सिंधुदुर्ग किल्ला मराठी माहिती | Sindhudurg fort information in marathi

सिंधुदुर्ग किल्ला मराठी माहिती | Sindhudurg fort information in marathi

'Sindhudurg fort information in marathi'
'Sindhudurg fort information in marathi'


सिंधुदुर्ग किल्ला हा भारत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशात असलेला एक समृद्ध किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 17 व्या शतकात सिंधुदुर्ग जिल्ह्यात, अरबी समुदात सिंधुदुर्ग हा जलदुर्ग किल्ला बांधला. 1664 साली शिवरायांनी बांधलेला हा किल्ला प्रभावीपणे काळाच्या कसोटीवर आज देखील भक्कमपणे उभा आहे.

अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्व असणारा हा सिंधुदुर्ग किल्ला परकीय आक्रमणापासून बचाव करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून, प्रख्यात वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची रचना करून हा भव्य सागरी किल्ला उभारला. 'Sindhudurg fort information in marathi'

लॅटराइल दगडांचा वापर करून बांधकाम केलेल्या भिंती या धुप, भरती-ओहोटी चा प्रतिकार सहजपणे करू शकतात.

सागरी शत्रूंपासून स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी नौदलाचे प्रमुख तळ म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

सिंधुदुर्ग किल्ला मराठी माहिती | Sindhudurg fort information in marathi (sindhudurg fort marathi information | sindhudurg killa mahiti | sindhudurg fort history in marathi | sindhudurg fort)


शिवरायांच्या आरमारत सिंधुदुर्ग किल्ल्याने sindhudurg fort खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

अरबी समुद्रातील कुरटे बेटावर वसलेला हा सिंधुदुर्ग किल्ला एकूण 48 एकर क्षेत्रावर पसरलेला आहे. समुद्राच्या लाटांपासून किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी किल्ल्याभोवती साधारण 3 किलोमीटर अंतराची तटबंदी असून, किल्ल्यावर 52 बुरुज आणि 45 दगडी जिने आहेत. 

सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवकाळातील 30 ते 40 शौचालय हे तटबंदीच्या भिंतीमध्ये आहेत. त्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी करून घेतली होती. तर किल्ल्यात अनेक वास्तू, गोड्या पाण्याच्या विहिरी, मंदिर आहेत.

सिंधुदुर्गाची भव्य वास्तू ही मराठा साम्राज्यतील स्थापत्य कलेचा आदर्श पुरावाच आहे. 

कुरटे बेटावरील सिंधुदुर्ग या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार हे दिल्ली दरवाजा या नावाने ओळखले जाते. त्यातील सुंदर आणि किचकट असे कोरीवकाम, शिल्प हे खूपच मनमोहक दिसते.

अरबी समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मंदिर देखील आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर, शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी इसवी सन 1695 मध्ये बांधल्याचे इतिहास संशोधक सांगत असतात.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील सांस्कृतिक वारसाचे महत्व वाढवणारे, भगवान शिवाला समर्पित छत्रपती शिवरायांचे मंदिर हे गडावरील सर्वात महत्त्वाचे ठिकाण होय.

किल्ल्याची तटबंदी, बुरुज तसेच किल्ल्यामधील मंदिर, वास्तू, तलाव यांच्या बांधकामावरून शिवकाळातील म्हणजे स्वराज्यातील वास्तुशास्त्र आणि अभियांत्रिकी तंत्राचे कौशल्य कळते. 'Sindhudurg fort information in marathi'

सिंधुदुर्ग किल्ल्याचे पर्यटन वैभव आजही टिकून आहे. दरवर्षी लाखो पर्यटक किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.

तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती, नवरात्र, रामनवमी असे उत्सव साजरे केले जातात.

