हिंगोली जिल्हा संपूर्ण माहिती | Hingoli district full information in marathi
![]() |
'Hingoli district full information in marathi' |
हिंगोली जिल्हा हा मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी एक असलेला जिल्हा, मराठवाड्याच्या उत्तर दिशेला आहे. 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन 5 तालुके असलेला हिंगोली जिल्हा हा नव्याने अस्तित्वात आलेला जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय हे हिंगोली शहरात आहे.
कयाधू नदीच्या काठी वसलेले हिंगोली हे शहर समुद्रसपाटीपासून 457 मीटर उंचीवर आहे.
1999 मध्ये अस्तित्वात आलेल्या हिंगोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 4526 चौरस किलोमीटर आहे. हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेला वाशीम व यवतमाळ जिल्हा, पश्चिम दिशेला परभणी जिल्हा आणि आग्नेय दिशेला नांदेड जिल्हा आहे. औरंगाबाद विभागात येणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील साक्षरतेचा दर हा 76% असून, जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे 942 इतके आहे.
ज्वारी, कापूस ही हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पिके असून, जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारुड, पोतराज ह्या लोककलेसाठी हिंगोली जिल्हा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.
10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या हिंगोली जिल्ह्यात 1 लोकसभा मतदार संघ असून 3 विधानसभा आमदार आहेत.
हिंगोली पासून 19 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध मसाई माता मंदिर हे ठिकाण वारंगा मसाई येथे आहे. तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या मसाई देवीच्या मंदिरात पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मोठी जत्रा भरत असते.
हिंगोलीमधील प्रसिध्द सार्वजनिक दसरा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दसरा उत्सवाला दीडशे ते दोनशे वर्षांची परंपरा आहे.
कुरुंदा येथील टोकाई डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टोकाई मातेचे मंदिर हे देखील महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.
हिंगोली शहराच्या ईशान्येकडे सिरसम बुद्रुक ही प्रसिद्ध मोठी बाजारपेठ आहे. 'Hingoli district full information in marathi'
हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर दिशेला अजिंठ्याच्या डोंगररांगा पसरलेल्या असून त्यांना जिंतूर हिंगोलीच्या टेकड्या या नावाने ओळखले जाते. या अजिंठाच्या टेकड्या वरील काही भाग सपाट तर काही गोलाकार टेकड्यांसारखा आहे. या टेकड्यावरील सपाट भागावर गाव, वाड्या, खेडे, तांडे वसलेले असून, या अजिंठाच्या डोंगरावर निकृष्ट प्रकारचे गवत, झुडपे आणि झाडे आहेत.
हिंगोली जिल्ह्यात 100 पेक्षाही जास्त लघुउद्योग असून, जिल्ह्यात साखर कारखाने, सूतगिरण्या तसेच तेल शुद्धीकरण कारखाने देखील आहेत.
हिंगोली जिल्ह्याचा इतिहास
हिंगोलीचा इतिहास हा प्राचीन काळातील आहे. प्राचीन काळात हिंगोलीला विंगुली, लिंगुली, विंग मुल्ह या नावांनी ओळखले जायचे.
इसवी सन 490 च्या आसपास वाकाटक राजा सर्वसेन याच्या नरसी या परगण्यातील हिंगोली हे एक गाव होते.
वाकाटकांच्या नंतर राष्ट्रकूट, चालुक्य, यादवांनी देखील या परिसरावर राज्य केले.
औंढा नागनाथ या पवित्र जोतिर्लिंगास राष्ट्रकूट काळात आमर्दकक्षेत्र या नावाने ओळखले जायचे. असा उल्लेख देखील राष्ट्रकुटांच्या ताम्रपटात आहे.
मुघल, आदिलशाही, निजामशाही यांनी देखील हिंगोली प्रदेशावर राज्य केले. याच काळात झालेल्या हल्ल्यामुळे औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या हेमाडपंथी मंदिराची तोडफोड झाली असावी, असे इतिहासकारांकडून सांगितले जाते.
हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता. 'Hingoli district full information in marathi'
निजाम राजवटीच्या अधिपत्याखाली असलेला हिंगोली जिल्हा हा 1999 च्या अगोदर परभणी जिल्ह्यातील एक तालुका होता.
हिंगोली हे पूर्वी वऱ्हाड या इंग्रजशासीत विभागाच्या सीमेवर असल्याने हिंगोली शहर हे निजामाचे लष्करी तळ होते.
निकामांचे लष्करी असलेल्या हिंगोलीतून निकामांचे दवाखाने चालत असत. हिंगोली हे शहर निजाम राजवटीतील एक महत्त्वाचे शहर होते.
