UPSC Result 2023 | यूपीएससी त महाराष्ट्राचं घवघवीत यश

UPSC Result 2023 | यूपीएससी त महाराष्ट्राचं घवघवीत यश

'Upsc result 2023'
'Upsc result 2023'


केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2022 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल 'Upsc result 2023' मंगळवारी जाहीर केला आहे. त्यात देशातील एकूण 933 उमेदवार तर महाराष्ट्रातील 70 पेक्षा अधिक उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यूपीएससीच्या 2022 या परीक्षेत महाराष्ट्रातून ठाण्याची काश्मिरा संखे ही प्रथम आली असून, तिने देशात 25 वा क्रमांक प्राप्त केला आहे.

यूपीएससी द्वारे झालेल्या निवडीत एकूण 933 उमेदवारांपैकी 613 पुरुष तर 320 महिलांचा समावेश आहे. 2022 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने Mains Exam घेतली होती. नंतर उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती घेऊन, मंगळवारी निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. 

खलील प्रमाणे आरक्षण निहाय उमेदवार पात्र झाले आहेत. 

• OPEN - 345

• EWS - 99

• OBC - 263

• SC - 154

• ST - 72

निवड झालेल्या उमेदवारांमध्ये 41 दिव्यांगांचा देखील समावेश आहे.


UPSC long Form

Union Public Service Commission


UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या निकालात महाराष्ट्रातील 7 उमेदवार हे देशातील पहिल्या 100 उमेदवारांमध्ये आहेत.


हे आहेत टॉप 100 मधील उमेदवार

1. कश्मिरा संखे (25)

2. अंकिता पुवार (28)

3. रूचा कुलकर्णी (54)

4. आदिती वषर्णे (57)

5. दिक्षिता जोशी (58)

6. श्री मालिये़ (60)

7. वसंत दाभोळकर (76)


महाराष्ट्र मधून UPSC द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी

  • कश्मिरा संखे (25)
  • अंकिता पुवार (28)
  • रूचा कुलकर्णी (54)
  • आदिती वषर्णे (57)
  • दिक्षिता जोशी (58)
  • श्री मालिये़ (60)
  • वसंत दाभोळकर (76)
  • प्रतिक जरड (112)
  • जान्हवी साठे (127)
  • गौरव कायंडेपाटील (146)
  • ऋषिकेश शिंदे (183)
  • अर्पिता ठुबे (214)
  • सोहम मनधरे (218)
  • दिव्या गुंडे (265)
  • तेजस अग्निहोत्री (266)
  • अमर राऊत (277)
  • अभिषेक दुधाळ (278)
  • श्रुतिषा पाताडे (281)
  • स्वप्निल पवार (287)
  • हर्ष मंडलिकहे (310)
  • हिमांषु सामंत (358)
  • अनिकेत हिरडे (349)
  • संकेत गरूड (370)
  • ओमकार गुंडगे (380)
  • परमानंद दराडे (393)
  • मंगेश खिल्लारी (396)
  • रेवैया डोंगरे (410)
  • सागर खरडे (445)
  • पल्लवी सांगळे (452)
  • आशिष पाटील (463)
  • अभिजित पाटील (470)
  • शुभाली परिहार (473)
  • शशिकांत नरवडे (493)
  • रोहित करदम (517)
  • शुभांगी केकण (530)
  • प्रशांत डगळे (535)
  • लोकेश पाटील (552)
  • ऋतविक कोत्ते (558)
  • प्रतिक्षा कदम (560)
  • मानसी साकोरे (563)
  • सैय्यद मोहमद हुसेन (570)
  • पराग सारस्वत (580)
  • अमित उंदिरवडे (581) 
  • श्रुति कोकाटे (608)
  • अनुराग घुगे (624)
  • अक्षय नेरळे (635)
  • प्रतिक कोरडे (638)
  • करण मोरे (648)
  • शिवम बुरघाटे (657)
  • राहुल अतराम (663)
  • गणपत यादव (665)
  • केतकी बोरकरहे (666)
  • प्रथम प्रधान (670)
  • सुमेध जाधव (687)
  • सागर देठे (691)
  • शिवहर मोरे (693)
  • स्वप्निल डोंगरे (707)
  • दिपक कटवा (717)
  • राजश्री देशमुख (719)

  • महारुद्र भोर (750)
  • अकिंत पाटील (762)
  • विक्रम अहिरवार (790)
  • विवेक सोनवणे (792)
  • स्वप्निल सैदाने (799)
  • सौरभ अहिरवार (803)
  • गौरव अहिरवार (828)
  • अभिजय पगारे (844)
  • तुषार पवार (861)
  • दयानंद तेंडोलकर (902)
  • वैषाली धांडे (908)


