताबा ठेवत, आपले वर्चस्व कायम ठेवत ब्रिटिशांसोबत करार केला.
330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला हा जंजिरा किल्ला, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाला.
जंजिरा किल्ल्याचे वैशिष्ट्य
जंजिरा किल्ला एखाद्या आयलँड प्रमाणे समुद्रात वसलेला किल्ला आहे.
22 एकर क्षेत्रावरील 22 चौक्या असलेला जंजिरा किल्ला बांधण्यासाठी तब्बल 22 वर्षे लागले होते.
जंजिरा किल्ल्यावर पिण्यासाठी योग्य गोड्या पाण्याचे तलाव देखील आहेत.
जंजिरा हा अंडाकृती आकाराच्या खडकावर असून तो राजापुरी पासून जवळच आहे.
जंजिरा किल्ल्यावरील कलाल बांगडी ही तोफ सर्वात लांब पल्ल्याची विशेष तोफ आहे.
जंजिरा किल्ला समुद्रसपाटीपासून खूपच कमी म्हणजे फक्त 90 फूट उंचीवर बांधलेला किल्ला आहे.
जंजिरा किल्ला हा कोणालाही न जिंकता आलेला एकमेव अजिंक्य किल्ला आहे.
जंजिरा किल्ल्याला दर्याद्वार हे समुद्रात उघडणारा दरवाजा आहे. 'Janjira fort information in marathi'
जंजिऱ्याच्या बुरुजांमधील अंतर हे 90 फूट असून किल्ल्यांची तटबंदीची भिंत ही 40 फुटाची आहे.
छत्रपती संभाजी महाराज जंजिरा मोहीम
अभेद्य असणारा जंजिरा किल्ला हा समुद्रात असल्याने तो जिंकण्यासाठी अवघड किल्ला होता. त्याचमुळे तो अजिंक्य राहिला. पण इतिहासात एक अशी वेळ आली होती, जंजिऱ्याचा अजिंक्य पणा हा ढासळयला आला होता.
जंजिऱ्याचा सिद्धी हे रयतेला त्रास देत होते, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीवर हल्ला करून जंजिरा ताब्यात घेण्याचे ठरवले.
छत्रपतींचे विश्वासू कोंढाजी फर्जंद हे छत्रपतींवर नाराज आहेत, असे भासवून, सिद्धीला जाऊन मिळाले. तिथे ते जंजिऱ्यावरील दारूचे कोठार पेटवून, जंजिरा उध्वस्त करून मराठ्यांच्या ताब्यात आणण्याचा गुप्त मोहिमेवर स्वार होते. पण सिद्धीच्या जंजिरा किल्ल्यातील एका हेराला ही बातमी कळताच त्याने ती बातमी सिद्धीला कळवली, तेव्हा सिद्दीने कोंढाजी फर्जंद यांना ठार केले.
कोंढाजींची बातमी शंभूराजे यांना समजताच, त्यांनी जंजिरा घेण्यासाठी मोहीमेचे नेतृत्व स्वतःकडे घेतले.
रामायणातील रामसेतु प्रमाणे, जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात सेतू बांधला. सेतू बांधून शेकडो खलबतं घेऊन संभाजी महाराजांनी जंजिऱ्यावर आक्रमण केले.
बांधलेल्या सेतुवरून जंजिऱ्यावर तोफांचा मारा होत होता. किल्ल्यात असलेले सिद्धी खैरात सह त्याचे सहकारी हतबल झाले होते, ते आता संभाजी महाराजांना अडवू शकत नव्हते.
जंजिरा मराठ्यांच्या ताब्यात येणार तेव्हड्यात, औरंगजेबाने याची धसकी घेऊन, त्याने आपला सरदार हसन अली याला स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले.
हसन अली हा स्वराज्यात येऊन हौदास माजवत होता. त्यामुळे जिंकत आलेली जंजिऱ्याची मोहीम अर्ध्यावर सोडून छत्रपती संभाजी महाराजांना मोघलांच्या बंदोबस्त करण्यासाठी परत यावे लागले. 'Janjira fort information in marathi'
स्वराज्यावर आलेल्या औरंजेबाच्या संकटामुळे जंजिरा किल्ला मराठयांच्या ताब्यात येता येता राहिला.
कोंडाजी फर्जंद यांचा मृत्यू कसा झाला?
कोंडाजी बाबा फर्जंद हे छत्रपती संभाजी महाराजांच्या सांगण्यावरून जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी सिद्धीशी जाऊन मिळाले होते. त्यांनी सिद्धीशी मैत्री केली, विश्वास संपादित केला; आणि जंजीरा किल्ल्यात प्रवेश मिळवला.
या घटनेने कोंडाजीं शत्रूला जाऊन मिळाले म्हणून त्यांची बरीच बदनामी देखील झाली होती. पण खरंतर ते स्वराज्यासाठी एका मोहिमेचा भाग म्हणून सिद्धीला जाऊन मिळाले होते.