हिंगोली जिल्हा आणि जिल्ह्यातील लोक ही मोठ्या लढायांना देखील सामोरे गेले आहेत.
मराठे आणि टिपू सुलतान यांच्यातील 1803 चे युद्ध तसेच नागपूरकरांचे भोसल्यांसोबतचे 1857 चे युद्ध, ही महत्त्वाचे युद्ध हिंगोलीने बघितले आहेत.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याच्यानंतर 1956 मध्ये मराठवाडा मुंबई राज्यात विलीन झाला. त्याच्यानंतर 1960 मध्ये हिंगोली परभणी जिल्ह्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला.
इतिहास कालीन रिसाला, तोपखाना, पेन्शनपुरा, फल्टन, सदर बाजार ही हिंगोली प्रांतातील नावं आज देखील कालबाह्य झालेले नाहीत.
हिंगोली जिल्ह्यातील तालुके
• हिंगोली
• सेनगाव
• वसमत
• कळमनुरी
• औंढा नागनाथ
हिंगोली जिल्ह्यातील तापमान
हिंगोली जिल्हा पठारावर वसलेला जिल्हा असल्यामुळे येथील वातावरण नेहमी उष्ण, कोरडे व विषम प्रकारचे असते.
उन्हाळ्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचे तापमान हे 41° सेल्सिअस ते 42°c पर्यंत जाते. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाळा जाणवतो. 'Hingoli district full information in marathi'
उन्हाळ्यामध्ये 42℃ पर्यंत जाणारे तापमान हे हिवाळ्यामध्ये खूपच कमी होऊन ते तापमान 5° सेल्सिअस पर्यंत खाली येऊन जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढते.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोसमी वाऱ्यामुळे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण हे 95 सेंमी पर्यंत असते. याव्यतिरिक्त ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र परतीचा पाऊस पडतो.
हिंगोली जिल्ह्यातील वनस्पती-प्राणी-पक्षी
हिंगोली जिल्ह्याच्या सर्वत्र भागामध्ये विरळ प्रकारचे वनक्षेत्र आढळून येते. 'Hingoli district full information in marathi'
हिंगोली जिल्ह्यात घनदाट जंगल म्हणावं तसं नाही.
पाण्याच्या कमतरतेमुळे जिल्ह्यात सर्वत्र झाडांची कमतरता दिसून येते. डोंगर भागात काटेरी झुडपे, पानझडी प्रकारातील झाडे, पिंपळ, वड, कडुलिंब, बाभूळ, खैर, साग, आपटा आशा ओरकरची झाडे प्रामुख्याने आढळून येतात.
हिंगोली जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण कमी असल्यामुळे येथे जंगली प्राण्यांची कमतरता देखील जाणवते.
हिंगोली जिल्ह्यातील विरळ असलेल्या जंगलात आणि रानात हरीण, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा, बिबट्या, तरस, रोही हे प्राणी आपले वास्तव्य टिकवून आहेत. तर कबुतर, मोर, कावळा, काळे पांढरे तितर, बहिरीससाना हे पक्षी आढळतात.
हिंगोली जिल्ह्यातील शेती व्यवसाय
हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय हा शेती हाच आहे.
जिल्ह्यातील 85% लोक हे शेती करूनच आपली उपजीविका भागवत असतात.
शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन, ज्वारी आणि कापूस हे प्रमुख घेतली जाणारी पिके आहेत. 'Hingoli district full information in marathi'
उडीद, मूग, तूर, बाजरी, मका, भुईमूग ही पिके देखील हिंगोली जिल्ह्यात तुरळक प्रमाणात घेतली जातात.
हिंगोली जिल्ह्यातील दळणवळण
हिंगोली जिल्ह्यातील वाहतुक ही राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा महामार्गांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना, शहरांना जोडलेली आहे.
हिंगोली हे शहर रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीचे इतर शहरांना उत्तम प्रकारे जोडलेले आहे.
हिंगोली पासून 80 किलोमीटर अंतरावर असलेले नांदेड येथील विमानतळावरून मुंबई, हैद्राबाद, दिल्ली या ठिकाणी नियमितपणे विमान सेवा चालू असते.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात हिंगोली येथील डेक्कन रेल्वे स्थानक येत असून, हिंगोली स्टेशन वरून नांदेड, छत्रपती संभाजीनगर, हैद्राबाद, कोल्हापूर, नागपूर, अजमेर, दिल्ली, जयपूर, इंदोर, तिरुपती या ठिकाणी रेल्वे जात असतात.
