परभणी जिल्हा संपूर्ण माहिती | Parbhani district full information in marathi

परभणी जिल्हा संपूर्ण माहिती | Parbhani district full information in marathi

'Parbhani district full information in marathi'
'Parbhani district full information in marathi'


परभणी जिल्हा हा मराठा मराठवाड्यातील 8 जिल्यांपैकी एक जिल्हा होय. पूर्वी प्रभावती नगरी या नावाने ओळखला जाणारा परभणी जिल्हा हा थोर संतांच्या जन्माने, पदस्पर्शाने आणि कृपादृष्टीने पावन झालेला जिल्हा होय.

एकूण 9 तालुके असणाऱ्या परभणी जिल्ह्याच्या पूर्व दिशेला नांदेड, उत्तरेला हिंगोली, पश्चिमेला जालना/बीड आणि दक्षिणेला लातुर जिल्ह्याच्या सीमा आहेत. महाराष्ट्रातील सर्व मोक्याच्या ठिकाणांना परभणी जिल्हा पक्या रस्त्याने चांगल्या प्रकारे जोडलेला आहे.

6250.58 चौ.की.मी इतके क्षेत्रफळ असणाऱ्या परभणी जिल्ह्याच्या उत्तरेला अजिंठा डोंगररांगा तर दक्षिणेला बालाघाट डोंगररांगा आहेत. 'Parbhani district full information in marathi'

प्राचीन काळात परभणी हा जिल्हा प्रभावती म्हणून ओळखला जायचा. परभणी मध्ये असणाऱ्या प्रभावती देवीच्या मंदिरावरून हे नाव देण्यात आहे होते. प्रभावती चा अर्थ हा देवी पार्वती आणि देवी लक्ष्मी असा होतो.

मुंबई-परळी-काचीकुडा-बेंगलोर या शहरांना जोडणारा परभणी हे महत्त्वाचे स्थानक आहे.

क्षेत्रफळाने मोठ्या असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये 1 लोकसभा मतदारसंघ आणि 4 विधानसभा मतदारसंघ आणि 1 महानगरपालिका आहे.

भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आणि महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग पैकी एक असणारे औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग पूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये होते. पण नंतर परभणी जिल्ह्याच्या विभाजनाच्या नंतर औंढा हे ठिकाण हिंगोली जिल्ह्यामध्ये गेले.

परभणी जिल्हा हा मुख्यता संतांची भूमी म्हणून ओळखला जातो.

गंगाखेड येथे संत जनाबाईंचा जन्म झाला. जिल्ह्यातील बोरी हे ठिकाणी थोर गणिताचार्य भास्कराचार्य यांचे गाव असल्याचे सांगितले जाते. तसेच परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालूर हे ठिकाण थोर वाल्मिकी ऋषी यांचे हे गाव असल्याचे सांगितले जाते.

परभणी शहरांमध्ये महाराष्ट्र शासनाचे शासकीय कृषी विद्यापीठ देखील आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ या नावाने ते ओळखले जाते.

परभणी मधून राष्ट्रीय महामार्ग 222 गेला असल्यामुळे परभणी मधून तेलंगणा सह विविध राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील विविध प्रमुख शहरांमध्ये सहज वाहतूक करता येते.

परभणी जिल्हा हा महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला जिल्हा आहे. परभणी हे इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचे मिश्रण होय. समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि परंपरांनी मिळून परभणी जिल्हा हा एखाद्या रत्नाप्रमाणे नटलेला आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये दसरा, दिवाळी, नवरात्र उत्सव, बुद्ध पौर्णिमा, ईद असे सर्व धर्मीय सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. 'Parbhani district full information in marathi'

परभणी जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या जातीचा जमातींच्या लोकांचे वास्तव्य आहे. परभणी जिल्ह्यातील लोकांचा पोशाख हा मुख्यतः धोतर-टोपी पॅन्ट-शर्ट तर स्त्रिया साडी, लुगडे अशा प्रकारचा आहे. तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणामधील पोषकांमध्ये आधुनिकता दिसून येते.


