लोहगड किल्ला मराठी माहिती | Lohagad fort information in marathi
![]() |
"Lohagad fort information in marathi" |
लोहगड किल्ला हा सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक किल्ला आहे. लोहगड किल्ला पुणे शहरापासून सुमारे 52 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या भव्य किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.
लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या डोंगर रांगेत विस्तारलेल्या या लोहगड किल्ल्याची उंची ही जवळपास 3409/ तीन हजार चारशे फूट उंच आहे. छत्रपती शिवरायांना स्वराज्याच्या उपयोगी पडणारा हा लोहगड किल्ला इंद्रायणी नदी आणि पवना नदी या दोन नद्यांच्या खोऱ्यांमध्ये विभागला गेला आहे.
सर्वोत्तम डोंगरी किल्ला असलेला लोहगड हा, बहुतांश काळ मराठ्यांच्या ताब्यात तर पाच वर्षे मुघलांच्या ताब्यात असल्याने या किल्ल्याने अनेक लढाया तसेच अनेक राज्यांचे उदय पतन पाहिले आहे. "Lohagad fort information in marathi"
लोहगडाचे अनेक मनमोहक पैलू आहेत. त्यापैकीच एक म्हणजे किल्ल्याची प्रभावित करणारी वास्तुकला हाय. तटबंदी, बुरुज, दरवाजे हे प्राचीन वस्तूकलेचे बुलंद पुरावे आहेत. किल्ल्यावरील मंदिरातील उत्कृष्ट आणि किचकट असे कोरीव काम हे प्राचीन अभियांत्रिकी कौशल्याचा पुरावाच देतात.
लोहगड किल्ल्यावरील बांधकाम हे विविध कालखंडातील स्थापत्य शैलीने मिश्रित असल्याचे बघायला मिळते.
लोहगड किल्ल्याचे भौगोलिक स्थान
लोहगड किल्ला हा सह्याद्रीच्या डोंगर रांगेत, मावळ प्रांतात इंद्रायणी आणि पवना नद्यांच्या खोऱ्यात वसलेला आहे.
लोणावळ्याच्या अगदी जवळचे मळवली स्टेशन पासून जवळच, दुर्ग रांगेतील प्रमुख किल्ला म्हणजे लोहगड किल्ला होय. "Lohagad fort information in marathi"
लोहगड किल्ल्याला संरक्षित करण्यासाठी जवळच विसापूर किल्ला किंवा संबळगड किल्ला बांधलेला आहे.
नाणे मावळ व पवन मावळ मध्ये वसलेल्या लोहगड किल्ल्यावरून पवना धरणाचे मनमोहक दृश्य पर्यटकांना अनुभवायला मिळतात.
लोहगड किल्ल्याचा इतिहास
शेकडो वर्षांचा समृद्ध इतिहास लाभलेल्या या लोहगडाने सातवाहन, चालुक्य, यादव, मराठे, मुघल या राजवटी पाहिल्या आहेत.
मलिक अहमद याने निजामशाहीची 1498 ला स्थापना केली. याच काळात निजामशाहीचा विस्तार करताना मलिक अहमद याने लोहागड किल्ला जिंकून घेतला.
पुढे राजा दुसरा बुऱ्हान निजाम हा अहमदनगरचा सातवा राजा याच लोहगड किल्ल्यात कैदेत कैदी म्हणून होता.
सोळाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या शेवटी म्हणजे 1630 दरम्यान लोहगड किल्ला आदिलशहाने जिंकून घेतला आणि किल्ला आदिलशाहीत आणला. "Lohagad fort information in marathi"
स्वराज्याचा झपाट्याने विस्तार करत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये कल्याण-भिवंडी परिसर जिंकून घेतला, तेव्हा लोहगड किल्ला देखील स्वराज्यात सामील करून घेतला होता.
इसवी सन 1665 साली राजा मिर्झा जयसिंग यांच्या सोबत जो पुरंदरचा तह झाला; त्या पुरंदरच्या तहात शिवरायांनी स्वराज्यातील 23 किल्ले तहाच्या कलमानुसार मुघलांच्या ताब्यात दिले होते. त्यात लोहगड किल्ल्याचा देखील समावेश होता.
5 वर्षे मुघलांच्या ताब्यात असणारा लोहगड, शिवरायांनी पुन्हा 13 मे 1670 मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला.
असे सांगितले जाते की सुरतेच्या लुटीतून आणलेली सर्व संपत्ती ही नेताजी पालकर यांनी लोहगड किल्ल्यावरच ठेवली होती.
1713 साली लोहगड शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांच्या हवाली केला. पुढे हा किल्ला पेशवांच्या ताब्यात होता; तर नंतरच्या काळात 1803 मध्ये लोहगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
लोहगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे
◆ लोहगडाचे दरवाजे
• गणेश दरवाजा
लोहगडाच्या या गणेश दरवाजाच्या उजव्या व डाव्या आशा दोन्ही बुरुजांच्या खाली नरबळी देण्यात आला होता. या बदल्यात साबळे कुटुंबाला पाटीलकी देण्यात आली होती.