अथांग समुद्र, किल्ल्याचे स्थापत्य वैभव पाहण्यासाठी मालवण येथून बोटीने किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर किल्ल्याची भव्यता, समुद्र आणि तसंच चित्त थरारक समुद्राच्या लाटा पाहून मन प्रफुल्लित होऊन जाते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिरात आज देखील रामेश्वराची पालखी येते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर मराठ्यांचा 228 फुटांचा भगवा ध्वज होता. समुद्रात लांबू वरून तर्क ध्वज सहज नजरेस पडायचा. 1812 सालापर्यंत भगवा ध्वज तिथे डौलाने फडकत होता.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या एका नारळाच्या झाडाला पूर्वी वाय आकाराच्या दोन फांद्या होत्या. पण काही काळापूर्वी त्यावर वीज पडून त्यातील एक फांदी तुटली आहे.

350 वर्षापेक्षाही अधिक काळ भक्कमपणे सागरात उभ्या असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भारत शासनाने दिनांक 21 जून 2010 या दिवशी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. 'Sindhudurg fort information in marathi'


सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास sindhudurg fort history

छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख ठिकाण असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा मालवण भागामध्ये येतो.

भुईकोट आणि डोंगरी भागातून शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांकडे बरेच किल्ले होते, पण सागरी मार्गावरून येणाऱ्या शत्रूंच्या आक्रमणांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांकडे एकही सागरी किल्ला नव्हता. त्याचसाठी शिवरायांच्या दृष्टीतून सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती झाली.

जलदुर्ग बांधण्यासाठी शिवरायांनी जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली, आणि मालवण भागातील अरबी समुद्रात कुरटे बेटावर जागा निश्चित झाली. 

असे सांगितले जाते की ज्या कोळी लोकांनी या कुरटे बेटाचा शोध घेऊन सागरी किल्ल्यासाठी जागा निश्चित केली, त्या चार लोकांना शिवरायांनी बक्षीस म्हणून चार गावे दिली होती.

कभिन्न खडक असलेल्या या मालवन भागातील बेटावर 1664 साली छत्रपती शिवरायांच्या हस्ते पायाभरणी झाली.

अरबी समुद्रातील या जलदुर्गाची निर्मिती करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी प्रसिद्ध वास्तुविशारद शिवरायांचे विश्वासू हिरोजी इंदुलकर यांची नेमणूक केली होती.

 हिरोजी इंदुलकरांनी छत्रपतींच्या स्वप्नातील जलदुर्ग उभा करण्यासाठी 300 पोर्तुगीज आर्किटेक्ट तसेच 2500 ते 3000 कामगार सोबत घेऊन कामाला सुरुवात केली.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकाम चालू करण्याच्या आधी एका खडकावर गणेश मूर्ती, सूर्याकृती आणि चंद्राकृती कोरून त्या जागी पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची पायाभरणी केली. 'Sindhudurg fort information in marathi'

सिंधुदुर्ग किल्ला मालवण पासून साधारण अर्धा मैल आत समुद्रात बांधण्यात आला.

अथांग सागराच्या विळख्यात कुरटे बेटावर 48 एकर क्षेत्रावर पसरलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे तट हे साधारण 30 फूट उंच आणि 12 फूट रुंद अशा प्रकारे भक्कमपणे हिरोजी इंदुलकरांनी उभारले.

अनेक बुरुज असलेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागाला अथांग समुद्र पसरलेला आहे. 

इतिहासकारांच्या मते, विविध नोंदणीचा अभ्यासानुसार सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागाचे तट मजबूत आणि भक्कम करण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम भागाच्या तटाच्या पायामध्ये साधारण 500 खंडी सीसे ओतण्यात आले होते. 

पश्चिम आणि दक्षिण भागातील तटाच्या बांधणीसाठी सुमारे 80 हजार होन इतका खर्च आला होता.

सिंधुदुर्ग किल्ला उभारण्यासाठी एकूण 1 कोटी होन इतका खर्च आला होता.

Sindhudurg fort सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारण 3 वर्ष लागले होते. म्हणजे किल्ल्याचे बांधकाम हे 1664 मध्ये चालू होऊन 1667 मध्ये पूर्ण झाले.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली गोष्ट म्हणजे, साक्षात शिवछत्रपतींच्या हाताचे व पायाचे ठसे या किल्ल्यावर उमटलेले आहेत.