परभणी जिल्ह्याचा इतिहास


परभणी शहरात असणाऱ्या प्रभावती देवीच्या मंदिरावरून प्राचीन काळी परभणी हा जिल्हा प्रभावती नगर म्हणून ओळखला जायचा.

परभणीला इतिहास प्राचीन काळापासून आहे. त्याची मुळे हे विविध राजवंश आणि साम्राज्याची घट्टपणे गुंफलेली आहेत.

परभणी जिल्ह्यावर आणि आजूबाजूच्या प्रदेशावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि बहमनी साम्राज्यांनी राज्य केलेल्या नोंदी आढळून येतात.

इतिहासाच्या नोंदीवरून असे सांगितले जाते की परभणी हा जिल्हा पूर्वी मगच साम्राज्यामध्ये येत होता. थोर सम्राट अशोक सम्राट यांनी देखील परभणी जिल्ह्यावर राज्य केल्याचे सांगितले जाते. 'Parbhani district full information in marathi'

प्राचीन काळात पांडुपत्र अर्जुन यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी हे शहर वसवले होते. याच पाथरी शहरात साईबाबा यांचा जन्म झाला.

परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा पूर्वी निजामशाहीत होता. निजामशाहीच्या अधिपत्याखाली असणारा परभणी जिल्हा नंतर हैदराबाद संस्थानांमध्ये गेला.

राज्य पुनर्गठनाच्या नंतर परभणी जिल्हा 1956 ला बॉम्बे म्हणजेच मुंबई राज्य मध्ये गेला; आणि 1960 ला महाराष्ट्राच्या निर्मिती नंतर परभणी जिल्हा हा महाराष्ट्र राज्यामध्ये विलीन झाला.


परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ व भौगोलिक स्थान


परभणी जिल्हा हा मराठवाड्यामध्ये येतो. परभणी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 6250.58 चौरस किलोमीटर इतके असून, परभणीच्या पूर्व दिशेला नांदेड, उत्तरेला हिंगोली, पश्चिमेला जालना/बीड आणि दक्षिणेला लातुर जिल्ह्याच्या सीमा आहेत. परभणीच्या ईशान्य दिशेला पैनगंगा व नैऋत्य दिशेला गोदावरी नदी वाहते.'Parbhani district full information in marathi'

परभणी जिल्ह्याच्या उत्तरेला अजिंठा डोंगररांगा तर दक्षिणेला बालाघाट डोंगररांगा आहेत. 



परभणी जिल्ह्यातील तालुके


• परभणी


• जिंतूर


• गंगाखेड


• सोनपेठ


• पाथरी


• मानवत


• पालम


• सेलू


• पूर्णा


परभणी जिल्ह्यातील नद्या


• गोदावरी


• दक्षिण पूर्णा


• करपरा


• दुधना


परभणी जिल्ह्यातील वनक्षेत्र-प्राणी-पक्षी


परभणी जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडत असल्याकारणाने वनस्पती वाढीसाठी, मुख्यतः जंगलासाठी लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा देखील कमी आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात एकूण वनक्षेत्र कमी म्हणजे दोन ते तीन टक्क्यांपर्यंत आहे. या वनांमध्ये मुख्यतः पानझडी वनस्पती आढळून येतात. 

नदी खोऱ्यातील जमीन लागवडीखाली आणण्यासाठी नदी परिसरातील झाडांची वृक्षतोड झालेली आढळून येते.

परभणी जिल्ह्यातील जंगलात मुख्यतः साग, पळस, खैर, बोरे, बाभूळ, वड, पिंपळ आशा वनस्पती आदळून येतात.

परभणी जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण कमी असल्याकारणाने प्राणी, पक्षी यांचा अभाव देखील आहे. कोल्हा, लांडगा, तरस, रानडुक्कर, हरीण, हे प्राणी आणि मोर, कबुतर, कावळा, चिमणी, सुतार, पाणकवडी, बदक असे पक्षी आढळून येतात.