गणेश दरवाजाच्या आतील बाजूस शिलालेख आहे. तर दरवाजावरील गणपतीच्या मूर्तीवरून दरवाजाला गणेश दरवाजा असे नाव देण्यात आले आहे. हा गडाचा पहिला दरवाजा आहे. "Lohagad fort information in marathi"
• नारायण दरवाजा
नारायण दरवाज्यात एक भुयार आहे. त्या भुयाराच्या आत पूर्वी धान्य साठवले जायचे.
नारायण दरवाजा हा 1789 साली नाना फडणवीस यांनी बांधलेला दरवाजा आहे.
• हनुमान दरवाजा
हनुमान दरवाजा हा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे.
मजबुत दगडांनी बांधलेला हा भक्कम दरवाजा आहे.
• महादरवाजा
महादरवाजा हा लोहगडाचा मुख्य दरवाजा होय. दरवाजावर हनुमानची मूर्ती कोरलेली दिसते.
या महादरवाजाचे बांधकाम देखील नाना फडणवीस यांनी 1790 ते 1794 या दरम्यान केले.
महादरवाजातून आत जातात दर्गा दिसतो. या दर्ग्याच्या बाजूलाच बांधकामाचा चूना बनविण्याची घाणी आहे.
तसेच समोर लोहारखाण्याचे अवशेष देखील आहेत.
हे देखील वाचा 👉 लाल महाल
• सोळाकोनी तलाव
लोहगडावर सोळा कोणाचा एक मोठा तलाव आहे; त्याला सोळाकोणी तलाव म्हटले जाते.
अष्टकोणी तलावाच्या समोर चालत गेल्यानंतर 16 कोणी तलाव दिसतो. "Lohagad fort information in marathi"
सोळाकोणी तलाव हा नाना फडणवीस यांनी गडावर बांधला.
• अष्टकोनी तलाव
गडावरील महादेवाच्या म्हणजे शिवमंदिराच्या समोरून सरळ रेषेत चालत गेल्यानंतर एक तलाव लागतो तो अष्टकोनी तलाव होय. या तलावाला आठ कोण आहेत.
अष्टकोनी तलावाच्या समोर पिण्याच्या पाण्याचे गडावरील एकमेव टाके आहेत.
• लक्ष्मी कोठी
गडावरील लक्ष्मी कोठीत अनेक खोल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरून लुटलेला सर्व खजिना हा लोहगडावरील याच लक्ष्मी कोठीत ठेवला होता.
ही लक्ष्मी कोठी आजही आपल्याला गडावर पाहायला मिळते.
• विंचू काटा
लोहगडावरील विंचू काटा हा लक्ष्मी कोठीच्या पश्चिम दिशेला आहे. विंचू काटा हा लोहगडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
या विंचू काट्याची लांबी ही जवळपास 1500 मीटर लांब तर रुंदी 30 मीटर रुंद असून, विंचू काट्याच्या खाली दाट जंगल आहे. "Lohagad fort information in marathi"
लोहगडावरील डोंगराची लांब सोंड ही दिसायला विंचवाच्या नांगी सारखी दिसते, म्हणून त्याला विंचू काटा असे म्हटले जाते.
अरुंद व लांबलचक पसलेल्या टेहाळणी बुरुजासारख्या विंचू काट्यावरून पर्यटक सभोवतालचे निसर्ग सौंदर्य मनसोक्त अनुभवू शकतात.
लोहगडावरील इतर ठिकाणे
• शिवमंदिर
• शिवकालीन तोफा
• शिवकालीन सभागृह
• गुफा
• दर्गा
लोहगड किल्ला फोटो
![]() |
"Lohagad fort information in marathi" |
लोहगड किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ
लोहगडावर तुम्ही कधीही, कोणत्याही दिवशी जाऊ शकता. पण किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा होय. या काळात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते व वातावरण देखील आल्हाददायक असते.
पर्यटक हे किल्ल्याला सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत भेट देऊ शकतात.
लोहगड किल्ल्याला कसे जावे
लोहगड किल्ल्याला जाण्यासाठी पुणे व मुंबई हुन येत असाल तर, मुंबई-पुणे-बेंगलोर हायवे वरून किल्ल्याला जाता येते. या महामार्गावर नियमितपणे बस व खाजगी वाहने उपलब्ध असतात. "Lohagad fort information in marathi"
तसेच तुम्ही रेल्वेने देखील किल्ल्याच्या जवळील मळवली स्टेशनवर उतरून लोहगड किल्ल्याला जाऊ शकता. या स्टेशन हुन लोहगड किल्ला 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे.
आमचे हे लेख देखील वाचा 👇
0 Comments