अनेक लढाया पाहिलेला हा सिंधुदुर्ग किल्ला मराठ्यांच्या कित्येक वर्षे मराठयांच्या ताब्यात होता.

1713 मध्ये करवीर संस्थानाच्या ताब्यात असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला, इंग्रजांनी ताब्यात घेऊन त्याला फोर्ट ऑगस्ट असे नाव दिले. 'Sindhudurg fort information in marathi'

इतिहासातील अस्पष्ट पुराव्यानुसार 1765 मध्ये सिंधुदुर्ग किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला; आणि आता तो भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे आहे.


छत्रपती शिवजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचा उद्देश काय होता?

स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना सागरी किल्ले महत्त्वाचे होते.

स्वराज्यचा विस्तार करत असताना परकीय आक्रमण आपल्यावर होऊ नये आणि त्यापासून बचाव करण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी झाली.

तसेच पूर्वी समुद्रीमार्गाने बराच व्यापार होत असे, या व्यापारावर नियंत्रण आणि वचक ठेवून, कर वसुली हा उद्देशही होता.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि भवितव्यासाठी आरमाराची निर्मिती हा मुख्य उद्देश सिंधुदुर्ग किल्ला उभारण्यामागे छत्रपती शिवरायांचा दूरदृष्टीकोण होता.


सिंधुदुर्ग किल्ल्याचे वैशिष्ट्य sindhudurg fort in marathi


सिंधुदुर्ग हा जलदुर्ग म्हणजेच सागरी किल्ला आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी साधारण 3 किलोमीटर लांबीची आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याला एकूण 52 बुरुज आहेत.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायभरणीत शिसे आणि लोखंड वापरले आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यांच्या तटबंदीमध्ये 30 ते 40 शौचालय आहेत.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या हाताचे व पायाचे ठसे आहेत. 'Sindhudurg fort information in marathi'

सिंधुदुर्ग किल्ला शिवकाळात आरमाराचे प्रमुख ठिकाण होते.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.

सिंधुदुर्ग किल्ल्याचे मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यामधील भूमिगत बोगदे. आणीबाणीच्या वेळी सुटकेसाठी या बोगद्यांची निर्मिती केली होती.



सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे


• महादरवाजा

सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा हा किल्ल्याच्या पूर्व दिशेला आहे.

दुरून भिंती समान दिसणारे हे प्रवेशद्वारापर्यंत एक खिंडीतून जाऊन महादरवाजामधून किल्ल्यात प्रवेश करता येतो.

सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणजे महाद्वार उभे करण्यासाठी मुख्यता उंबराचे आणि सगवणाचे लाकूड वापरण्यात आले आहेत. 

उंबराचे लाकूड हे दीर्घकाळ टिकण्यासाठी उत्तम असते. त्यामुळे प्रवेशद्वारासाठी उंबराचे लाकूड वापरण्यात आले आहे.


• छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संकुलामध्ये स्वराज्याचे संस्थापक सिंधुदुर्ग किल्ल्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित एक मंदिर आहे.  'Sindhudurg fort information in marathi'

शिवपुत्र राजाराम महाराजांनी या मंदिराची निर्मिती केली आहे.

या मंदिराला मोठे धार्मिक महत्त्व असून हे मंदिर ऐतिहासिक वास्तू असलेले महत्त्वाचे मंदिर आहे.

13 बाय 7 असे क्षेत्रफळ असलेले हे मंदिर 1695 मध्ये बांधण्यात आले. 

या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित मंदिराला शिवराजेश्वर मंदिर म्हणून देखील संबोधले जाते.


• ठसे

सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये प्रवेशद्वारामधून प्रवेश केल्यानंतर महाद्वाराच्या उजव्या बाजूला भिंतीमध्ये दोन देवळे आहेत.

त्यातील दोन्ही बाजूंच्या देवळ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे आहेत असे सांगितले जाते. किल्ल्याला भेट दिल्यानंतर आपल्या ते प्रत्यक्ष पाहायलाही मिळतात.


• गोड्या पाण्याची विहिरी

सिंधुदुर्ग किल्ला समुद्रामध्ये असल्याकारणाने, सिंधुदुर्ग किल्ल्याला खाऱ्या पाण्याने वेढले आहे. पण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संकुलामध्ये 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.