हिंगोली रेल्वे स्थानक हे दक्षिण मध्य रेल्वेच्या पूर्णा-अकोला या ब्रॉड गेजवर येते.
हे देखील वाचा 👉 परभणी जिल्हा
हिंगोलीचे लोकजीवन
हिंगोलीची जिल्ह्यातील प्रमुख बोलीभाषा ही मराठी असून जिल्ह्यातील सर्व शासकीय, लोकांचे दैनंदिन व्यवहार हे मराठी भाषेतूनच होतात.
हिंगोली जिल्ह्यात मारवाडी, उर्दू, तेलगू आशा भाषा देखील बोलल्या जातात. तसेच हिंगोली जिल्हा हा विदर्भाला लागून असल्याने जिल्ह्यात वऱ्हाडी भाषा देखील बोलली जाते.
हिंगोली जिल्ह्यातील पुरुष हे शर्ट-पॅन्ट, धोतर-खमीस तर स्त्रिया ह्या साडी, लुगडी आणि पंजाबी पोशाख परिधान करतात.
हिंगोली शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात दसरा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला 150 वर्षाचा समृद्ध वारसा आहे. या दरम्यान शहरातील रामलीला या मैदानावर मोठी जत्रा भरवली जाते. 'Hingoli district full information in marathi'
हिंगोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
औंढा नागनाथ मंदिर
औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे.
औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेला आठवे ज्योतिर्लिंग आहे.
औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते. तसेच श्रावण महिन्यामध्ये भावीक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात.
महाराष्ट्रसह भारतभरातुन औंढा नागनाथ येथे भेट देण्यासाठी भाविक भक्त येतात.
औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे असून, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये, जमिनीच्या खाली महादेवाचे प्रसन्न शिवलिंग आहे.
या मंदिराच्या आवारात संत नामदेव महाराजांचे मंदिर देखील आहे. 'Hingoli district full information in marathi'
औंढा नागनाथ हे शहर हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असून, हिंगोली पासून 24 किलोमीटर अंतरावर आहे.
संत नामदेव महाराज जन्मस्थान, नरसी
थोर संत नामदेव महाराज यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे झाला. इसवी सन 1270 नामदेवांचा जन्म झाला.
नरसी हे गाव कयाधु नदीच्या तीरावर वसलेले आहे.
एकादशीला आणि संत नामदेव महाराज यांच्या जन्म दिवसाला भाविक भक्त मोठ्या संख्येने नरसीमध्ये नामदेवांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
8000 ते 10000 लोकसंख्या असलेल्या नरसी गावात दरवर्षी मोठी यात्रा भरत असते.
महाराष्ट्र शासनाने नरसी ला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून नामदेव महाराज यांच्या मंदिर परिसर विकसित केला आहे.
तसेच नामदेव महाराज यांचा शीख धर्मावर प्रभाव असल्याने काही शीख पंथीय लोकांनी देखील नरसी येथील नामदेवांच्या मंदिर विकासाचा वाटा उचलला आहे.
मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर
औंढा नागनाथ तालुक्यातील शिराद शहापूर या गावात जैन धर्मियांचे मल्लिनाथ जैन मंदिर आहे.
मल्लिनाथ दिगंबर हे जैन मंदिर 300 वर्षे जुने असल्याचे जैन लोक सांगत असतात.
जैन दिगंबर मंदिर हे हिंगोली शहरापासून साधारण 36 किलोमीटर अंतरावर असून, भारतभरातून लाखो तीर्थयात्री येथे येत असतात.
सिद्धेश्वर धरण
दक्षिण पूर्णा नदीवर औंढा नागनाथ तालुक्यात सिद्धेश्वर धरण बांधण्यात आलेले आहे.
सिद्धेश्वर धरण परिसर हा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. यासाठी सुमारे 1 ते 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. 'Hingoli district full information in marathi'
हिंगोली जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटक पर्यटनासाठी सिद्धेश्वर धरण आणि परिसरात सहलीसाठी येऊन पर्यटनाचा आनंद घेत असतात.
हिंगोली जिल्ह्यातील धार्मिक स्थळे
• संगमेश्वर महादेव मंदिर
• संत तुकामाई जन्मस्थान
• मसाई देवी, वारंगा
• कानिफनाथ गड, खैरी
• ग्रामदैवत जटाशंकर
• तुळजादेवी, घाटा
• चिंतामणी गणपती मंदिर
FAQ
हिंगोली जिल्हा केव्हा अस्तित्वात आला?
- 1 मे 1999 रोजी
औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
- हिंगोली
0 Comments