परभणी जिल्ह्याचे हवामान


परभणी जिल्ह्याचे हवामान मुख्यता उष्ण व कोरड्या प्रकारचे आहे. 'Parbhani district full information in marathi'

परभणी जिल्ह्याचे तापमान हे उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये 40°c च्या वर जाते. तर हिवाळ्यामध्ये रात्री परभणी जिल्ह्याचे तापमान हे 10°C पर्यंत खाली येते.

परभणी जिल्ह्यात मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस काळ हा मुख्यता जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. परभणी चे पर्जन्यमान हे साधारण 82 सें मी इतके आहे. बालाघाट डोंगर भागात हे कमी जास्त होत असते.


परभणी जिल्ह्यातील शेती व्यवसाय


परभणी जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती व्यवसाय आहे. शेती व्यवसाय करूनच येथील लोक आपली उपजीविका भागवत असतात.

शेती व्यवसाय करत असताना येथील लोक आपल्या शेतजमिनीवर बाजरी, गहू, हरभरा, कापूस, सोयाबीन, भात, उडीद, मूग, तूर, ऊस आशा प्रकारांची पिके घेत असतात.


परभणी जिल्ह्यातील खाद्यपदार्थ

परभणी जिल्ह्यात कोणीही भेट दिल्यानंतर तिथल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही. 

पारंपरिक महाराष्ट्रीयण चवींच्या पदार्थासाठी परभणी जिल्हा ओळखला जातो.

परभणी जिल्हा हा तिथेल्या स्थानिक पदार्थांचे मेजवानीसाठी प्रसिद्ध आहे. ज्वारीपासून बनवलेले ब्रेड, मसालेदार करी सोबत सर्व्ह केलेल्या ज्वारीच्या भाकरी, बासुंदी, कालाकंद पेढा, खिचडी-भजी, कढी हे परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहेत. 'Parbhani district full information in marathi'


परभणीचा उरूस

परभणी शहरामध्ये तुराबूल हक पीर यांचा दर्गा आहे. या दर्ग्यामध्ये दरवर्षी 2 फेब्रुवारीला उरूस भरवला जातो.

दहा ते पंधरा दिवस चालणाऱ्या या उरुसामध्ये तुराबूल हक पीर दर्ग्याच्या बाजूला वेगवेगळ्या वस्तूंचे, पदार्थांचे दुकान लावले जातात. खेळणी, खाद्यपदार्थ, गृहोपयोगीवस्तू, मनोरंजनाच्या वस्तू असे अनेक दुकाने या उरुसात असतात.

10 ते 15 दिवस दररोज या उरुसांमध्ये वेगवेगळ्या कला, क्रीडा, कौशल्याचे प्रदर्शन भरवले जाते.

उरूसामध्ये येणारा प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या आवडीनुसार वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊन उरुसात आल्याचा आनंद लुटत असतो. 'Parbhani district full information in marathi'

परभणी जिल्ह्यातुन तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही लाखो  लोक या उरूसामध्ये येत असतात.

परभणी येथील उरूसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सर्व जाती-धर्माचे लोक मनात कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता या उरूस्वरूपी जत्रेत सहभागी होऊन आनंद घेत असतात.


परभणी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे


• तुराबूल हक पीर दर्गा


• मुदगलेश्वर मंदिर, मुदगल


• चारठाणा येथील ऐतिहासिक मंदिरे


• साईबाबा मंदिर, पाथरी


• मृत्युंजय मंदिर, परभणी


• नेमगिरी जैन मंदिर, जिंतूर


• नृसिंह मंदिर, पोखर्णी


• संत जनाबाई मंदिर गंगाखेड


• कृषी विद्यापीठ, परभणी



FAQ


परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत?

- 9


परभणी जिल्ह्यात किती विधानसभा आमदार आहेत?

- 4


तुराबूल हक पीर दर्गा कुठे आहे?

- परभणी शहर








Post a Comment

0 Comments