त्या विहिरींना साखर विहीर, दूध विहीर, दही विहीर म्हणून ओळखले जाते.


• शिव मंदिर

सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये शिवकाळात स्थापन केलेले एक शिवमंदिर आहे.

भगवान शंकराला समर्पित या मंदिरामध्ये शिवलिंग आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिव मंदिरात शिवलिंगा सोबतच एक भुयार देखील आहे.

शिव मंदिरातील भुयार हे बारा किलोमीटर लांब असल्याचे सांगितले जाते. हे भुयार बाहेर एका गावात निघते.

किल्ल्यावर शत्रूंचे आक्रमण झाले आणि किल्ला शत्रूंच्या ताब्यात गेला तर, किल्ल्यावरील स्त्रिया, लहान मुले आणि मावळ्यांना सुखरूप पणे या गुप्त मार्गाने गावांमध्ये जाता येईल या दूरदृष्टीतुन शिवरायांनी हा भुयारी मार्ग खोदुन घेतल्याचे सांगितले जाते. 'Sindhudurg fort information in marathi'


• बुरुज

पूर्वी किल्ल्याची निर्मिती करत असताना शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किल्ल्यांवर बुरुज बांधले जायचे.

सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती करत असताना सिंधुदुर्ग किल्ल्यांच्या तटबंदींवर 52 बुरुज उभारण्यात आले होते. हे बुरुज आजही आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहायला मिळतात.

रणनीती दृष्ट्या टेहाळणी करण्यासाठी व समुद्रातील शत्रूंची जहाजे हेरण्यासाठी या बुरुजांचा वापर केला जात असे.

या बुरुजांवरून आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आजूबाजूचा नैसर्गिक परिसर आणि समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा अनुभवता येतात.


• सभागृह

सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजाला समर्थित मंदिराच्या थोडे समोर गेल्यानंतर आपल्याला किल्ल्यामध्ये एक सभागृह पाहायला मिळते.

किल्ल्यातील हे सभागृह कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी 1907 मध्ये बांधले होते.


• हनुमान मंदिर

सिंधुदुर्ग किल्ल्यावर, किल्ल्याच्या पूर्व दिशेला हनुमानाचे मंदिर आहे.

सिंधुदुर्ग वर येणाऱ्या पर्यटक आणि भक्तांसाठी हे मंदिर आकर्षित करणारे प्रार्थनास्थळ आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील या हनुमान मंदिरापासून पर्यटकांना समुद्राचे विहंगम दृश्य आणि शांत वातावरण अनुभवता येते.


• इतर मंदिरे

भगवती देवी मंदिर

गणेश मंदिर

महापुरुष मंदिर

जरी-मरी मंदिर


सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्याचा मार्ग


सिंधुदुर्ग किल्ला गोवा राज्याच्या उत्तरेस, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. 'Sindhudurg fort information in marathi'

मुंबईपासून 450 अंतर पार करून सिंधुदुर्ग किल्ल्याला पोहोचता येते.

कोकण रेल्वे मार्गाने तसेच पुणे रेल्वे स्थानकावरून मांडवी एक्स्प्रेस गाडीने सिंधुदुर्ग स्थानकावर उतरून सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी जाता येते. 

कणकवली, सावंतवाडी, कुंडल येथे उतरून देखील सिंधुदुर्ग किल्ल्याला जात येते.

पर्यटक हे खाजगी वाहन घेऊन देखील सिंधुदुर्ग किल्ल्याला जाऊ शकतात.



वारंवार विचारले जाणारे प्रश्न


सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी किती खर्च आला होता?

- 1 कोटी होन


सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला?

- छत्रपती शिवाजी महाराज/ हिरोजी इंदुलकर


सिंधुदुर्ग हा जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे?

- सिंधुदुर्ग


सिंधुदुर्ग किल्ला केव्हा बांधण्यात आला?

- इ.स. 1664


सिंधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रातील कोणत्या बेटावर आहे?

- कुरटे बेटावर








Post a Comment

0 Comments