या पदावर होतील उमेदवार रुजू

• IAS - 180

• IPS - 200

• ISF - 38

• केंद्रीय सेवा गट अ - 473

• केंद्रीय सेवा गट ब - 131


UPSC Result 2023 महाराष्ट्रात प्रथम

● काश्मीरा संखे kashmira sankhe

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2020 या परीक्षेचा 'Upsc result 2023' निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यात ठाण्याची काश्मिरा संखे हिने महाराष्ट्रातून 25 वी रँक घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे. काश्मिरा ही डेंटिस्ट डॉक्टर असून तिचे क्लिनिक देखील आहे. काश्मिरा ही चाणक्य मंडळाची विद्यार्थिनी असून तिने आपला व्यवसाय सांभाळून यूपीएससी मध्ये बाजी मारली आहे.

'Upsc result 2023'
काश्मिरा संखे



माध्यमांशी बोलताना काश्मिरा, 'मी पास झाले आहे' अजूनही मला विश्वास बसत नाही; असे ती म्हणाली. तर पुढे बोलताना हे सर्व यश माझ्या आई-वडिलांचे असून ,आता मला IAS च्या माध्यमातून देशसेवा करायची आहे, असे तिने सांगितले.

हे नक्की वाचा 👉 तलाठी भरती


UPSC Result 2023 देशात प्रथम

● इशिता किशोर ishita kishore

'Upsc result 2023' मध्ये इशिता किशोर ही प्रथम आली आहे. तिच्या या दैदिप्यमान कामगिरी बद्दल सर्व स्तरावरून तिचे कौतुक होत आहे.

'Upsc result 2023'
इशिता किशोर



 
इशिता ही दिल्ली विद्यापीठाची Student असून तिचे शिक्षण हे अर्थशास्त्रात (कॉमर्स) झाले आहे. सुरुवातीपासून इशिता किशोर ही हुशार असल्याचे तिने सांगितले. कठोर परिश्रमातून हे यश मी संपादित केल्याचे म्हणत, मला यशाची संपूर्ण अपेक्षा होती; पण मी देशात प्रथम येईल असे मला वाटले नव्हते. हे माझ्यासाठी नक्कीच धक्कादायक असल्याचे तिने म्हटले.


UPSC यूपीएससी

UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग. ही भारतातील एक घटनात्मक संस्था आहे. जी नागरी सेवा परीक्षा आयोजित करण्यासाठी आणि सरकारमधील विविध प्रतिष्ठित पदांसाठी उमेदवार निवडण्यासाठी जबाबदार असते. UPSC नागरी सेवा परीक्षा (CSE), भारतीय वन सेवा परीक्षा (IFSE), अभियांत्रिकी सेवा परीक्षा (ESE), एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा (CMSE) आणि इतर अनेक परीक्षांचे आयोजन करते.

नागरी सेवा परीक्षा ही UPSC द्वारे घेतली जाणारी सर्वात प्रमुख परीक्षा आहे. ही एक देशव्यापी स्पर्धात्मक परीक्षा आहे जी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि इतर केंद्रीय सेवांसह भारत सरकारमधील सर्वोच्च प्रशासकीय पदांसाठी उमेदवारांची निवड करते. CSE मध्ये तीन टप्पे असतात: प्राथमिक परीक्षा (उद्दिष्ट प्रकार), मुख्य परीक्षा (लिखित) आणि व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत). 'Upsc result 2023'

विविध प्रशासकीय भूमिकांमध्ये काम करण्यासाठी उच्च पात्र आणि सक्षम व्यक्तींची नियुक्ती सुनिश्चित करण्यासाठी UPSC कठोर निवड प्रक्रियेचे अनुसरण करते. परीक्षा आयोजित करण्यात आणि निवड प्रक्रियेची अखंडता राखण्यासाठी आयोग निःपक्षपातीपणा आणि पारदर्शकतेसाठी ओळखला जातो. UPSC परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असतात आणि उमेदवारांना या प्रतिष्ठित पदांसाठी पात्र होण्यासाठी व्यापक तयारी करावी लागते.

UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या यशस्वी उमेदवारांची केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये विविध पदांवर नियुक्ती केली जाते. ही पदे देशाच्या शासन आणि विकासात योगदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आणि संधी पात्र उमेदवारांना देतात.


'Upsc result 2023' बद्दल अधिक माहिती हवी असेल तर upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Post a Comment

0 Comments