सिद्धी बरोबर मैत्री करून जंजिरा किल्ल्यावरील तोफखाना, दारुगोळा याची संपूर्ण माहिती काढून, दारूगोळा पेटवण्याची ही मोहीम त्यांनी हाती घेतली होती.
कोंढाजी यांची ही कटाची माहिती एका हेराने सिद्धीला सांगितली आणि कोंढाजी फर्जंद यांची मोहीम अयशस्वी झाली.
सिद्धीला खरी माहिती समजतात त्याने कोंडाजी फर्जंद यांना जंजिऱ्यावर कैद करून ठार केले.
जंजिऱ्याच्या सिद्धीचा मृत्य
जंजिरा किल्ल्याचा इतिहास पाहिला तर 18 व्या शतकात 1736 मध्ये पेशवा बाजीराव यांच्या सैन्याने, चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली सिद्धीच्या रेवस येथील छावणी तळावर हल्ला केला. 'Janjira fort information in marathi'
रेवस येथील या सिद्धीच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात जंजिराच्या सिद्धीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.
जंजिरा किल्यावर काय पाहाल
• कलाल बांगडी तोफ
जंजिरा किल्ल्याच्या तटावर तोफा ठेवण्यासाठी कमानी केलेल्या आहेत.
जंजिऱ्याच्या तटावर एकूण 572 तोफा होत्या. त्या तोफांचे वजन हे 25 टनांपेक्षा जास्त आहे.
जंजिऱ्यावरील तोफांमध्ये कलाल बांगडी ही सर्वात विशाल, शक्तिशाली असलेली लांब पल्ल्याची तोफ आहे.
• बोगदे
जंजिरा किल्ला अजिंक्य रहाण्यामागचे सर्वात शक्तिशाली वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावरील भूमिगत बोगदे.
पूर्वीच्या काळात गुप्त रस्ता म्हणून या बोगद्यांचा वापर होत असे. 'Janjira fort information in marathi'
जंजिरा किल्ल्यावरील एक बोगदा हा समुद्राच्या खाली 50 ते 60 फूट खालून राजापुरी गावाजवळ निघतो असे सांगितले जाते.
• गोड्या पाण्याचे तलाव
जंजिरा किल्ला हा अरबी समुद्रात असल्याने त्याला चारही बाजूने समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढलेले आहे.
जंजिरा किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जंजिरा किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी आणि तलाव आहे.
जंजिऱ्यात शाही तलाव नावाने प्रसिद्ध असलेल्या तलावात पिण्यायोग्य गोड पाणी असल्याने हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते.
जंजिरा किल्ल्यावरील इतर पाहण्यासारखे ठिकाणे
गायमुख तोफ
बालेकिल्ला
महादरवाजा
नदीचे गेट
दर्या द्वार
जंजिरा किल्ल्यास कसे जावे
जंजिरा किल्ला समुद्राने चारही बाजूने घेरला असल्याने हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक नेहमी गर्दी करत असतात.
विमान, रेल्वे किंवा वाहनाने तुम्ही जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सहज जाऊ शकता.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जंजिरा किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ असून, येथून किल्ल्याला जाण्यासाठी टॅक्सी उपलब्ध आहेत.
रोहा, पनवेल या जवळच्या रेल्वे स्थानकावरून किंवा मुरुड हे ठिकाण शहरांशी जोडलेले असल्याने जंजिरा किल्ल्याला जाण्यासाठी बस, खाजगी वाहने सहजपणे उपलब्ध आहेत.
वाहन तळापासून जंजिरा किल्ल्यात बोटीने जाऊन जंजिरा किल्ल्याच्या आत प्रवेश करावा लागतो.
जंजिरा किल्ला उघडण्याची व बंद होण्याची वेळ
जंजिरा किल्ला हा सकाळी 7 वाजता पर्यटकांसाठी खुला केला जातो व सायंकाळी 6 वाजता किल्ला बंद केला जातो.
फिरण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागणाऱ्या जंजिरा किल्ल्याला पहिली बोट ही सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास जाते. 'Janjira fort information in marathi'
FAQ
जंजिरा किल्ला कोणी बांधला?
- कोळी लोकांचा सरदार आणि जंजिरा बेटाचा पाटील रामराव पाटील यांनी जंजिरा बेटाची स्थापना केली. पुढे निजाम शहाच्या परवानगीने बुऱ्हाणखान यांनी जंजिरा किल्ला बांधला.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांना जिंकता न आलेला किल्ला कोणता?
- मुरुड-जंजिरा किल्ला
कोंडाजी फर्जंद यांना कोणी मारले?
- कोंडाजी फर्जंद यांना जंजिऱ्याच्या सिद्दींनी मारले.
जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
- रायगड
0 Comments